एक्स्प्लोर
औरंगाबादच्या जागेवरुन वंचित बहुजन आघाडीमध्ये धुसफूस?
वंचित बहुजन आघाडीने औरंगाबादच्या जागेसाठी बी जी कोळसे पाटील यांचं नाव घोषित केलं आहे. मात्र हे नाव एमआयएमला मान्य नाही.
औरंगाबाद : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये एका उमेदवारावरुन धुसफूस सुरु असल्याची चर्चा आहे. औरंगाबाद लोकसभेच्या जागेवरुन हा वाद सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीने माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र याचवेळी एमआयएमनेही औरंगाबादमध्ये उमेदवार देण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात एमआयएमच्या कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली आणि त्यात औरंगाबादमध्ये उमेदवार देण्याची मागणी करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीने औरंगाबादच्या जागेसाठी बी जी कोळसे पाटील यांचं नाव घोषित केलं आहे. मात्र हे नाव एमआयएमला मान्य नाही. जाहीर केलेला उमेदवार जिल्ह्यातील आणि एमआयएमचा असावा अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. तर कोळसे पाटील यांचं काम हे पुण्यामध्ये आहे.
औरंगाबादमध्ये उमेदवारी दिली नाही तर कार्यकर्त्यांमध्ये निराशा येईल. त्यामुळे एमआयएम औरंगाबाद, नांदेड आणि विदर्भातील एका जागेवर उमेदवारी देणार असल्याचं इम्तियाज जलील यांनी सांगितलं आहे. एमआयएमच्या भूमिकेमुळे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे युतीमध्ये दरी निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
मात्र असं असलं तरी औरंगाबादमध्ये उमेदवार देण्याचा अंतिम निर्णय हे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर घेणार असल्याचंही इम्तियाज जलील म्हणाले.
VIDEO | औरंगाबादच्या जागेवरुन भारिप-एमआयएमध्ये वाद
संबंधित बातम्या
काँग्रेसकडून सॉफ्ट हिंदुत्वाचा पुरस्कार, काँग्रेसच्या पत्राला प्रकाश आंबेडकरांंचं पत्रानं उत्तर
वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस-राष्ट्रवादीकडे जाहीर केलेल्या 22 जागांची मागणी
राहुल गांधी- प्रकाश आंबेडकर यांची भेट होण्याची शक्यता, काँग्रेस-राष्ट्रवादीचं आंबेडकरांना पत्र
वंचित बहुजन आघाडीचे मराठवाड्यातील आणखी 4 उमेदवार घोषित
प्रकाश आंबेडकरांचं दबावतंत्र, वंचित बहुजन आघाडीचा पाचवा उमेदवार जाहीर
...तर वंचित बहुजन विकास आघाडीतून बाहेर पडेन : असदुद्दीन ओवेसी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement