मुंबई, बारामती ते वर्धा; कोणत्या पक्षाला कोणता मतदारसंघ? लोकसभेतील जागा वाटपासाठी मविआकडून नऊ जणांची समिती
तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असावा तसेच जागा वाटप अंतीम करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रत्येक पक्षाचे तीन नेते असणार असल्याची माहिती मिळाली आहे.
नवी दिल्ली: लोकसभेतील (Loksabha Election 2024) जागा वाटप निश्चितीसाठी मविआकडून (Mahavikas Aghadi) समिती स्थापन करण्यात आली आहे. लोकसभेतील जागा वाटप निश्चितीसाठी मविआकडून समिती स्थापन करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतलीय. या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, लोकसभेसाठी मविआकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झालीय.
लोकसभा निवडणुकांसाठी काहीच महिने शिल्लक राहिले आहेत. या अगोदर देखील महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या बैठका झाल्या आहेत. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असावा तसेच जागा वाटप अंतीम करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रत्येक पक्षाचे तीन नेते असणार असल्याची माहिती मिळाली आहे.
कोणत्या पक्षाचे कोणते नेते?
ठाकरे गट
- संजय राऊत
विनायक राऊत
अनिल देसाई
राष्ट्रवादी शरद पवार गट (NCP)
- जयंत पाटील
- जितेंद्र आव्हाड
- अनिल देशमुख
काँग्रेस (Congress)
- पृथ्वीराज चव्हाण
- बसवराज पाटील
- नसीम खान
कोणात्या पक्षाला कोणता मतदारसंघ?
नेते एकत्र येऊन जागावाटपासंदर्भात चर्चा करतील आणि नावे निश्चित करणार आहे. साहाजिक कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार या संदर्भात मोठी उत्सुकता असणार आहे. आता या दृष्टीने काय चर्चा होणार? कोणत्या पक्षाला कोणता मतदारसंघ मिळणार? या विषयी उत्सुकता आहे.
आघाडीतील जागा वाटपाचा तिढा कसा सोडवणार?
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. राज्यातही आधी महाविकास आघाडी, त्यानंतर 'इंडिया' आघाडीकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून राज्यातील लोकसभा जागांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. ठाकरे गटाने मुंबईतील सहापैकी चार जागांवर निवडणूक लढवण्यासाठीची तयारी केली असून काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीला (NCP) प्रत्येकी एक जागा देण्याचा प्रस्ताव मांडला असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, काँग्रेसने मुंबईत तीन जागांवर दावा केला आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी तीन जागांची भूमिका मांडली आहे. त्यामुळे आघाडीतील जागा वाटपाचा तिढा कसा सोडवणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा :