(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Karnataka Election Results 2023 : कर्नाटकात जेडीएस किंग मेकर ठरणार?
Karnataka Election Results 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या कलांमध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला असला तरी स्थिर सरकारसाठी काँग्रेसला जेडीएसची मदत घ्यावी लागण्याची शक्यता आहे.
Karnataka Election Results 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या 2023 च्या (Karnataka Assembly Election 2023) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सर्व 224 जागांचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेसने (Congress) बहुमताचा आकडा गाठला आहे. त्यापाठोपाठ भाजप (BJP) आणि जेडीएस (JDS) यांचा क्रमांक आहे. कलांमध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला असला तरी स्थिर सरकारसाठी काँग्रेसला जेडीएसची मदत घ्यावी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरु केल्या आहेत. दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्व देखील जेडीएसचे प्रमुख एचडी कुमारस्वामी यांच्या संपर्कात असून बोलणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जेडीएस या निवडणुकीत किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.
जेडीएस हा कर्नाटकमधील प्रादेशिक पक्ष आहे. जेडीएस प्रमुख एच डी कुमारस्वामी कर्नाटकातील चन्नापट्टन विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. कुमारस्वामी यांचा विजय रथ रोखण्यासाठी भाजपने सीपी योगेश्वर यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने गंगाधर एस. यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. विशेष म्हणजे एचडी कुमारस्वामी पिछाडीवर आहेत.
माझा पक्ष छोटा : एचडी कुमारस्वामी
जेडीएस प्रमुख एचडी कुमारस्वामी यांनी आज (13 मे) निवडणूक निकालापूर्वी पत्रकारांना सांगितलं की, आम्हाला चांगल्या गोष्टींची अपेक्षा आहे. माझी कोणतीही मागणी नाही, माझा पक्ष छोटा आहे, मी मागणी कशी करु शकतो? त्याचवेळी, जेडीएस पक्षाच्या एक्झिट पोलमध्ये 30 ते 40 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, जेडीएसने मागीन निवडणकीत एकूण 37 जागा जिंकल्या होत्या. निकालात तो तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता.
#WATCH 2-3 घंटे और नतीजों का इंतजार करते हैं...हमें अच्छी चीजों की उम्मीद हैं। मेरी कोई मांग नहीं है, मेरी एक छोटी पार्टी है, मैं कैसे मांग कर सकता हूं?: कर्नाटक के पूर्व मुख्यमंत्री एच.डी कुमारस्वामी, बेंगलुरु pic.twitter.com/shMtSo1YdU
— ANI_HindiNews (@AHindinews) May 13, 2023
जेडीएस आणि काँग्रेसची युती होणार?
दरम्यान 2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 80 जागा जिंकत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. त्यानंतर काँग्रेसने जेडीएससोबत आघाडी करुन सरकार स्थापन केलं होतं आणि सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं होतं. 17 आमदारांनी राजीनामा देत सत्तेतून बाहेर पडले आणि जेडीएस आणि काँग्रेसचे युती सरकार अवघ्या 14 महिन्यांनंतर पडलं. यावेळी जरी काँग्रेसला कलांमध्ये बहुमताचा आकडा गाठता आला असला तरी स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला जेडीएससोबत युती करावी लागेल.