Dhule Lok Sabha Result 2024 : धुळ्यात भाजपचा विश्वास भामरे राखणार? अल्पसंख्याक समाजाची मतं ठरणार निर्णायक, लोकसभेचा निकाल एका क्लिकवर
Dhule Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या धुळे लोकसभा मतदारसंघात सुभाष रामराव भामरे, शोभा दिनेश बच्छाव अशी चुरशीची लढत पाहायला मिळाली.
Dhule : धुळे या मतदारसंघासाठी (Dhule Lok Sabha Election 2024) 20 मे रोजी यशस्वीपणे निवडणूक झाली. यंदा 56.61 टक्के मतदान झाले. धुळे लोकसभा मतदारसंघ हा भारतीय राजकारणातील महत्त्वपूर्ण आणि महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. धुळे मतदारसंघात अल्पसंख्याक समाज मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे अल्पसंख्याक समाजाची मते निर्णायक ठरतात. धुळे मतदारसंघात (Dhule Lok Sabha Election Result 2024) भाजपची पूर्वीपासून ताकत राहिली आहे. मात्र सध्याचे चित्र पाहता कांदा आणि कापूस निर्यातबंदीवरुन शेतकरी वर्गाची केंद्र सरकारवर नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे मतदारराजा कोणाचं पारडं जड करणार? याचं चित्र 4 जूनला स्पष्ट होणार आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातील 2024 च्या उमेदवारांच्या यादीनुसार, भारतीय जनता पक्षाकडून डॉ. सुभाष रामराव भामरे (Subhash Bhamare) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून शोभा दिनेश बच्छाव (Shobha Bachhav) हे प्रमुख उमेदवार आहेत.
धुळे लोकसभा निकाल 2024 (Dhule Lok Sabha Election Result 2024)
उमेदवाराचे नाव -पक्ष
सुभाष रामराव भामरे -भाजप
शोभा दिनेश बच्छाव - कॉंग्रेस
भाजपचा विश्वास भामरे राखणार का?
धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य, मध्य आणि बागलाण अशा तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. 2009 मध्ये मालेगाव लोकसभा मतदारसंघात बदल करून धुळे लोकसभा मतदार संघ करण्यात आला. 2009 मधील लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता 1999 पासून भाजपने या मतदारसंघात भाजपने आपली विजयी परंपरा कायम राखलीय. त्यामुळे मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपने दबदबा निर्माण केला आहे. 2014 पासून धुळे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. सुभाष भामरे यांना भाजपने पुन्हा एकदा निवडणुकीचे तिकीट जाहीर केले आहे. डॉ. भामरे यांच्याविरोधात पक्षांतर्गत नाराजीची चर्चा होती मात्र भाजपने भामरे यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
2019 मध्ये सव्वा दोन लाखांपेक्षा अधिक फरकानं विजय
धुळे मतदारसंघ हा 48 मतदारसंघापैकी एक आहे. 2019 च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत धुळ्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. 2019 मध्ये काँग्रेसनं उमेदवार बदलत कुणाल रोहिदास पाटील यांना मैदानात उतरवलं होतं. पण भामरेंच्या विरोधात त्यांना विजय मिळवता आला नाही. सुभाष भामरेंनी त्यांचा सव्वा दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता. भाजपनं 2014 च्या निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे यांनी अंबरीश पटेल यांच्या विरोधात सव्वालाखांपेक्षा अधिक फरकानं विजय मिळवला होता. त्यामुळं 2019 मध्येही पक्षानं त्यांनाच उमेदवारी दिली. निवडणुकीच्या आधी डॉ. भामरे यांच्याकडं संरक्षण मंत्रालयाच्या राज्य मंत्रिपदाची जबाबदारी देखील होती.
कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?
धुळे ग्रामीण - कुणाल पाटील, काँग्रेस
धुळे शहर- शाह फारुख अन्वर, AIMIM
सिंदखेडा- जयकुमार रावल, भाजपा
मालेगाव मध्ये- इस्माईल खालिक, AIMIM
मालेगाव बाह्य - दादा भुसे, शिवसेना (शिंदे गट)
बागलाण - दिलीप बोरसे - भाजपा
2019 सालचा निवडणूक निकाल - (Dhule Lok Sabha Constituency 2019 Result)
2019 च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत धुळ्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघात 2019 मध्ये 56.68% मतदान झाले. भाजप उमेदवार भामरे सुभाष रामराव यांनी 2,29,243 मतांच्या फरकाने 6,13,533 मते मिळवून 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवला. भामरे सुभाष रामराव यांनी काँग्रेसच्या कुणालबाबा रोहिदास पाटील यांचा पराभव केला, त्यांना 3,84,290 मते मिळाली. धुळे लोकसभा जागेच्या तपशीलावर एक नजर टाकूया.
धुळे लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल
वर्ष- 2019 : सुभाष रामराव भामरे (विजयी उमेदवार- भाजप) 56.54% मतं
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे सुभाष रामराव भामरे 6,13,533 मतं मिळवून विजयी झाले होते.
तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कुणाल रोहिदास पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
विजयाचा फरक: 2,29,243 मतं.
वर्ष- 2014 : सुभाष रामराव भामरे (विजयी उमेदवार- भाजप) 53.99% मतं
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे सुभाष रामराव भामरे 5,29,450 मते मिळवून विजयी झाले होते.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अमरीशबाई रसिकलाल पटेल यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे फरक : 1,30,723 मते.
वर्ष- 2009 : प्रताप सोनावणे (विजयी उमेदवार- भाजप) 39.3% मतं
या मतदारसंघाचे मागील लोकसभा निवडणुकीचे निकाल (लोकसभा 2019)
- भामरे सुभाष रामराव भारतीय जनता पार्टी 6,13,533 56.54% मते
- कुणालबाबा रोहिदास पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 3,84,290 मते 35.42% मते
- नबी अहमद अहमद दुल्ला वंचित बहुजन आघाडी 39,449 मते 3.64% मते
- अनिल अण्णा लोकसंग्राम 8,418 मते 0.78%
- अपरंती संजय यशवंत बहुजन समाज पक्ष 4,645 मते 0.43%
(लोकसभा 2014)
1 भामरे सुभाष रामराव (भाजपा) - 5,29,450
2 अमरिश पटेल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)- 2,98,976
3 ईशी योगेश यशवंत (बहुजन समाज पक्ष) - 9897
4 अन्सारी निहाल (आम आदमी पार्टी) - 9339
5 रमेश राघो मोरे - 8057
(लोकसभा 2009)
1 प्रताप सोनावणे (भाजपा) - 2,63,260
2 अमरिशबाई पटेल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) - 2,43,841
3 निहाल अहमद मोलवी (जनता दल(धर्मनिरपेक्ष) -72,738
4 अनिल गोटे (लोकसंग्राम) -53,637
5 रिझवान मो. अकबर - 11,606