Election Result 2022 : चार राज्यात भाजपला घवघवीत यश, पंतप्रधान मोदी कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
Election Result 2022 : उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झाला आहे.
Election Result 2022 : उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झाला आहे. भाजपने चार राज्यात सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तर पंजाबच्या जनतेनं अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला कौल दिला आहे. पाच राज्यातील निवडणूक निकालातील कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. यावेळी गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेता उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी सात वाजता दिल्लीमधील भाजपच्या मुख्यलयातून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी पाच राज्यातील पक्षाच्या कामगिरीवर पंतप्रधान बोलण्याची शक्यता आहे. पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करु शकतात.
Prime Minister Narendra Modi will address BJP workers from the Party HQ in Delhi at around 7 pm: Sources#AssemblyElections2022
— ANI (@ANI) March 10, 2022
(File photo) pic.twitter.com/ZLKVAC3Dek
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांचा जादू पुन्हा चालली आहे. योगींच्या मॅजिकपुढे विरोधकांची अवस्था दयनीय झाली आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस आणि बसपाचा सूपडा साप झाला आहे. या दोन्ही पक्षांना दुहेरी संख्याही गाठता आली नाही. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने तोकडी फाईट दिली, पण भाजपला सत्तास्थापणेपासून राखू शकले नाहीत.
आणखी वाचा :
UP Election Result 2022: यूपीत योगींचा दबदबा, एक लाखांहून अधिक मतांनी विजयी; चंद्रशेखर आझाद यांचं डिपॉझिट जप्त
Up Election Result 2022: उत्तर प्रदेशात काँग्रेस-बसपा पुन्हा फेल, 2017 च्या तुलनेत या निवडणुकीत अशी होती कामगिरी
UP Election Result 2022 : उत्तरप्रदेशमध्ये भाजपचा विजय, लातूरमध्ये योगींची वेशभूषा घेत अवतरले बुलडोझर बाबा
UP Election Result : उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची दयनीय अवस्था, प्रियंका गांधींची जादूही फिकी
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live