एक्स्प्लोर

शरद पवारांचे हात बळकट करणार, डॉ. अमोल कोल्हेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

'तरुणांना विधायक वाटेची गरज आहे असे वाटतं. ही जाणीव फक्त शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहे. देशपातळीवरची दिशा बदलत आहे आणि यामध्ये माझा खारीचा वाटा असावा, म्हणून मी आज हा निर्णय घेत आहे' अशा भावना डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना व्यक्त केल्या.

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे. अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत कोल्हेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे. 'अनेकांना हा प्रश्न पडला असेल, की मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश का केला? शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी, मराठी माणसाला बळ देण्यासाठी मी पक्षप्रवेश केला. अजित दादांनी मला कायम मार्गदर्शन केलं. या पक्षात प्रवेश करताना खरोखरच आनंद होत आहे. लहानपाणी ज्या पवार साहेबांची छबी पाहण्यासाठी पळत होतो, त्यांच्याच पक्षात प्रवेश करतोय' अशा भावना डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना व्यक्त केल्या. 'तरुणांना विधायक वाटेची गरज आहे असे वाटतं. ही जाणीव फक्त शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहे. देशपातळीवरची दिशा बदलत आहे आणि यामध्ये माझा खारीचा वाटा असावा, म्हणून मी आज हा निर्णय घेत आहे' असंही डॉ. अमोल कोल्हे म्हणाले. शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची चिन्हं आहेत. तसं झाल्यास शिवसेनेचे विद्यमान खासदार आढळराव पाटलांना जोरदार टक्कर मिळेल. डॉ. अमोल कोल्हे यांच्याबरोबर बदनापूरचे माजी आमदार अरविंद चव्हाण, किशोर प्रकाश पाटील, नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे यश मिलिंद पाटील, महाराष्ट्र भाजपच्या डॉक्टर सेलचे उपाध्यक्ष हर्षल यशवंत पवार यांनी आज राष्ट्रवादी काँगेसमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वीच अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर कोल्हेंच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आलं होतं. डॉ. अमोल कोल्हेंचा राजकीय प्रवास डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर कोल्हेंच्या लोकप्रियतेचा फायदा घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधलं होतं. 19 मार्च 2014 रोजी कोल्हेंनी शिवसेनेचा भगवा हाती धरला होता. प्रत्यक्षात त्यावेळी ते मनसेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती. 2014 मधील विधानसभा निवडणुकांच्या वेळी कोल्हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. डॉ. अमोल कोल्हेंच्या वक्तृत्वशैलीमुळे श्रोते त्यांच्या भाषणांना आवर्जून उपस्थित राहत. मात्र पुणे महापालिका निवडणुकांच्या वेळी कोल्हेंची जादू फारशी चालली नाही. अमोल कोल्हे यांनी 2015 पासून शिवसेनेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागाचं संपर्कप्रमुख पद सांभाळलं होतं. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेनेची झालेली पिछेहाट पाहून या पराभवाची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. 'आदरणीय उद्धवसाहेब, आपण माझ्यावर विश्वास दाखवून फार मोठी जबाबदारी सोपवली होती. वेळोवेळी आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभेही राहिलात. परंतु आपला विश्वास सार्थ ठरवण्यात मी अपयशी ठरलो. इतर कोणालाही दोष न देता मी या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो' असं पत्र फेब्रुवारी 2017 मध्ये कोल्हेंनी लिहिलं होतं. डॉ. अमोल कोल्हे यांनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. मात्र स्टार प्रवाह वाहिनीवरील राजा शिवछत्रपती मालिकेतील शिवरायांच्या भूमिकेमुळे ते नावारुपाला आले. कलर्स वाहिनीवर वीर शिवाजी ही त्यांची हिंदी मालिकाही गाजली होती. छत्रपती संभाजी राजे मालिकेत सध्या डॉ. कोल्हे हे शंभूराजेंची भूमिका साकारत आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs AUS: रोहित शर्माच्या दुसऱ्या वनडेत खेळण्यावर प्रश्नचिन्ह, टीम इंडिया ॲडिलेडमध्ये 'या' 11 खेळाडूंसह मैदानात उतरणार
रोहित शर्माबाबत रिपोर्टमध्ये मोठा दावा, दुसऱ्या वनडेतून बाहेर? प्लेईंग 11 मध्ये कोणाला संधी?
Bihar Election : महाराष्ट्रात लाडक्या बहिणींची ताकद दिसली, बिहारमध्ये महिलांना उमेदवारी देण्यात कोणता पक्ष आघाडीवर?
महाराष्ट्रात लाडक्या बहिणींनी ताकद दाखवली, बिहारमध्ये महिलांना उमेदवारी देण्यात कोण आघाडीवर?
Ravindra Dhangekar : एकनाथ शिंदे यांचं नेहमी पाठबळ मिळेल हा विश्वास, लढत राहील धंगेकर म्हणत रविंद्र धंगेकरांची नवी पोस्ट...
एकनाथ शिंदे यांचं नेहमी पाठबळ मिळेल हा विश्वास, लढत राहील धंगेकर म्हणत रविंद्र धंगेकरांची नवी पोस्ट...
कर्करोगाशी लढण्यात योग आणि आयुर्वेद ठरले आधार! वेलनेसमुळं रुग्ण बरे होऊन परतले,  पतंजलीचा दावा
कर्करोगाशी लढण्यात योग आणि आयुर्वेद ठरले आधार! वेलनेसमुळं रुग्ण बरे होऊन परतले, पतंजलीचा दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kalyan Crime News : कल्याणमध्ये तुफान राडा, पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
Mahayuti : 'ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये BJP स्वबळावर लढणार', मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा
MVA Rift: 'उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही', Bhai Jagtap यांच्या खळबळजनक विधानाने आघाडीत बॉम्ब
Mumbai Kabutarkhana Row: 'प्रसंगी शस्त्र उचलू', Dadar कबूतरखाना बंदीवर जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांचा इशारा
Thackeray Brothers : 'दोन्ही भाऊ सतत भेटणार, राजकीय अर्थ काढू नका', MNS नेते Avinash Jadhav यांचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs AUS: रोहित शर्माच्या दुसऱ्या वनडेत खेळण्यावर प्रश्नचिन्ह, टीम इंडिया ॲडिलेडमध्ये 'या' 11 खेळाडूंसह मैदानात उतरणार
रोहित शर्माबाबत रिपोर्टमध्ये मोठा दावा, दुसऱ्या वनडेतून बाहेर? प्लेईंग 11 मध्ये कोणाला संधी?
Bihar Election : महाराष्ट्रात लाडक्या बहिणींची ताकद दिसली, बिहारमध्ये महिलांना उमेदवारी देण्यात कोणता पक्ष आघाडीवर?
महाराष्ट्रात लाडक्या बहिणींनी ताकद दाखवली, बिहारमध्ये महिलांना उमेदवारी देण्यात कोण आघाडीवर?
Ravindra Dhangekar : एकनाथ शिंदे यांचं नेहमी पाठबळ मिळेल हा विश्वास, लढत राहील धंगेकर म्हणत रविंद्र धंगेकरांची नवी पोस्ट...
एकनाथ शिंदे यांचं नेहमी पाठबळ मिळेल हा विश्वास, लढत राहील धंगेकर म्हणत रविंद्र धंगेकरांची नवी पोस्ट...
कर्करोगाशी लढण्यात योग आणि आयुर्वेद ठरले आधार! वेलनेसमुळं रुग्ण बरे होऊन परतले,  पतंजलीचा दावा
कर्करोगाशी लढण्यात योग आणि आयुर्वेद ठरले आधार! वेलनेसमुळं रुग्ण बरे होऊन परतले, पतंजलीचा दावा
Gold Rate: सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, अमेरिका-ब्रिटनमध्ये भूकंप, भारतात उद्या काय घडणार? 
सोने दरात 12 वर्षातील सर्वात मोठी घसरण, अमेरिका-ब्रिटनमध्ये दर पडले, भारतात काय घडणार?
BMC Election : ठाकरे बंधू सोबत नकोत, भाई जगतापांची भूमिका; अमराठी मतांची सांगड घालताना काँग्रेसची तारांबळ होणार? 
ठाकरे बंधू सोबत नकोत, भाई जगतापांची भूमिका; अमराठी मतांची सांगड घालताना काँग्रेसची तारांबळ होणार? 
तक्रार करूनही दखल नाही, निवडणूक आयोगावर बनवाबनवीचा आरोप; बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे-खताळ सामना रंगला
तक्रार करूनही दखल नाही, निवडणूक आयोगावर बनवाबनवीचा आरोप; बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे-खताळ सामना रंगला
PAK vs SA : रबाडानं पाकिस्तानच्या गोलंदाजांना रडवलं नंतर दक्षिण आफ्रिकेसमोर पाकच्या टॉप ऑर्डरचं लोटांगण, पराभवाचं सावट
अकराव्या स्थानावर फलंदाजीला आलेल्या रबाडाचं अर्धशतक, पाकिस्तानच्या गोलंदाजांना रडवलं, आता टॉप ऑर्डर फेल
Embed widget