एक्स्प्लोर
Mumbai Kabutarkhana Row: 'प्रसंगी शस्त्र उचलू', Dadar कबूतरखाना बंदीवर जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांचा इशारा
मुंबईतील दादर येथील कबूतरखाना (Dadar Kabutar Khana) बंद केल्याच्या निर्णयावरून जैन समाजात तीव्र नाराजी आहे, या वादात आता जैन मुनी नीलेशचंद्र विजय (Jain Muni Nileshchandra Vijay) यांनी उडी घेतली आहे. 'गरज पडली तर धर्मासाठी शस्त्रही उचलू शकतो', असा थेट इशारा नीलेशचंद्र विजय यांनी दिला आहे. यासोबतच, कबूतरखान्यांवरील बंदीच्या निर्णयाविरोधात १ नोव्हेंबरपासून मुंबईच्या आझाद मैदानावर (Azad Maidan) उपोषण सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. यापूर्वीही, मुंबई महानगरपालिकेने (BMC) कबूतरखाना बंद करण्याचा प्रयत्न केला असता जैन समाजाने आंदोलन करून तो हाणून पाडला होता. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असून, मानवी आरोग्य महत्त्वाचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
सांगली
राजकारण
Advertisement
Advertisement

















