एक्स्प्लोर
आगामी काळात मीच वरळीचा आमदार असेन : सुनील शिंदे
सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाच्या वृत्तानंतर शिवसेनेत विशेषत: सुनील शिंदे यांच्यासह समर्थकांमध्ये अस्वस्थता असल्याचं चित्र आहे.
मुंबई : कोणाचा प्रवेश होत आहे हे माहित नाही. परंतु यापुढेही मी वरळीचा आमदार असेन, असं सूचक विधान वरळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यासंदर्भात विचारलं असता सुनील शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली. परंतु सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाच्या वृत्तानंतर शिवसेनेत विशेषत: सुनील शिंदे यांच्यासह समर्थकांमध्ये अस्वस्थता असल्याचं चित्र आहे.
सचिन अहिर आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर अहिर यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर मातोश्रीबाहेर जमले आहेत. इथे वरळीचे विद्यमान आमदार सुनील शिंदेही पोहोचले. यावेळी शिंदेंना अहिर यांच्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, "कोणाचा प्रवेश होतोय हे मला माहित नाही. सामान्य शिवसैनिकाप्रमाणे इथे आलोय. परंतु पक्षप्रमुख जो आदेश देतील, तो पक्षाच्या हिताचा असेल." तसंच "सचिन अहिर यांना उमेदवारी दिली तर तुम्ही काय करणार, या प्रश्नावर सुनील शिंदे यांनी "आगामी काळात मीच वरळीचा आमदार असेन, असं सूचक विधान केलं..
दरम्यान, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार सचिन अहिर यांचा पराभव केला होता. परंतु आता अहिर यांच्या प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभेसाठी आपलं उमेदवारीला धोका निर्माण होण्याची भीती सुनील शिंदे यांच्या मनात असल्याचं म्हटलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement