एक्स्प्लोर
MVA Rift: 'उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही', Bhai Jagtap यांच्या खळबळजनक विधानाने आघाडीत बॉम्ब
महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. काँग्रेस नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी मुंबईत शिवसेना (UBT) किंवा मनसे (MNS) सोबत आघाडी करण्यास स्पष्ट नकार दिला आहे, तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे स्वागत करण्याची भूमिका मांडली आहे. भाई जगताप यांनी 'राज ठाकरे सोडा, आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही मुंबईत निवडणूक लढणार नाही' असे खळबळजनक विधान केले आहे. स्थानिक निवडणुका कार्यकर्त्यांसाठी असतात आणि मुंबईतील कार्यकर्त्यांची शिवसेनेसोबत जाण्याची मानसिकता नाही, त्यामुळे काँग्रेसने स्वबळावर लढावे, असे मत जगताप यांनी मांडले आहे. त्यांच्या या भूमिकेला पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतील बहुतांश नेत्यांचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो अंतिम असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

















