एक्स्प्लोर
मी चुकीचं काही बोलत नाही, त्यामुळं मी सिरियसली घेत नाही : रावसाहेब दानवे
मी वादग्रस्त वक्तव्य करतो, अशी माझ्यावर नेहमीच टीका होते, परंतु मी चुकीचे काही बोलत नाही, त्यामुळे मी या गोष्टींना सिरियसली घेत नाही, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
मुंबई : मी वादग्रस्त वक्तव्य करतो, अशी माझ्यावर नेहमीच टीका होते, परंतु मी चुकीचे काही बोलत नाही, त्यामुळे मी या गोष्टींना सिरियसली घेत नाही, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे. एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात ते बोलत होते.
रावसाहेब दानवे म्हणाले की, माझ्या वक्तव्यांवरुन माध्यमं अनेक बातम्या करतात, परंतु माझ्या वक्तव्यांनी मी कधीही अडचणीत येत नाही. उलट माध्यमं अडचणीत येतात. मी माझ्या लोकांना समजेल अशा भाषेत बोलतो. त्यांना ते समजतं, त्यांना त्या गोष्टी कधीच खटकत नाहीत. उलट मी केंद्रात मंत्री झालो तरीही माझे पाय जमिनीवर असल्याचा माझ्या लोकांना आनंद आहे."
दानवे म्हणाले की, "माझी भाषा माझ्या लोकांना खटकत नाही, माध्यमांना आणि विरोधकांना मात्र ती खटकते. माझी भाषा समजण्यासाठी त्यांनी चार-पाच दिवस माझ्यासोबत रहावं. त्यांना माझी भाषा समजेल."
संबधित बातम्या : मी आणि अर्जुन खोतकर कधीही भांडलो नाही : रावसाहेब दानवे
ईशान्य मुंबईचा उमेदवार उद्या ठरणार, रावसाहेब दानवेंचं स्पष्टीकरण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement