एक्स्प्लोर

इंदापूर शहरात झळकले हर्षवर्धन पाटलांच्या भाजप प्रवेशाचे फलक

हर्षवर्धन पाटील यांनी 3 सप्टेंबरला इंदापूर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. उद्या दुपारी मुंबईच्या गरवारे क्लब येथे होणाऱ्या भाजपच्या मेगा भरतीत हर्षवर्धन पाटील कमळ हाती घेणार हाती घेणार असल्याची चर्चा आहे.

इंदापूर : काँग्रेसचे नेते, माजी संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरल्या नंतर इंदापूर शहरात हर्षवर्धन पाटलांच्या भाजप प्रवेशाचे फलक झळकले आहेत. कार्यकर्त्यांकडून बॅनर लावून भाजप प्रवेशासाठी हर्षवर्धन पाटील यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी 3 सप्टेंबरला इंदापूर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. उद्या दुपारी मुंबईच्या गरवारे क्लब येथे होणाऱ्या भाजपच्या मेगा भरतीत हर्षवर्धन पाटील कमळ हाती घेणार हाती घेणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभीमीवर इंदापूर मधून त्यांचे कार्यकर्ते आपला पाठींबा दर्शवत आहेत. उद्या दुपारी हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा असल्याने आतापासूनच इंदापूर शहरात त्यांच्या कार्यकर्त्यांकडून भाजप प्रवेशाबद्दल स्वागताचे फलक लावण्यात येत आहेत. या फलकावर भाजपच्या बड्या नेत्यांसोबत हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोटो झळकलेले दिसत आहेत. हर्षवर्धन पाटील यांचे हजारो कार्यकर्ते उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. उद्या बुधवारी भाजपाची तिसरी मेगाभरती मुंबईच्या गरवारे क्लब येथे दुपारी 3 वाजता होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील बडे नेते, माजी मंत्री गणेश नाईक, मुंबईतील काँग्रेस नेते, माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्यासह इंदापूरचे काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, साताऱ्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडणार आहे. मेगाभरतीशिवाय विरोधी पक्षातील अनेक भाजप-शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठी नवीन उमेदवार शोधणे काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर मोठं आव्हान असणार आहे. हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत अजूनही आशावादी : पृथ्वीराज चव्हाण

महत्त्वाच्या बातम्या

पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
Satej Patil: महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget