(Source: Poll of Polls)
Himachal Pradesh Election 2022 Date : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा; असा आहे निवडणूक कार्यक्रम
Himachal Pradesh Election 2022 Date : हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
Himachal Pradesh Election 2022 Date : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) हिमचाल विधानसभा निवडणुकीची (Himachal Pradesh Election) घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेची निवडणूक एकाच टप्यात होणार आहे. आजपासून हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर आहे तर 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 8 डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशमध्ये कुणाचं सरकार होणार हे स्पष्ट होणार आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये 55 लाख 07 हजार 261 मतदार आहेत. यामध्ये 27 लाख 80 हजार पुरुष मतदार आहेत. तर 27 हजार 27 महिला मतदार आहेत. 80 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे एक लाख 22 हजार मतदार आहेत. त्याशिवाय दिव्यांग मतदारांची संख्या 56 हजार इतकी आहे. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांची संख्या एक लाख 86 हजार इतकी आहे.
हिमाचल प्रदेशमधील राजकीय पक्ष, राज्य निवडणूक आयोगाकडून यासंबंधी माहिती व अहवाल मागवण्यात आले होते. त्यावर चर्चा केल्यानंतर मतदानाचे वेळापत्रक आखण्यात येत आहे. उत्सवांच्या तारखा लक्षात घेऊन मतदानाचे दिवस निश्चित करण्यात आहे.
हिमाचल विधानसभेचा कार्यकाळ जानेवारीला संपतो आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे. हिमाचलमध्ये 2017 च्या विधानसभा निवडणुका चार टप्प्यात झाल्या. निवडणुकीत भाजपने 68 पैकी 44 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. आता यंदाच्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या हिमाचलमध्ये एकूण 68 जागा आहेत. बहुमतासाठी 35 जागांची गरज आहे. हिमाचलमध्ये सध्या 53 लाख 76 हजार 77 रजिस्टर्ड मतदार आहेत. 2017 साली झालेल्या निवडणुकीत 75.28 टक्के मतदान झाले.
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांची घोषणा, पाहा तारखा
एकाच टप्प्यात मतदान होणार
अर्ज भरण्याची सुरुवात- 17 ऑक्टोबर 2022
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 25 ऑक्टोबर 2022
अर्जाची छानणी- 27 ऑक्टोबर 2022
नाव माघारी घेण्याची मुदत- 29 ऑक्टोबर 2022
मतदान- 12 नोव्हेंबर 2022
मतमोजणी/निकाल- 8 डिसेंबर 2022
Schedule for GE to the Legislative Assembly of Himachal Pradesh.
— Election Commission of India #SVEEP (@ECISVEEP) October 14, 2022
#AssemblyElections #ECI pic.twitter.com/UnSu7eN19p