Dilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दारांना पाडा, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रिया
Dilip Walse Patil, आंबेगाव : शरद पवारांच्या टीकेनंतर मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Dilip Walse Patil, आंबेगाव : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुरुवारी (दि.14) आंबेगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांच्यासाठी सभा घेतली. या सभेतून त्यांनी साथ सोडून गेलेल्या दिलीप वळसे पाटलांनावर जोरदार हल्ला चढवला. "ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते. महाराजांसोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना कधी सोडलं का? त्यामुळं आपल्यासोबत गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही. या गद्दारांचा मोठ्या फरकाने पराभव करा आणि देवदत्त निकमांना आमदार बनवा", असं आवाहन शरद पवार यांनी केलं. दरम्यान, शरद पवार यांनी टीका केल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.
दिलीप वळसे पाटील काय काय म्हणाले?
भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय सर्व आमदारांनी एकत्र येऊन घेतला, त्यामुळं गद्दारीचा प्रश्न येतो कुठं? असं म्हणत शरद पवारांनी गद्दारीचा शिक्का लावल्यानंतर दिलीप वळसेंनी बाळगलेलं मौन अखेर सोडलं. पवारांनी वळसेंच्या बालेकिल्ल्यात देवदत्त निकमांसाठी सभा घेत, गद्दारी करणाऱ्यांना आता सुट्टी नाही. वळसेंना शंभर टक्के पाडा, अशी घणाघाती टीका केली. त्यानंतर मौन बाळगून असलेल्या वळसेंनी अखेर गद्दारीचा शिक्का पुसण्याचा प्रयत्न केला. भाजपसोबत जाण्याचा निर्णय सर्व आमदारांनी मिळून घेतला, त्यामुळं हा इतका महत्वाचा विषय नाही. असं स्पष्टीकरण वळसेंनी सुरुवातीला दिलं. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पत्रकारांनी गद्दारीच्या मुद्द्यावर वळसेंना छेडलं, मग मात्र मी गद्दारी केलीच नाही, त्यामुळं गद्दारीवर बोलण्याचा प्रश्न येतो कुठं? असा प्रतिप्रश्न वळसेंनी केला.
शरद पवार काय काय म्हणाले होते?
माझी पत्नी वर्षातून एकदा भीमाशंकरला जाते, आत्ता अलीकडे ही ती भीमाशंकरला आली. मी विचारलं नेहमी सारखी व्यवस्था होती का? त्या म्हणाल्या यावेळी दिलीप वळसेंच्या घरी गेलीच नाही, थेट भीमाशंकर दर्शन घेऊन परतले.आता यांनी बोलायला काय ठेवलं आहे का? त्यांनी एकचं गोष्ट ठेवली, फक्त गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते. महाराजांसोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना कधी सोडलं का? त्यामुळं आपल्यासोबत गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही. या गद्दारांचा मोठ्या फरकाने पराभव करा आणि देवदत्त निकमांना आमदार बनवा, असं शरद पवार म्हणाले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या