एक्स्प्लोर

कोथरुड विधानसभा मतदारसंघ  :  युती आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा राखणार?      

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या गिरीश बापटांना कोथरुड विधानसभा मतदारसंघातून 148570 मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या मोहन जोशींना 42374 मतं मिळाली होती. दोन्ही उमेदवारांच्या मातांमधला हा फरक तब्बल एक लाख सहा हजारांहून अधिक आहे. यावरुन कोथरुडचा अंदाज बांधणं फारसं अवघड नाही.

पुणे : भाजप आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून कोथरुड विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे . काँग्रेस आणि राष्ट्रवादीची राज्यात सलग पंधरा वर्षं सत्ता असतानाही कोथरुड मात्र सेना -भाजपच्या मागे उभं होतं. त्याही  आधी काँग्रेसची सद्दी असतानाही कोथरुड मधून जनसंघ, भाजप आणि शिवसेनेचे आमदार निवडून येत राहिले. आता तर महापालिकेपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. शिवसेनेकडून कोथरुडची मक्तेदारी 2014 ला भाजपने काढून घेतल्याने युतीतील स्थानिक नेत्यांमध्ये अनेकदा संघर्ष पाहायला मिळतो. भाजपचे अण्णा जोशी 1982 आणि 1986 ला इथून आमदार म्हणून निडणून आले होते. 1990ला शिवसेनेचे शशिकांत सुतार इथून आमदार म्हणून निवडून आले आणि पुढं वर्षानुवर्षं निवडून येत राहिले. 2009 ला शिवसेनेने चंद्रकांत मोकाटे यांना बिधानसभेची उमेदवारी दिली आणि कोथरुडकरांनी नवीन आमदार पण शिवसेनेचाच निवडून दिला. 2014 ला मात्र भाजप-शिवसेनेची युती तुटली आणि त्याचा फायदा भाजपने उठवला. भाजपच्या मेधा कुलकर्णी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांचा पासष्ठ हजारांच्या मताधिक्यांनी पराभव करून 2014 ला इथून निवडून आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार तिसऱ्या आणि पाचव्या  क्रमांकावर राहिले. या मतदारसंघात समावेश कोथरुड, कर्वेनगर, वारजे, बाणेर, बालेवाडी, पाषाण या पुण्यातील परिसरांचा होतो. इथल्या मतदारांमध्ये त्यामुळे मराठी आणि अमराठी असे ढोबळमानाने दोन प्रकार पाहायला मिळतात. पानशेतच्या पुरानंतर पुण्याच्या पेठांमधील अनेकजण कोथरुडला राहायला जायला लागले आणि कोथरुड  वाढत गेलं. तर आय. टी. इंडस्ट्रीच्या वाढीबरोबर कधीकाळी ग्रामपंचायती असलेल्या बाणेर, बालेवाडी आणि पाषाणच रुपडं बदललं. बाणेर, पाषाण, बालेवाडीचा पॉश भाग जसा इथं आहे तशीच जुन्या गावांची ओळख सांगणारी गावठाणंही आहेत.  आज या भागातील सोसायट्यांमध्ये अमराठींचा मोठा भरणा आहे . पण मराठी असो वा अमराठी इथल्या मतदारांनी नेहमीच भाजप-सेनेला पसंती दिलीय. या मतदारसंघात मराठा समाजातील मतदारांचं प्रमाण सर्वाधिक आहे . त्यानंतर ब्राम्हण समाजातील मतदार आहेत. ओ.बी.सी मतदारांची संख्याही इथं मोठी आहे. त्यामुळे भाजप-सेना युतीमध्ये आणि त्यानंतर त्या-त्या पक्षांमध्ये कोथरुड च्या उमेदवारी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष पाहायला मिळतो . अनेकदा हा संघर्ष हिंसकही झाल्याचं पाहायला मिळत . 2014 ला भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी मेधा कुलकर्णी आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात भर रस्त्यात वाद झाला होता. त्यावेळी नवीन खासदार असलेल्या अनिल शिरोळेंची विजयी मिरवणूक नक्की कोणाच्या प्रभागातून न्यायाची यावरून भाजपच्या या दोन नागरसेवकांमधील वाद चांगलाच गाजला होता. त्यानंतर आमदार मेधा कुलकर्णी आणि शिवसेनेचे शाम देशपांडे यांच्यातील वादही पोलीस स्टेशनपर्यंत पोहचला होता.  शिवसेनेमध्ये देखील चंद्रकांत मोकाटे आणि श्याम देशपांडे यांच्यामध्ये उमेदवारीवरून स्पर्धा पाहायला मिळाली होती . हे चारही जण यावेळी पुन्हा इच्छुक आहेत. विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी  कोथरुड वर दावा सांगत असल्या तरी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी भाजपकडून  निवडणुकीची तयारीही सुरु केलीय. त्यासाठी एक रथ देखील त्यांनी बनवलाय. तर शिवसेनेकडून शाम देशपांडे यांनी युतीच्या जागावाटपात कोथरुड ची जागा मिळावी यासाठी प्रयत्न चालवलेत. माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे देखील इच्छुक आहेत मात्र त्यांच्याकडून फारशी हालचाल होताना अजूनतरी दिसलेली नाही. कोथरुडसाठी  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा भर भाजप आणि शिवनेतून नाराज होऊन ऐनवेळी पक्षात येणाऱ्या नेत्यांवर राहिलाय. त्यातूनच 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे माजी खासदार आणि माजी आमदार अण्णा जोशी यांना कोथरुडच्या उमेदवारी दिली होती. आताही काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे इथं तुल्यबळ उमेदवार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत मनसे सहभागी झाल्यास जागावाटपात हा मतदारसंघ मनसेलाही सोडला जाऊ शकतो. मनसेच्या किशोर शिंदेंना इथून विधानसभा निवडणूक लढवण्याचा दोन वेळचा अनुभव आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या गिरीश बापटांना कोथरुड विधानसभा मतदारसंघातून 148570 मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या मोहन जोशींना 42374 मतं मिळाली होती. दोन्ही उमेदवारांच्या मातांमधला हा फरक तब्बल एक लाख सहा हजारांहून अधिक आहे. यावरुन कोथरुडचा अंदाज बांधणं फारसं अवघड नाही.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget