एक्स्प्लोर

Karnataka : कर्नाटकात बुधवारी निवडणुकीचा 'रणसंग्राम'; 5.31 कोटी मतदार ठरवणार 2,615 उमेदवारांचे भवितव्य

Karnataka Election 2023 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी राज्यातील 58,545 मतदान केंद्र सुसज्ज ठेवण्यात आली असून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही तास उरले असून सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती द्यायच्या हे मतदार ठरवणार आहेत. बुधवारी 10 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकातील 5 कोटी 31 लाख मतदार मतदान करणार असून हे मतदान राज्यातील 2,615 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. 

निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज 

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झालं असून राज्यभरातील एकूण 58,545 मतदान केंद्रांवर मतदान करण्याची सुविधा प्राप्त करुन देण्यात येत आहे. मतदानादरम्यान एकूण 75,603 बॅलेट युनिट (BU), 70,300 कंट्रोल युनिट (CU) आणि 76,202 व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) वापरण्यात येणार आहेत.

राज्यभरातील एकूण 5,31,33,054 मतदार मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. या मतदारांमध्ये 2,67,28,053 पुरुष मतदार तर 2,64,00,074 महिला मतदार आहेत. तसेच 4,927  इतक्या संख्येने इतर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

राज्यात 11,71,558 तरुण मतदार आहेत, तर 5,71,281 शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत आणि 12,15,920 मतदार हे 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.

2,615 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार 

विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 2,615 उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये 2,430 पुरुष तर 184 महिला उमेदवार आणि एक तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य बुधवारी मतदान पेटीत बंद होणार आहे. 

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार हे उद्या ठरणार आहे. भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे. 

सलग दोन वेळा कोणताही पक्ष सत्तेत नाही

कर्नाटक या राज्याचे वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत इथल्या जनतेने सलग दोन वेळा कोणत्याही राजकीय पक्षाकडे सत्ता सोपवली नाही. दर पाच वर्षांनी राज्यात सत्ताबदल होतोय. हा समज मोडून काढण्यासाठी भाजपने कंबर कसली असून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे काँग्रेसच्या सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार या नेत्यांनी तोडीस तोड काम करत प्रचाराचा धडाका लावला. त्यामुळे आता जनता कुणाच्या पाठिशी राहते आणि कुणाला बाजूला सारते हे 13 मे रोजीच्या निकालावेळी समजेल. 

या बातम्या वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
''तुम्ही म्हणाल तिथं जयंतरावांना घेऊन जायला तयार''; अजित पवारांनी विधानसभेतूनच सांगितलं
''तुम्ही म्हणाल तिथं जयंतरावांना घेऊन जायला तयार''; अजित पवारांनी विधानसभेतूनच सांगितलं
राज्य सरकारचा मोठा निर्णय, EWS, SEBC आणि ओबीसी विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क परत मिळणार
राज्य सरकारचा मोठा निर्णय, EWS, SEBC आणि ओबीसी विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क परत मिळणार
राहुल गांधींनी पंढरपुरच्या वारीत कॅट वॉक करायला येऊ नये, भाजपच्या माजी खासदाराने डिवचले
राहुल गांधींनी पंढरपुरच्या वारीत कॅट वॉक करायला येऊ नये, भाजपच्या माजी खासदाराने डिवचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aditya Thackeray On Adani : मुंबई गिळायची नाही त्याला आमचा कडाडून विरोध, ठाकरेंचा संतापVijay Wadettiwar Mumbai : अदानीच्या सेवेसाठी सेवक काम करतात, सरकारवर गंभीर टीकाAndheri Hit And Run Case : एक कार-दोन तरुण! पुण्यानंतर मुंबईच्या अंधेरीत हिट अँड रन...City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 5 जुलै 2024 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
''तुम्ही म्हणाल तिथं जयंतरावांना घेऊन जायला तयार''; अजित पवारांनी विधानसभेतूनच सांगितलं
''तुम्ही म्हणाल तिथं जयंतरावांना घेऊन जायला तयार''; अजित पवारांनी विधानसभेतूनच सांगितलं
राज्य सरकारचा मोठा निर्णय, EWS, SEBC आणि ओबीसी विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क परत मिळणार
राज्य सरकारचा मोठा निर्णय, EWS, SEBC आणि ओबीसी विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क परत मिळणार
राहुल गांधींनी पंढरपुरच्या वारीत कॅट वॉक करायला येऊ नये, भाजपच्या माजी खासदाराने डिवचले
राहुल गांधींनी पंढरपुरच्या वारीत कॅट वॉक करायला येऊ नये, भाजपच्या माजी खासदाराने डिवचले
Nashik Crime : घरात घुसून 18 वर्षीय तरुणाला संपवलं, शेजारी झोपलेल्या भावालाही समजलं नाही, नाशिक पुन्हा हादरलं!
घरात घुसून 18 वर्षीय तरुणाला संपवलं, शेजारी झोपलेल्या भावालाही समजलं नाही, नाशिक पुन्हा हादरलं!
Alia Bhatt and Sharvari In YRF Spy Universe :  'यशराज'च्या स्पाय युनिव्हर्समध्ये आलियासोबत शर्वरी झळकणार, चित्रपटाचे नावही ठरलं
'यशराज'च्या स्पाय युनिव्हर्समध्ये आलियासोबत शर्वरी झळकणार, चित्रपटाचे नावही ठरलं
अफलातून... 230 किमी एव्हरेज, परवडणारी किंमत, 2 किलोची टाकी; अशी आहे जगातील पहिली CNG दुचाकी
अफलातून... 230 किमी एव्हरेज, परवडणारी किंमत, 2 किलोची टाकी; अशी आहे जगातील पहिली CNG दुचाकी
Telly Masala:  'यशराज'च्या स्पाय युनिव्हर्समध्ये आलियासोबत शर्वरी झळकणार ते कसा आहे मिर्झापूर-3? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'यशराज'च्या स्पाय युनिव्हर्समध्ये आलियासोबत शर्वरी झळकणार ते कसा आहे मिर्झापूर-3? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Embed widget