एक्स्प्लोर

Eknath Shinde: मुख्यमंत्री कोण विषय बाजूलाच राहिला , दिल्लीच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंच्या बॉडी लँग्वेजची जोरदार चर्चा

Eknath Shinde in Delhi: एकनाथ शिंदे यांनी आता मुख्यमंत्री नव्हे तर 'लाडका भाऊ ' ही नवी ओळख सांगायला सुरुवात केली आहे. मात्र, दिल्लीतील त्यांची हताश बॉडी लँग्वेज चर्चेचा विषय ठरली होती.

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठा  विजय मिळाल्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, याची चर्चा गेल्या तीन दिवसांपासून रंगली आहे. यासंदर्भात दिल्लीत गुरुवारी रात्री महायुतीचे प्रमुख नेते आणि अमित शाह यांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असले तरी त्याची अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे. या बैठकीपूर्वी अमित शाह शेवटच्या क्षणी महाराष्ट्रातील मराठा समीकरणाचा विचार करुन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री बाजूने कौल देऊ शकतात, अशी चर्चा होती. मात्र, या बैठकीतील छायाचित्रे बाहेर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री (Maharashtra CM) होणार, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी या बैठकीतील त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदी भाव बऱ्याच गोष्टी स्पष्ट करणार होते. याउलट काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बॉडी लँग्वेज दिल्लीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला होता.

या बैठकीवेळी अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांचे एक छायाचित्र टिपण्यात आले आहे. या छायाचित्रात अमित शाह हे देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देताना दिसत आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आहे. याउलट शेजारी उभे असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील भाव कमालीचे विरुद्ध आहेत. एरवी एकनाथ शिंदे हे नेत्यांच्या गाठीभेटी घेताना प्रचंड उत्साही असतात. मात्र, या फोटोत एकनाथ शिंदे हे शुन्यात हरवल्यासारखे उभे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर मलूल आणि उदास भाव दिसत आहेत. त्यामुळे दिल्लीतील बैठकीतील एकनाथ शिंदे यांच्या या बॉडी लँग्वेजची प्रचंड चर्चा रंगली आहे.

एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छूक होते. शिंदे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून वातावरणनिर्मिती करुन भाजपवर तसा दबावही टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, भाजपश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असा संदेश दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली होती. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. मात्र, दिल्लीच्या कालच्या बैठकीतील त्यांची बॉडी लँग्वेज वेगळेच काही संकेत देणारी ठरली.

आणखी वाचा

अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Interview : नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका

व्हिडीओ

Ind Beat Pak T20 World Cup : महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयाचा अभिषेक; पाकिस्तानवर दणदणीत विजय
Ishan Kishan Ind Beat Pak T 20 World Cup : पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या ईशान किशनची सक्सेस स्टोरी
Special Report Raut VS Thackeray : राऊतांचे ठाकरेंनाच रोखठोक सल्ले, कार्यपद्धतीवर राऊतांना प्रश्न?
Special Report Mahayuti On Satara ZP :दोघांचही लक्ष्य सातारा झेडपीचा अध्यक्ष, साताऱ्याचं समीकरण काय?
Special Report Harshwardhan Sapkal : पुण्यात घमासान , पुण्यात भाजप वि.काँग्रेस संघर्ष पेटला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Interview : नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
Ishan Kishan: इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
Pune BJP Congress Rada: पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
Ishan Kishan: संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
Embed widget