एक्स्प्लोर

Hatkanangale Lok Sabha Result 2024 : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या धैयशील मानेंचा विजय, ठाकरेंच्या सत्यजीत पाटलांचा 14 हजार मतांनी पराभव

Hatkanangale Lok Sabha Election Result 2024 : राज्यातील सर्वाधिक मतदान झालेल्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हातकणंगलेत सत्यजीत पाटील, धैर्यशील माने आणि राजू शेट्टी अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली.

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा अंतिम निकाल (Hatkanangale Lok Sabha Election Result 2024) हाती आला असून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांनी बाजी मारली आहे. अतितटीने झालेल्या निवडणुकीत माने यांनी ठाकरे गटाचे सत्यजीत पाटील यांचा 14 हजार मतांनी पराभव केला आहे. 

राज्यातील उस पट्ट्यातील राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू म्हणजे हातकणंगले (Hatkanangale Lok Sabha Constituency). उसाच्या आणि दुधाच्या राजकारणाचा थेट परिणाम इथल्या निवडणुकीवर होतो. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत मात्र हातकणंगलेच्या राजकारणाची दिशा बदलल्याचं दिसून आलं. त्याचाच परिणाम म्हणून ठाकरे गटाकडून ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात आलेले माजी आमदार सत्यजित पाटील (Satyajeet Patil) यांनी विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) आणि राजू शेट्टी यांनी जोरदार लढत देत प्रचारात आघाडी घेतली. शेवटी धैर्यशील माने यांनी बाजी मारली.

हातकणंगले लोकसभा निकाल 2024 (Hatkanangale Lok Sabha Election Result 2024) 

उमेदवाराचे नाव पक्ष  विजयी उमेदवार
सत्यजीत पाटील शिवसेना ठाकरे गट  
धैर्यशील माने शिवसेना शिंदे गट                धैर्यशील माने
राजू शेट्टी अपक्ष- स्वाभिमानी शेतकरी संघटना  

मतदानामध्ये हातकणंगले टॉप 3 मध्ये 

हातकणंगले मतदारसंघ हा राज्यातील शेवटचा म्हणजे 48 व्या क्रमांकाचा मतदारसंघ. या ठिकाणचे मतदार हे राजकीयदृष्ट्या अधिक सजग असल्याचं दिसतंय. त्यामुळे गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी देखील हातकणंगलेकरांनी भरघोस मतदान केलं. यंदा हातकणंगलेत 71. 11 टक्के मतदान झालं असून गडचिरोली आणि कोल्हापूरनंतर हे तिसऱ्या क्रमांकाचं मतदान आहे. गेल्यावेळच्या तुलनेत यंदा एक टक्का मतदान जास्त झालं आहे.  

कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदान? (Hatkanangale Lok Sabha Voting Percentage 2024) 

एकूण मतदान - 71.11

हातकणंगले 70.00 टक्के

इचलकरंजी 66.05 टक्के

इस्लामपूर 67.20 टक्के

शाहूवाडी 70.96 टक्के

शिराळा 65.96 टक्के

शिरोळ 68.00 टक्के

कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?

हातकणंगले - आमदार राजू आवळे, काँग्रेस
इचलकरंजी- आमदार प्रकाश आवाडे, अपक्ष
शाहूवाडी- आमदार विनय कोरे, जनसुराज्य पक्ष - भाजपला पाठिंबा
शिरोळ- आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष - शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा
इस्लामपूर - आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
शिराळा- आमदार मानसिंगराव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 

2019 सालचा निवडणूक निकाल - (Hatkanangale Lok Sabha Constituency 2019 Result)

- धैर्यशील माने (शिवसेना) - 5,85, 776 (46.78 %)
- राजू शेट्टी (स्वाभिमानी) - 4,89,737 (39.11%)

2019 साली धैर्यशील माने - 96,039 मतांनी विजयी

हातकणंगलेची निवडणूक रंगतदार

गेल्या निवडणुकीवेळी अशाच पद्धतीने ऐनवेळी धैर्यशील मानेंचं नाव समोर आलं, त्यांना शिवसेनेकडून तिकीट मिळालं आणि त्यांनी निवडणूक जिंकलीही. आता तसंच काहीसं चित्र आहे. सुरूवातीपासूनच शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने विरूद्ध स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यातच लढत होणार हे गृहीत धरण्यात आलेलं. पण महाविकास आघाडीकडून ऐनवेळी सत्यजीत पाटलांच्या रुपात नवीन चेहरा देण्यात आला आणि लढत रंगतदार बनली. 

ग्रामपंचायतीप्रमाणे चुरशीने मतदान

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शाहूवाडी आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघात तर ग्रामपंचायतीप्रमाणे चुरशीने मतदान झालं. त्याचा सर्वाधिक फायदा हा शिवसेना ठाकरे गटाच्या सत्यजीत पाटलांना आणि त्यानंतर शिंदे गटाच्या धैर्यशील मानेंना झाल्याची चर्चा आहे.

दरवेळीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत उसदराचा प्रश्न हा प्रचाराच्या केंद्रस्थानी नव्हता हे विशेष. शिवसेनेच्या फुटीनंतर धैर्यशील माने यांनी एकनाथ शिंदे यांना साथ द्यायचा निर्णय घेतल्यानंतर इथले शिवसैनिक प्रचंड नाराज झाले. त्याचसोबत उद्धव ठाकरे यांना असलेल्या सहानुभूतीचा परिणाम यंदा मतदानातून दिसून आल्याची चर्चा आहे. त्याचा फायदा सत्यजीत पाटील यांना झाल्याचं सांगितलं जातंय.  

मराठा कार्ड यावेळी फायदेशीर ठरल्याची चर्चा (Maratha Card In Maharashtra Politics)

गेल्यावेळच्या निवडणुकीप्रमाणे, यंदाही मराठा कार्ड राजकारण महत्त्वाचं ठरल्याची चर्चा आहे. मात्र यंदा मराठा समाजाचे सत्यजीत पाटील आणि धैर्यशील माने असे दोन उमेदवार असल्याने त्याच्यामध्ये या मतांसाठी चढाओढ झाल्याचं पाहायला मिळालं. 

मराठा मतांप्रमाणे हातकणंगलेमध्ये जैन समाजाचं मोठं आणि निर्णायक आहे. ही सर्व मतं राजू शेट्टींच्या पारड्यात जाणार अशी चर्चा असतानाच या ठिकाणी विंचितने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डीसी पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे जैन मतांचंही विभाजन झाल्याचं दिसून आलं.

राजू शेट्टींचं गणित बिघडलं

महाविकास आघाडीने ऑफर देऊनही राजू शेट्टी यांनी 'एकला चलो'ची भूमिका घेतली आणि त्यामुळे त्यांचं राजकीय गणित बिघडल्याची चर्चा आहे. शेट्टींनी शेवटपर्यंत महाविकास आघाडीमध्ये न येण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरेंनी या ठिकाणी नवीन चेहरा दिला. त्यामुळे सुरुवातीला विजयाचा विश्वास असणाऱ्या राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांचा मात्र जसजशी निवडणूक पुढे जाईल तसतसा आत्मविश्वास ढळू लागल्याचं दिसून आलं. 

ही बातमी वाचा : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget