एक्स्प्लोर

दापोली ते पैठण! कुठे मुलगा तर कुठे भाऊ, शिंदेंच्या शिवसेनेत अनेक जागांवर प्रस्थापितांच्या पुढच्या पिढीला तिकीट!

Eknath Shinde Shivsena Candidate List : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 45 उमेदवारांचा समावेश आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत नेत्यांना आपला उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यामुळे आता राज्यातील प्रमुख पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. शिवसेना (शिंदे गट) पक्षानेही आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 45 उमेदवार आहेत. पहिल्या यादात शिंदे गटाने काही जागांसाठी पक्षातील नेत्यांच्या मुलांना तसेच भावांना तिकीट दिले आहे. 

शिवसेना पक्षात दुसरी पिढी सज्ज

महायुतीचा भाग असलेल्या भाजपाने याआधी आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) पक्षानेही आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 45 नावे आहेत. या यादीत अनेक जागांवर राजकीय संबंध असणाऱ्या कुटुंबातच तिकीट देण्यात आले आहे. दर्यापूर,  दापोली, राजापूर, पैठण अशा मतदारसंघांचा यात समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेतील (शिंदे गट) प्रस्थापित नेत्यांची पुढची पिढी राजकारणात येण्यास सज्ज झाली आहे. 

कुठे मुलाला तर कुठे भावाला तिकीट 

एकनाथ शिंदे यांनी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघासाठी अभिजित अडसूळ यांना तिकीट दिले आहे. ते माजी मंत्री आनंदराव अडसूळ यांचे पुत्र आहेत. एरंडोल या मतदारसंघासाठी शिंदे यांनी अमोल पाटील यांना संधी दिली आहे. ते  चिमणराव पाटील यांचे पुत्र आहेत. पैठण या जागेची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. या जागेसाठी शिवसेनेने विलास भुमरे यांना तिकीट दिले आहे. ते खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र आहेत. कोकणातील दापोली या जागेसाठी योगेश कदम यांना तिकीट देण्यात आलंय. ते माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आहेत. कोकणातील राजापूर या जागेसाठी किरण सामंत यांना शिंदे यांनी संधी दिली आहे. ते मंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत. तसेच दिवंगत आमदार अनिल बाबर पुत्र सुहास बाबर यांनादेखील तिकीट देण्यात आलंय. 

मनसे, वंचितकडूनही अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर

दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. मात्र या दोन्ही आघाड्यांनी आपला जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप घोषित केलेला नाही. बुधवारी (23 ऑक्टोबर) किंवा गुरुवारी (24 ऑक्टोबर) या दोन्ही आघाड्या याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. भाजपा, शिवसेना या दोन पक्षांव्यतिरिक्त मनसेनेही आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघातून तिकीट देण्यात आलंय. वंचित बहुजन आघाडी या पक्षानेदेखील अनेक जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. 

हेही वाचा :

Maharashtra breaking News Live Updates : कोल्हापूर उत्तरमधील शिवसेना शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर अजूनही वेटिंगवरच

Maharashtra Assembly Election 2024: धनंजय मुंडेंच्या मतदारसंघाबाबत मोठा निर्णय, परळी विधानसभेतील 112 मतदान केंद्रे अतिसंवेदनशील कॅटेगरीत, आता काय होणार?

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Embed widget