एक्स्प्लोर

Aditya Thackeray: देवेंद्र फडणवीस कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत; आदित्य ठाकरेंचं विधान, मनसेवरही हल्लाबोल

Aditya Thackeray On Devendra Fadnavis: महाराष्ट्राने तुमच्यासाठी कायमचे दरवाजे बंद केले आहेत, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला.

Aditya Thackeray On Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी दरवाजे कायमचे बंद आणि आम्हाला आता गरजही पडणार नाही, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावर आता माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही आमच्यासाठी दार बंद करा खिडक्या बंद करा, महाराष्ट्राने तुमच्यासाठी कायमचे दरवाजे बंद केले आहेत, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत, असा दावाही आदित्य ठाकरेंनी यावेळी केला. 

देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाहीय, असं म्हटलं आहे. यावर देखील आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नक्कीच नाहीत. कोण जाणार गुजरात हिताचं बोलणाऱ्या या लोकांकडे ? कोण जाणार आहे महाराष्ट्र द्वेष्टा या लोकांकडे?, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. तसेच तुम्ही आमच्यासाठी खिडक्या बंद करा दरवाजे बंद करा, एकनाथ शिंदे आणि भाजपसाठी महाराष्ट्राचे दरवाजे आता बंद आहेत...ज्यांनी महाराष्ट्र लुटला त्यांनी मागच्या दरातून प्रकल्प गुजरातला नेले... त्यांच्याकडे परत कोण जाणार?, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. 

आदित्य ठाकरेंचा मनसेवर हल्लाबोल-

जो पक्ष पाच वर्ष झोपलेला असतो तो निवडणूक आल्या की तोडफोड करतो. मारामारी करतो सेटल होतो, सेटलमेंटकडून निवडणूक लढतो. त्यांना आम्ही महाराष्ट्रात नेमकं काय काम केलं हे कळणार कसं?, अशी टीका आदित्य ठाकरेंनी मनसेवर केली. मनसेचं असं झालंय त्यांनी बिनशर्ट पाठींबा दिल्यानंतर ते गुजरातच्या भूमिपुत्रांच्या हक्काचे बोलतात. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर लाठीचार्ज केला. वारकऱ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज केला, त्यांना पाठिंबा देत आहे. महाराष्ट्राच्या भूमिपुत्राचे मनसे विसरून गेले आहेत, असंही आदित्य ठाकरेंनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

मी राज्याचा मुख्यमंत्री व्हावे, अशी भाजप पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण आता मुख्यमंत्री होणे हे सर्व माझ्यासाठी गौण आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची (Maharashtra CM) कोणतीही शर्यत नाही आणि अशा शर्यतीत मी सहभागी नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एबीपीच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमातही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदासाठी आपण इच्छूक नसल्याचे सूतोवाच केले होते.  मी पाच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री होतो. आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त दोन मुख्यमंत्र्यांनाच 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला. त्यापैकी एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरा म्हणजे मी. त्यामुळे आता मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न किंवा लालसा माझ्या मनात उरलेली नाही. आता मला जी जबाबदारी देण्यात येईल, त्यामध्ये मी काम करेन. महायुती ज्याला मुख्यमंत्री ठरवेल, त्याच्या पाठिशी मी ठामपणे उभा राहीन, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : वाल्मिक कराडला अटक करा, संदीप क्षीरसागर आक्रमक, नमिता मुंदडा म्हणाल्या संतोष देशमुखला पकडून पकडून मारलं...
आमदाराला 1 तर आरोपीला 2 सुरक्षारक्षक कसे? क्षीरसागरांचा सवाल; नमिता मुंदडा म्हणाल्या देशमुख प्रकरणी आरोपींना फाशी द्या...
One Nation One Election Bill : बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित 'एक देश एक निवडणूक' विधेयक अखेर लोकसभेत सादर; सरकारने कोणता दावा केला अन् विरोधक काय म्हणाले?
बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित 'एक देश एक निवडणूक' विधेयक अखेर लोकसभेत सादर; सरकारने कोणता दावा केला अन् विरोधक काय म्हणाले?
मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Sarpanch case : डोळे जाळले,पकडून-पकडून मारलं, आरोपींना फाशी द्या; Namita Mundada गरजल्याChhagan Bhujbal Ministry Special Report : फायटर छगन भुजबळ यांची समजूत अजितदादा कशी काढणार?Chhagan Bhujbal Nashik :   प्रश्न मंत्रिपदाचा नाही, अवहेलना का केली? भुजबळांचा अजितदादांना सवाल!Nilesh Rane Nagpur Session : आक्रमक निलेश राणेंना Devendra Fadnavis यांनी एका मिनिटात शांत केलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : वाल्मिक कराडला अटक करा, संदीप क्षीरसागर आक्रमक, नमिता मुंदडा म्हणाल्या संतोष देशमुखला पकडून पकडून मारलं...
आमदाराला 1 तर आरोपीला 2 सुरक्षारक्षक कसे? क्षीरसागरांचा सवाल; नमिता मुंदडा म्हणाल्या देशमुख प्रकरणी आरोपींना फाशी द्या...
One Nation One Election Bill : बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित 'एक देश एक निवडणूक' विधेयक अखेर लोकसभेत सादर; सरकारने कोणता दावा केला अन् विरोधक काय म्हणाले?
बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित 'एक देश एक निवडणूक' विधेयक अखेर लोकसभेत सादर; सरकारने कोणता दावा केला अन् विरोधक काय म्हणाले?
मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर 
DAM कॅपिटलच्या आयपीओची जोरदार चर्चा, GMP 108 रुपयांवर, पैसे कमाईची संधी, जाणून घ्या सर्व माहिती  
Nitin Raut : मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी मनातली सगळी खदखद बाहेर काढली; अजित पवार-प्रफुल पटेलांना खडे बोल सुनावले, म्हणाले....
मी काय तुमच्या हातातलं खेळणं आहे का? भुजबळांनी अजित पवार-प्रफुल पटेलांना सुनावलं
Beed Santosh deshmukh Death: संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर थेट वार
संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर थेट वार
Embed widget