एक्स्प्लोर

Karnataka Exit Poll:  कर्नाटकमध्ये सत्ता भाजप की काँग्रेसकडे? जनता दल ठरणार किंगमेकर? थोड्याच वेळात एक्झिट पोल...

Karnataka Exit Poll:  कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान पार पडले असून आता थोड्या वेळात एक्झिट पोल जाहीर करण्यात येणार आहे.

Karnataka Exit Poll:  कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज, बुधवारी (10 मे) मतदान झाले. विधानसभेच्या सर्व 224 जागांवर मतदान झाले. लोकांनी मोठ्या संख्येने मतदानात भाग घेतला आणि पुढच्या सरकारचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. 13 मे रोजी मतमोजणी झाल्यानंतर कर्नाटकचे चित्र स्पष्ट होईल, मात्र त्याआधी एबीपी न्यूज-सीव्होटरने एक्झिट पोल समोर आणला आहे. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी आलेल्या बहुतांश सर्वेक्षण आणि जनमत चाचण्यांच्या आकडेवारीत कर्नाटकात काँग्रेसची स्थिती मजबूत दिसून आली.

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, कर्नाटकात 5.3 कोटीहून अधिक मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 2.66 कोटी तर महिला मतदारांची संख्या 2.63 कोटी आहे. याशिवाय 5.71 लाख दिव्यांग मतदार, 80 वर्षे किंवा त्यावरील 12.15 लाख मतदार आणि 100 वर्षांवरील 16,000 मतदार नोंदणीकृत आहेत.

मुख्यतः सत्ताधारी भाजप, काँग्रेस आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या जनता दल धर्मनिरपेक्ष (जेडीएस) यांच्यातच लढत असल्याचे मानले जात आहे. ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण वर्षभरात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजपला निवडणुका जिंकून दक्षिणेचा हा बालेकिल्ला कायम ठेवायचा आहे, तर काँग्रेसला 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात पुन्हा सत्तेत येवून जनतेला मजबूत संदेश द्यायचा आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हावेरी जिल्ह्यातील सरकारी शाळेत मतदान केल्यानंतर, भाजप पुनरागमन करेल आणि विक्रमी फरकाने विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला. ते सलग चौथ्यांदा शिगगाव मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी आरोप केला की, भाजपला ‘मनी पॉवर’च्या माध्यमातून निवडणुका जिंकायच्या आहेत कारण त्यांच्याकडे जनतेला दाखवण्यासाठी कोणतेही विकासकाम नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान राज्यातील महागाई आणि बेरोजगारी आणि भ्रष्टाचारावर मौन बाळगल्याचा आरोपही त्यांनी केला. सिद्धरामय्या म्हैसूर जिल्ह्यातील वरुणा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

राज्यात मतदानादरम्यान तीन ठिकाणी हिंसाचार झाल्याच्या बातम्याही आल्या आहेत. पोलिस सूत्रांनी सांगितले की, विजयपुरा जिल्ह्यातील बसवना बागेवाडी तालुक्यातील मसाबिनाल गावात EVM आणि VVPAT (व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल) मशिन बदलल्या जात असल्याची अफवा पसरली. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी काही ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशिन्सची नासधूस केली आणि मतदान अधिकाऱ्यांच्या वाहनांचे नुकसान केले. बेंगळुरूच्या पद्मनाभनगर विधानसभा मतदारसंघातील पपई गार्डनमधील मतदान केंद्रावर लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या काही तरुणांनी त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर हल्ला केला. बेल्लारी जिल्ह्यातील संजीवरायनकोटमध्ये काँग्रेस आणि भाजपचे काही कार्यकर्ते एकमेकांना भिडले. कर्नाटकात सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली, सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरू होते. 

2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने 104, काँग्रेसला 78 आणि जेडीएसने 37 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. याआधी भाजपचे बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली पण ते बहुमत सिद्ध करू शकले नाहीत, त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने मिळून सरकार स्थापन केले. ते सरकारही 14 महिन्यांनी पडले. त्यानंतर भाजपने बंडखोर आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन केले. भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यात आले पण दोन वर्षानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री केले.

कुठं पाहाल एक्झिट पोल?

ABP-CVoter कर्नाटक एक्झिट पोल 2023 लाइव्ह स्ट्रीम

एबीपी लाइव्हवर कर्नाटक एक्झिट पोल 2023 च्या लाइव्ह अपडेट्ससोबत, एबीपी नेटवर्कच्या इतर प्लॅटफॉर्मवरही कर्नाटक एक्झिट पोलशी संबंधित माहिती पाहू आणि वाचू शकतो.

ABP नेटवर्कच्या YouTube चॅनेलवर ABP News CVoter कर्नाटक एक्झिट पोल 2023 चे लाईव्ह कव्हरेज पाहू शकता. ABP Live CVoter कर्नाटक एक्झिट पोल 2023 संबंधित बातम्या वाचा आणि तुमच्या Android किंवा iOS स्मार्टफोनवर ABP Live अॅप डाउनलोड करून LIVE TV पहा.

थेट टीव्ही: https://news.abplive.com/live-tv

एबीपी लाईव्ह (इंग्रजी): https://news.abplive.com/

एबीपी न्यूज (हिंदी): https://www.abplive.com/

एबीपी नेटवर्क YouTube: https://www.youtube.com/watch?v=nyd-xznCpJc

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखदDevendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्टABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAshok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Ladki Bahin Yojana : 'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Embed widget