एक्स्प्लोर

मोठी बातमी! हिंगोलीत शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार राडा, ऐकमेकांना मारहाणीसह गाड्यांची तोडफोड

हिंगोली (Hingoli) जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील वाकोडी या गावात शिवसेना ठाकरे गट (shivsena thackeray group) आणि शिवसेना शिंदे गटात (sivsena shinde group) जोरदार राडा झाला आहे.

Hingoli News : राज्यात विधानासभा निवडणुकीची (Vidhansabha Election) धामधूम सुरु असताना हिंगोली (Hingoli) जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील वाकोडी या गावातून एक बातमी समोर आली आहे. या गावात शिवसेना ठाकरे गट (shivsena thackeray group) आणि शिवसेना शिंदे गटात (sivsena shinde group) जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.  आज (13 नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दोन गटात राडा झाला आहे. दोन गटातील वाद विकोपाला गेल्याने यात दोन गाड्यांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. तसेच ऐकमेकांना मारहाण देखील झाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच कळमनुरी पोलीस ठाण्यात ठाकरे गटाने ठिय्या आंदोलन करत प्रकरणाची दखल घेत कारवाईची मागणी केली आहे.

ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याला मारहाण, कळमनुरी पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्त्यांचा ठिय्या 

दरम्यान, कळमनुरी तालुक्यातील वाकोडी या गावात दोन गटात राडा झाल्यामुळं वातावरण चांगलच गरम झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार या राड्यामध्ये ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याला मारहाण झाल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे. शिवसेना आमदार संतोष बांगर आणि त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पैसे वाटप करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळं   वाकोडी गावात प्रचारासाठी पोहोचलेल्या कार्यकर्त्यांना मारहाण केली असून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान, यावर कार्यवाही करावी या मागणीसाठी ठाकरे गटाने कळमनुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत कारवाई केली जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाहीत अशी भूमिका ठाकरे गटाचे नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळं पोलीस प्रशासन आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी सुद्धा ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी केली आहे.

गाड्यांमधून दारु आणि पैशांचं वाटप, ठाकरे गटाचा आरोप 

दिवसाढवळ्या आमदाराचे लोगो लावलेल्या गाड्या येतात. या गाड्यांमध्ये दारु आणि पैसा असतो, हे लोकांवा वाटण्याचे काम सुरु असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला आहे. गाड्यांमधून 1000 रुपयांचे वाटप सुरु असल्याचे ते म्हणाले. पोलीस प्रशासन देखील काही करत नसल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय. हे सगळं थांबायला पाहिजे. हे जर तांबल नाहीतर आम्ही याला शिवसेना स्टाईलनं प्रत्युत्तर दिल्याशिवाय थांबवणार नसल्याचा इशारा देखील ठाकरे गटानं दिला आहे. अनेक ठिकाणी पैसे वाटप करण्याचे काम सुरु आहे. आमच्या गाड्यांवर हल्ला केला असल्याचे ठाकरे गटानं सांगितले. आमच्या दोन गाड्या फोडल्या आहेत. दोन कार्यकर्ते जखमी झाल्याचे ठाकरे गटांन सांगितलं आहे.   

महत्वाच्या बातम्या:

Thackeray Vs Shinde Rada: मुंबईत ठाकरे गट-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, जोगेश्वरीत मध्यरात्री जोरदार राडा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pandharpur Crime : पंढरपुरात धुलिवंदनाच्या दिवशीच गोमांस विक्री, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...; शहरात एकच खळबळ
पंढरपुरात धुलिवंदनाच्या दिवशीच गोमांस विक्री, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...; शहरात एकच खळबळ
Satara News : पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
Mark Carney : कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
Sunita Williams : सुनिता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी जमिनीवर पाय ठेवणार; एलॉन मस्क यांच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 यशस्वी झेपावले
सुनिता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी जमिनीवर पाय ठेवणार; एलॉन मस्क यांच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 यशस्वी झेपावले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 15 March 2025Anjali Damania on Santosh Deshmukh | अंजली दमानियांचा संतोष देशमुख प्रकरणावरून फोटोवरून नवा आरोपFarmer Suicide Maharashtra | राज्यात वर्षभरात 2,706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अमरावती, संभाजीनगरमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी संपवलं जीवनABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 15 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur Crime : पंढरपुरात धुलिवंदनाच्या दिवशीच गोमांस विक्री, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...; शहरात एकच खळबळ
पंढरपुरात धुलिवंदनाच्या दिवशीच गोमांस विक्री, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...; शहरात एकच खळबळ
Satara News : पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
Mark Carney : कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
Sunita Williams : सुनिता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी जमिनीवर पाय ठेवणार; एलॉन मस्क यांच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 यशस्वी झेपावले
सुनिता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी जमिनीवर पाय ठेवणार; एलॉन मस्क यांच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 यशस्वी झेपावले
Washim Crime News :  किरकोळ वाद विकोपाला; तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला, चक्क गळ्यावर...., वाशिम हादरलं!
किरकोळ वाद विकोपाला; तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला, चक्क गळ्यावर...., वाशिम हादरलं!
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Embed widget