एक्स्प्लोर

प्रदेशाध्यक्ष विरुद्ध मुंबई अध्यक्ष, वरळीतील उमेदवारीवरुन राष्ट्रवादीत गटबाजी

एकीकडे पक्षाला लागलेली गळती, चांगल्या उमेदवारांची वानवा असताना उमेदवारी ठरवताना देखील नेत्यांमधील गटबाजी आणि मतभेद दिसून आले.

मुंबई : मुंबईत सध्या एका जागेची चर्चा सगळ्यात जास्त सुरु आहे ती म्हणजे वरळी. जे ठाकरे कुटुंब नेहमीच निवडणुकांपासून कायम दूर राहिले. त्याच कुटुंबातील पहिले ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार आहेत. शिवसेनेन या निवडणुकीची व्यूहरचना इतकी नीट केली की निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांचा प्रवेश शिवसेनेत झाला. अध्यक्ष पक्ष सोडून जाणे हा धक्का राष्ट्रवादीला मोठा होता. त्यात वरळीत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात कोण उमेदवार द्यायचा यातही राष्ट्रवादीतील गटबाजी समोर आली आहे. प्रदेशाध्यक्ष विरुद्ध मुंबई अध्यक्ष असा हा सामना राष्ट्रवादीत रंगला आहे. सुप्रिया सुळे यांच्या विश्वासू आणि जयंत पाटील यांच्या टीममधील अदिती नलावडे यांचे नाव पुढे आले होते. तर मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्याकडून सुरेश माने यांचे नाव पुढे आले. सुरेश माने हे पेशाने वकील असून ते आधी बसपा पक्षात होते. नंतर त्यांनी स्वतःची बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी काढली. मुंबई राष्ट्रवादीने ही जागा या पक्षाला देण्याचा निर्णय केला होता. पण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या गोटातून अदिती नलावडेचे नाव पुढे करण्यात आले. Assembly Election 2019 | कोणाला विरोध म्हणून निवडणूक लढणार नाही : धनंजय मुंडे | ABP Majha अदिती ही शिवसेनेचे दिवंगत नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष दत्ताजी नलावडे यांची पुतणी आहे. अदिती ही सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या टीममध्ये काम करते. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मातोश्रीवर जे आंदोलन झाले त्यात अदिती नलावडे अग्रभागी होती. काल संध्याकाळी झालेल्या बैठकीत अदितीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार देखील मध्यरात्री या मतदारसंघात फिरुन आले. पण मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी या उमेदवारीवर आक्षेप घेतला आणि अॅडव्होकेट सुरेश माने यांना उमेदवारी देण्याची भूमिका घेतली. अखेरीस मुंबई अध्यक्षांच्या  मागणीनुसार अॅडव्होकेट सुरेश माने यांना अजित पवारांनी एबी फॉर्म दिला. एकीकडे पक्षाला लागलेली गळती, चांगल्या उमेदवारांची वानवा असताना उमेदवारी ठरवताना देखील नेत्यांमधील गटबाजी आणि मतभेद दिसून आले. चार ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असतानाही शेवटच्या क्षणी वरळी मधील उमेदवारी ठरवण्यात आली. Ramesh Kadam | जामीनावर सुटलेल्या आमदाराचं मतदारसंघात जंगी स्वागत, 500 किलोचा हार घालणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded News : वसमतचा अभियंता इराणमध्ये बेपत्ता; 24 दिवसांपासून संपर्क तुटला, कुटुंबियांची शासनाकडे धाव
Nanded : वसमतचा अभियंता इराणमध्ये बेपत्ता; 24 दिवसांपासून संपर्क तुटला, कुटुंबियांची शासनाकडे धाव
Gold Rate : 2025 मध्ये सोनं 90 हजारांचा टप्पा ओलांडणार, येत्या वर्षभरात 10 हजार रुपयांनी सोनं महागणार, चांदी सव्वा लाखांपर्यंत पोहोचणार?
2024 मध्ये तेजीनंतर सोनं 2025 मध्ये नवा टप्पा गाठणार, 90 हजारांपर्यंत पोहोचणार, तज्ज्ञांचा अंदाज
Walmik Karad : वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यातच होता, सोबत आलेल्या नगरसेवकांनी मार्गच सांगितला!
वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यातच होता, सोबत आलेल्या नगरसेवकांनी मार्गच सांगितला!
दादा, तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक; प्राजक्ता म्हणाली, सुरेश धसांविरूद्ध कारवाई नाही
दादा, तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक; प्राजक्ता म्हणाली, सुरेश धसांविरूद्ध कारवाई नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhaji Raje Chhatrapat PC : मुंडे-फडणवीसांची भेट ते वाल्मिक कराड; संभाजीराजेंनी सगळंच काढलंWalmik Karad Surrender Pune CID : गाडी आली, वाल्मिक कराड उतरला, CID कार्यालयातील Uncut VIDEOWalmik Karad Surrender to Pune CID :  वाल्मिक कराडने पुण्यात सीआडीसमोर केलं आत्मसमर्पणWalmik Karad EXCLUSIVE : शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराड काय म्हणाला? शब्द अन् शब्द जसाच्या तसा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded News : वसमतचा अभियंता इराणमध्ये बेपत्ता; 24 दिवसांपासून संपर्क तुटला, कुटुंबियांची शासनाकडे धाव
Nanded : वसमतचा अभियंता इराणमध्ये बेपत्ता; 24 दिवसांपासून संपर्क तुटला, कुटुंबियांची शासनाकडे धाव
Gold Rate : 2025 मध्ये सोनं 90 हजारांचा टप्पा ओलांडणार, येत्या वर्षभरात 10 हजार रुपयांनी सोनं महागणार, चांदी सव्वा लाखांपर्यंत पोहोचणार?
2024 मध्ये तेजीनंतर सोनं 2025 मध्ये नवा टप्पा गाठणार, 90 हजारांपर्यंत पोहोचणार, तज्ज्ञांचा अंदाज
Walmik Karad : वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यातच होता, सोबत आलेल्या नगरसेवकांनी मार्गच सांगितला!
वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यातच होता, सोबत आलेल्या नगरसेवकांनी मार्गच सांगितला!
दादा, तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक; प्राजक्ता म्हणाली, सुरेश धसांविरूद्ध कारवाई नाही
दादा, तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक; प्राजक्ता म्हणाली, सुरेश धसांविरूद्ध कारवाई नाही
Vijay Wadettiwar : पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केलं? त्यांची हिंमत तर इतकी की....; विजय वडेट्टीवारांचा संतप्त सवाल 
पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केलं? त्यांची हिंमत तर इतकी की....; विजय वडेट्टीवारांचा संतप्त सवाल 
Walmik Karad surrender: अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन CID कार्यालय गाठलं, वाल्मिक कराडचा ठावठिकाणा सहकाऱ्याने सांगितला!
अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन CID कार्यालय गाठलं, वाल्मिक कराडचा ठावठिकाणा सहकाऱ्याने सांगितला!
Walmik Karad: हा खेळखंडोबा नको; शरणागतीनंतर संभाजीराजे संतप्त ; CM फडणवीस अन् अजित पवारांना थेट सवाल?
Walmik Karad: हा खेळखंडोबा नको; शरणागतीनंतर संभाजीराजे संतप्त ; CM फडणवीस अन् अजित पवारांना थेट सवाल?
वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती स्कॉर्पिओ कोणाची?
वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती स्कॉर्पिओ कोणाची?
Embed widget