एक्स्प्लोर

Maharashtra CM Devendra Fadnavis: आता डेडलॉक संपलाय! एकनाथ शिंदेंच्या 'त्या' वाक्याचा नेमका अर्थ काय? देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग कसा मोकळा झाला?

Devendra Fadnavis may be new CM of Maharashtra: देवेंद्र फडणवीस हे आता लवकरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारतील, असे सांगितले जात आहे. लवकरच घोषणा होणार.

मुंबई: राज्यातील महायुती सरकारच्या सत्तास्थापनेसंदर्भात बुधवारी रात्री दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपचाच मुख्यमंत्री होणार ही बाब स्पष्ट झाली आहे. आता मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाची घोषणा होण्याची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. मात्र, दिल्लीतील या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची नाराज देहबोली चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आपली कोणतीही नाराजी नसल्याचे सांगत आता डेडलॉक संपल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे यांनी उच्चारलेल्या 'डेडलॉक' या शब्दाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या या विधानाचे विश्लेषण करताना 'एबीपी माझा'च्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी म्हटले की, जेव्हापासून विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हापासून मुख्यमंत्री भाजपचाच होणार, ही अपेक्षा होती. भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांचेच नाव मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर होते. परंतु, महाराष्ट्रातील राजकीय-जातीय समीकरणांचा विचार करता फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळणार की नाही, याबाबत किंतु परंतु होते. परंतु, दिल्लीतील कालच्या बैठकीने हे किंतु-परंतु संपुष्टात आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना आता डेडलॉक संपला, असा शब्द वापरला. याचा अर्थ सत्तास्थापनेत तिढा होता, हे मान्य केले. कालच्या बैठकीनंतर हा डेडलॉक संपल्याचे एकनाथ शिंदे यांना मान्य केले, याचा अर्थ कुठेतरी नाराजी होती. मात्र, भाजपच्या केंद्रातील नेत्यांच्या फोन कॉलमुळे एकनाथ शिंदे यांची नाराजी संपली, असे सरिता कौशिक यांनी म्हटले.

या विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले, त्यामुळे आता स्वत:खडे उपमुख्यमंत्रीपद घेण्याशिवाय भाजपकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. एक पक्ष म्हणून स्वत:चा विस्तार करणं हे भाजपसाठी महत्त्वाचे ध्येय आहे. इतकं मोठं यश मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांना शांत कसं बसवणार, पुन्हा त्यागाची भाषा करणे कठीण होते. त्यामुळे राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणे महत्त्वाचे होते. त्यानुसार आता भाजपने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचे ठरवले आहे. मात्र, भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. रितसर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली जाईल, असेही सरिता कौशिक यांनी सांगितले. 

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

दिल्लीतील बैठकीत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता पुढील प्रक्रिया सुरु झाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या नियुक्तीसाठी लवकरच भाजपचे केंद्रीय निरिक्षक मुंबईत येऊन मुख्यमंत्रीपदी कोण असेल याचं नाव निश्चित करुन औपचारिक घोषणा करतील. तत्पूर्वी  एकनाथ शिंदे यांनीही आपल्याला भाजप नेतृत्त्वाचा निर्णय मान्य असल्याचे सांगितले. आमची भूमिका मी काल जाहीर केली. महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा मी कालच दिलेला आहे. त्यामुळे तो डेडलॉक संपला आहे. आता भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल आणि त्यानंतर निर्णय होईल. सगळं व्यवस्थित होईल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.

आणखी वाचा

मुख्यमंत्री कोण विषय बाजूलाच राहिला , दिल्लीच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंच्या बॉडी लँग्वेजची जोरदार चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget