एक्स्प्लोर

Konkan LIVE UPDATE : कोकणात कोण विजयी? कोणाला बसला पराभवाचा धक्का?

यंदा कोकणातील 3 जिल्ह्यांमध्ये 3 हायव्होल्टेज लढती आहेत. कणकवलीत भाजपच्या नितेश राणेंविरोधात सेनेचे सतीश सावंत ही सर्वात चर्चेतील आणि महत्तवाची लढत मानली जाते.

LIVE UPDATE 

  • राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन साळवी विजयी
  • दापोली मतदारसंघात शिवसेनेचे योगेश कदम विजयी
  • गुहाघर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे भास्कर जाधव विजयी
  • पनवेल मतदरसंघातून भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर 91517 मतांनी विजयी
  • कुडाळ मतदारसंघात वैभव नाईक विजयी
  • सावंतवाडी मतदारसंघातून  शिवसेनेच्या दीपक केसरकर विजयी
  • कणकवलीतून नितेश राणेंचा विजयी, शिवसेनेचे सतीश सावंतांवर मात
  • कणकवलीत नितेश राणेंच्या विजयी जल्लोषाला सुरुवात, शिवसेनेचे सतीश सावंत पिछाडीवर
  • श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आघाडीवर
  • चिपळूण मतदारसंघातून राष्ट्रवादी शेखर निकम विजयी, राष्ट्रवादीने जिल्हातील पहिले खातं उघडलं
  • कुडाळ मतदारसंघात वैभव नाईक 10,034 मतांनी आघाडीवर
  • सावंतवाडी मतदारसंघात दिपक केसरकर यांना 4,610 मतांची आघाडी
  • कुडाळ मतदारसंघात वैभव नाईक 4,997 मतांनी आघाडीवर
  • रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील सहाव्या फेरीत शिवसेनेचे उदय सामंत 23618 मतांनी आघाडीवर
  • कुडाळ मतदारसंघात चौथ्या फेरीअखेर वैभव नाईक 2,717 मतांनी आघाडीवर
  • चौथी फेरी : सावंतवाडीमधून दिपक केसरकर यांना 2,683मतांची आघाडी
  • राजापूर विधानसभा मतदारसंघ : पोस्टल फेरीत शिवसेनेचे राजन साळवी आघाडीवर
  • रत्नागिरी : गुहागर विधानसभा निकाल : पहिली फेरीत राष्ट्रवादीचे  सहदेव बेटकर 50  मतांनी आघाडीवर
  • रायगड : श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आघाडीवर, 5 हजार 706 मतांनी आघाडीवर तीसरी फेरी
  • विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल, कणकवलीतून नितेश राणे 6000 मतांनी आघाडीवर
  • रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत 2726 मतांनी आघाडीवर
  • अलिबाग मतदारसंघ : शिवसेनेचे महेंद्र दळवी आघाडीवर
  • चिपळूण मतदारसंघ : राष्ट्रवादीचे शेखर निकम  4500 मतांनी आघाडीवर
  • विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल, सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर आघाडीवर
  • विधानसभा निवडणूक 2019 मतमोजणी कल, कणकवलीतून नितेश राणे आघाडीवर
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालाची धाकधूक अखेर आज संपणार आहे. आपला राजकीय कैवारी निवडण्यासाठी जनतेने ईव्हीएमचं बटण दाबून दिलेला कौल आज जाहीर होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रात पुन्हा आघाडीला मात देत युती सत्तेवर येणार की युतीला धक्का देत आघाडी बाजी मारणार, याची उत्सुकता लागली आहे. विधानसभेसाठी वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी दिलेली हाक मतदारांना भावलीय हे काही तासांत स्पष्ट होणार आहे. विधानसभेच्या मतमोजणीला अवघे काही तास उरले आहेत. तरी, आता प्रशासनाकडून राज्यभरात मतमोजणीसंदर्भातची तयारी सुरु आहे. रत्नागिरीतल्या दापोलीत सेनेच्या योगेश कदमांविरुद्ध राष्ट्रवादीचे संजय कदम, कणकवलीत भाजपच्या नितेश राणेंविरोधात सेनेचे सतीश सावंत रिंगणात आहेत. तर, रायगडमध्ये आदिती तटकरे रिंगणात उतरली आहे. त्यामुळे इथल्या मतमोजणीकडेही राज्याचं लक्ष लागलेलं आहे. Kankavali Big Fight | कणकवली मतदारसंघात नितेश राणेंचं अस्तित्व पणाला, पत्रकारांचा अंदाज काय सांगतो? | ABP Majha कोकणातील लढतींचा आढावा :  सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे बबन साळगावकर आणि भाजपचे बंडखोर राजन तेली अशी लढत पाहायला मिळेल. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ : कुडाळ-मालवण मतदारसंघात शिवसेनेचे वैभव नाईक आणि अपक्ष दत्ता सामंत (राणे समर्थक) यांच्यात थेट लढत होणार आहे. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांनी काँग्रेसच्या नारायण राणेंचा पराभव केला होता. कणकवली-देवगड विधानसभा मतदारसंघ : कणकवली-देवगड मतदारसंघात नितेश राणे विरुद्ध शिवसेनेच्या सतीश सावंत अशी लढतंआहे. तर संदेश पारकर भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नितेश राणेंना तब्बल 74,715 मतं मिळाली होती. तर भाजपच्या प्रमोद जठार यांना 48,736 मतं मिळाली होती. राजापूर विधानसभा मतदारसंघ : शिवसेनेच्या राजन साळवी विरुद्ध काँग्रेसच्या अविनाश लाड यांच्यात लढत आहे. मागील निवडणुकीत राजन साळवींना 76,266 मतं मिळाली होती. तर काँग्रेसच्या राजन देसाई यांना 37,204 मतं मिळाली होती. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ : शिवसेनेच्या उदय सामंत यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीच्या सुदेश मयेकर यांच्याशी लढत आहे. तरी या लढतीत शिवसेनेच्या उदय सामंत यांचं पारडं जडं असल्याचं बोललं जात आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांना 93,876 मतं मिळाली होती. तर भाजपच्या बाळासाहेब माने यांना 54,449 मतं मिळाली होती. चिपळूण विधानसभा मतदारसंघ : चिपळूण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या सदानंद चव्हाण विरोधात राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांच्यात लढत आहे. 2014 साली सदानंद चव्हाण यांनी शेखर निकम यांना पराभूत केलं होतं. सदानंद चव्हाण यांना 75,695 तर शेखर निकम यांना 69,627मतं मिळाली होती. गुहाघर विधानसभा मतदारसंघ : राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्य़ा भास्कर जाधवांचा सामना राष्ट्रवादीच्या सहदेव बेटकर यांच्याशी होणार आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या भास्कर जाधवांचं पारडं जडं असल्याचं बोललं जात आहे. दापोली विधानसभा मतदारसंघ : या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या संजय कदम यांची शिवसेनेच्या योगेश कदम यांच्याशी लढत आहे. गेल्या निवडणुकीत संजय कदम शिवसेनेच्या सुर्यकांत दळवी यांच्याविरोधात 52,907 मतांनी विजयी झाले होते. तर सुर्यकांत दळवी यांना 49,123 मतं मिळाली. महाड विधानसभा मतदारसंघ : महाड विधानसभा मतदारसंघ 2014 साली शिवसेनेच्या भरत गोगावलेंनी काँग्रसेच्या माणिक जगताप यांना पराभूत केलं होतं. यंदाही या दोघांच्या लढत पाहायला मिळते आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ : या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांचं तगडं आव्हान शिवसेनेच्या विनोद घोसाळकरांसमोर आहे. तर मनसेकडून संजय गायकवाड हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. 2014 च्या निवडणुकीत अवधूत तटकरे यांचा विजय झाला होता. अलिबाग विधानसभा मतदारसंघ : अलिबाग विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळू शकते. या मतदारसंघातून शेकापचे पंडीत पाटील, काँग्रेसच्या श्रद्धा ठाकूर तर, शिवसेनेकडून महेंद्र दळवी रिंगळात आहेत. 2014 च्या निवडणुकीत शेकापच्या पंडितशेठ पाटलांना 76,959 मतं मिळाली होती. तर शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांना 60,865 मतं मिळाली होती. पेण विधानसभा मतदारसंघ : या मतदारसंघात शेकापकडून धैर्यशील पाटील, काँग्रेसकडून नंदा म्हात्रे तर, भाजपकडून रविशेठ पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहे. 2014 च्या निवडणुकीत शेकापचे धैर्यशील पाटील विजयी झाले होते. उरण विधानसभा मतदारसंघ : उरण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या मनोहर भोईर यांचा शेकापच्या विवेक पाटील यांच्याशी थेट लढत आहे. 2014 च्या निवडणुकीत मनोहर भोईर काही हजारांच्या मतांनी विजयी झाले होते. कर्जत विधानसभा मतदारसंघ : राष्ट्रवादी सुरेश लाड विरुद्ध शिवसेनेचे महेंद्र थोरवे अशी लढतं आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघ : शेकापचे हरेश केणी विरुद्ध भाजपचे प्रशांत ठाकूर अशी लढतं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले

व्हिडीओ

Maharashtra Winter Session Nagpur : उद्यापासून हिवाळी अधिवेशन, तापलं वातावरण Special Report
Jain Muni Kabutarkhana : कबुतरामुळे बिघडलं धर्मकारण, राजकारण Special Report
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता का नाही? Special Report
Pune NCP : पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी अजितदादांसोबत जाणार का? Special Report
Smruti & Palash Marriage : स्मृती मानधना- पलाश मुच्छलचं लग्न का मोडलं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Embed widget