एक्स्प्लोर

Dhule Election Update : 60 टक्के मतदान झाल्याचा अंदाज

भाजपमधील अंतर्गत वादामुळे चर्चेत असलेली आणि राज्यभराचे लक्ष लागून असलेल्या धुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.

धुळे : धुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत 11 टक्के मतदान झाले आहे. आमदार अनिल गोटे यांच्या वाहनावर हल्ला झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले आहे.या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त आहे. व्हिडीओ कॅमेऱ्यासोबतच ड्रोन कॅमेराने देखील मतदान केंद्रावर नजर ठेवण्यात येत आहे. LIVE UPDATE
  • 60 टक्के मतदान झाल्याचा अंदाज, आयुक्त सुधाकर देशमुख यांची माहिती
  • दुपारी साडेतीन पर्यंत 35 टक्के मतदान
  • दुपारी दीड वाजेपर्यंत 25 टक्के मतदान
  • आमदार अनिल गोटेंनी केलं मतदान
  • महापालिका निवडणुकीसाठी 13 तृतीयपंथी मतदारांपैकी 9 तृतीयपंथीयांनी एकत्र येऊन मतदानाचा हक्क बजावला
  • नागरिकांना निर्भयपणे मतदान करण्याचं सुभाष भामरेंचं आवाहन
  • संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनीही मतदानाचा हक्क बजावला
  • सकाळी 11.30 पर्यंत 11 टक्के मतदान
  • मतदानाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
  • धुळ्यात पहिल्या 2 तासात 7 टक्के मतदान
  • धुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.
आमदार गोटे यांच्या गाडीवर दगडफेक, मतदानाला सुरुवात भाजपमधील अंतर्गत वादामुळे चर्चेत असलेली आणि राज्यभराचे लक्ष लागून असलेल्या धुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला भाजपच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या आमदार अनिल गोटे यांच्या वाहनावर हल्ला झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले आहे. शनिवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास कल्याण भवन जवळ दोन जणांनी दुचाकीवरून येऊन दगडफेक केली. या घटनेत वाहनाचे पुढील काच फुटले. मात्र यावेळी गोटे गाडीमध्ये नसल्याने बचावले. मात्र त्यांच्या गाडीवर दगड फेकले त्यावेळी ते धावले असता त्यांना दम्याच्या त्रास सुरू झाला आणि त्यांचा बीपी वाढल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान भाजपच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला असल्याचा आरोप आमदार गोटे यांनी केला असून मी गुन्हा दाखल करणार नाही. कारण पोलिसांना भाजपनं मॅनेज केलंय, असा आरोपही त्यांनी केला आहे. गोटे हे कल्याण भवन येथे असताना त्यांचे चालक साजिद खान हे वाहन क्रमांक एमएच 18 एजे 3366 कल्याण भवन परिसरातून बाहेर काढत होते. यावेळी दोन जण दुचाकीवर आले. त्यांनी समोरून चालकाशेजारील बाजूला काचावर दगडफेक केली आणि काही क्षणात ते फरार झाले. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी आमदार गोटे यांच्या समर्थकांकडून भाजपच्या नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे काही प्रमाणात तणाव वाढला असून तणावपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. धुळे महानगरपालिकेसाठी उद्या मतदान, प्रशासन सज्ज भाजपच्या अंतर्गत वादामुळे राज्यभर चर्चेत असलेल्या या निवडणुकीसाठी 450 बूथवर मतदान होत आहे. त्यातील 120 मतदान केंद्र संवेदनशील तर 19 मतदान केंद्र ही अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त आहे. व्हिडीओ कॅमेऱ्यासोबतच ड्रोन कॅमेराने देखील मतदान केंद्रावर नजर ठेवण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी एक पोलीस अधीक्षक, एक एडिशनल एसपी, 4 डीवायएसपी, शंभर अधिकारी आणि दीड हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. धुळे आणि जळगाव या दोन जिल्ह्यातून अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे. धुळे महानगरपालिकेत 74 जागा आहेत. यापैकी 73 जागांसाठी मतदान होत आहे. यातील एक जागा बिनविरोध आली आहे. प्रभाग 12 मधीप अ मध्ये समाजवादी पक्षाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. 3 लाख 29 हजार 569 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये पुरुष मतदार 1 लाख 74 हजार 696 तर महिला मतदार 1 लाख 54 हजार 807 असतील तर (तृतीयपंथी) इतर मतदार 13 आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर 6 कर्मचारी आहेत. तर 450 ईव्हीएम मशीनवर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. 10 टक्के ईव्हीएम मशीन एखाद्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास राखीव आहेत. गत महापालिका निवडणुकीत 62 टक्के मतदान झाले होते. यावर्षी भाजपचे आमदार अनिल गोटे यांनीच भाजपच्या विरोधात शड्डू ठोकल्याने लढत अधिक चुरशीची झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget