एक्स्प्लोर

Election Commission: विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोपांप्रकणी निवडणुक अधिकाऱ्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले.. 

Vinod Tawde in Virar : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर बहुजन विकास आघाडीने पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप केलाय. याप्रकरणी आता निवडणुक अधिकाऱ्यानी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 विरार: विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना वसई-विरारमध्ये अभूतपूर्व राडा झाला आहे. यात भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे हे 5 कोटी रुपये वाटत असताना सापडल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीच्या (BVA) कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेमुळे राज्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. विरार पूर्वेला मनोरीपाडा येथील विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे (Vinod Tawde) आले होते. याठिकाणी भाजपचे स्थानिक उमेदवार राजन नाईक (Rajan Naik) आणि भाजपचे काही पदाधिकारी हजर होते. विनोद तावडे यांना पदाधिकाऱ्यांना देण्यासाठी 5 कोटी रुपये घेऊन आल्याचा आरोप बविआकडून करण्यात आला. विनोद तावडे हे हॉटेलमध्ये असताना हितेंद्र  ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर आणि बविआचे कार्यकर्ते याठिकाणी येऊन धडकले आणि त्यानंतर विवांता हॉटेलमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

फ्लायींग स्कॉड घटनास्थळी दाखल 

दरम्यान, या प्रकरणावर आता अतिरीक्त मुख्य निवडणुक अधिकारी डॉ किरण कुलकर्णी यांनी भाष्य करत या संदर्भातील माहिती दिली आहे. विनोद तावडे प्रकरण संदर्भात फ्लायींग स्कॉड घटनास्थळी पोहचले आहे. दरम्यान, निवडणुकीच्या काळात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे. पोलिस अधिकारी या संदर्भात चौकशी करून कार्यवाही करत आहे. उमेदवाराला 48 तासात त्या मतदारसंघात जाता येत नाही. त्यामुळे या संदर्भात ही चौकशी केली जाईल असेही डॉ. किरण कुलकर्णी म्हणाले. ⁠माहीती मिळताच या ठिकाणी निवडणूक अधिकारी पोहचले असून नियमानुसार आता कारवाई केली जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली आहे. 

विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया-

सदर सर्वप्रकरणावर विनोद तावडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी इथल्या कार्यकर्त्यांना मतदानासंदर्भात माहिती द्यायला आलो होतो. बहुजन विकास आघाडीच्या लोकांचा गैरसमज झाला, की मी पैसे आणले. त्यांनी सगळं तपासलं पण काहीच पैसे मिळाले नाही. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासावे. सगळं गैरसमजातून झालं, असं विनोद तावडे यांनी सांगितले.

मला भाजपवाल्यांनीच सांगितलं- हितेंद्र ठाकूर

विनोद तावडे 5 कोटी घेऊन येतायत हे भाजपवाल्यांनीच मला सांगितलं. मला वाटलं विनोद तावडे राजकीय नेते आहे, हे असं छोटं काम करणार नाही. मात्र आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आले तेव्हा ते हॉटेलमध्ये पैसे वाटत होते, असा गौप्यस्फोट हितेंद्र ठाकूर यांनी केला. तसेच हॉटेलमधील सीसीटीव्ही बंद होता. आम्ही आल्यानंतर सीसीटीव्ही चालू केला. हॉटेल मालकांनी असं का केलं, हे त्यांनाच विचारा...सीसीटीव्ही बंद केला, त्यामुळे हॉटेल मालकावर देखील गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी हितेंद्र ठाकूर यांनी केली.  

संबंधित बातमी:

Vinod Tawde: माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Hanumant Pawar : मतदार याद्यांवरून विरोधक आक्रमक, ठाकरे-काँग्रेस एकत्र
Zero Hour Gajanan Kale vs Navnath Ban : मतदारयाद्यांच्या घोळावरुन काळे-बन आमनेसामने
Zero Hour Gajanan Kale : मतदारयाद्यांच्या पडताळणीला भाजप-शिंदेंच्या सेनेचा आक्षेप का?
Zero Hour Susieben Shah : सत्याचा नाही तर सत्तेसाठी मोर्चा,सुसीबेन शाहांचा हल्लाबोल
Pawar vs Mohol: 'अध्यक्ष म्हणून मी देखील जबाबदार', ऑलिम्पिक संघटनेवरून Ajit Pawar यांना Sandeep Joshi यांचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
Rohit Arya Encounter: चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
Mumbai Powai Encounter: किडनॅपर रोहित आर्यचा एन्काऊंटर, पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू, हल्ल्यात ज्येष्ठ महिलेसह लहान मुलगी जखमी
मोठी बातमी : किडनॅपर रोहित आर्यचा एन्काऊंटर, पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू, हल्ल्यात ज्येष्ठ महिलेसह लहान मुलगी जखमी
Embed widget