एक्स्प्लोर

Devendra Fadnavis On Rahul Narwekar: राहुल नार्वेकरांनी 'मी पुन्हा येईन' म्हटलं नव्हतं, पण नाना पटोलेंमुळे वाट मोकळी झाली; देवेंद्र फडणवीसांचे पहिल्याच भाषणात चौकार-षटकार

Devendra Fadnavis On Rahul Narvekar: राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Devendra Fadnavis On Rahul Narwekar मुंबई: विधानसभेच्या अध्यक्षपदी (Maharashtra Vidhan Sabha Speaker) पुन्हा एकदा राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची आज बिनविरोध विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच विरोधकांचे देखील देवेंद्र फडणवीसांनी आभार मानले. 

देवेंद्र फडणवीसांचे पहिल्याच भाषणात चौकार-षटकार-

राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड झाली मी तमाम विधानसभा सदस्यांच्या वतीने आणि राज्याच्या 12 कोटी जनतेच्या वतीने अभिनंदन करतो. विरोधी पक्षाचे आभार मानतो, काही अपवाद वगळता अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्याची परंपरा आहे, त्या परंपरेचा मान राखत आपल्या निवडीला विरोधी पक्षाच्या सदस्यांचे आणि गटनेत्यांचे आभार मानतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. खरं म्हणजे अध्यक्ष महोदयांनी मी पुन्हा येईन म्हटलं नव्हतं, पण तरीही आपण परत आलात याचा मला मनापासून आनंद आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला. 

नाना पटोलेंमुळे वाट मोकळी झाली- देवेंद्र फडणवीस

राज्यात एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री होते, त्यातला एक वकील होता. तुमच्यासारखा निष्णात वकील अध्यक्षांच्या खुर्चीत बसला, या खुर्चीला तुम्ही न्याय द्याल शंका नाही, असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला. 11 फेब्रुवारी 1977 मुंबईत जन्माला आलेले राहुल नार्वेकरजी हे कदाचित पहिले अध्यक्ष पहिल्याच टर्मममध्ये अध्यक्ष आणि दुसऱ्यांदा सलग अध्यक्ष झाले. नानाभाऊ (नाना पटोले) तुमचेही आभार...तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे राहुल नार्वेकर पुन्हा अध्यक्ष होऊ शकले. राहुल नार्वेकरांना विधानपरिषदेत काम करण्याची संधी मिळाली, तिकडे काम करताना चुणूक दाखवली. कायद्यातील बारकावे शोधून काढून, त्यावर बोट ठेवण्याचे काम करायचे. कायदेमंडळाचे ते अध्यक्ष आहे, त्याला कायद्याचे बारकावे माहिती असणे महत्त्वाची गोष्ट आहे. गेली 5 वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणातील संक्रमण काळ होता, पहिल्यांदा विधानसभा अध्यक्षांकडे मीडियाचं आणि जनतेचं लक्ष होतं. कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक चर्चेत असणारे अध्यक्ष राहुल नार्वेकर होते, त्यांच्य रुपाने न्यायप्रिय अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व निवडलं गेलंय ही आनंदाची गोष्ट असल्याचं देखील देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?

- नार्वेकर यांची पुन्हा एकदा फेरनिवड झाली त्याबद्दल सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो
- 12 कोटी जनतेच्या वतीने अभिनंदन करतो..
- अपवाद वगळता बिनविरोध अध्यक्षांची निवडणूक करण्याची परंपरा आहे.. ती राखल्याबद्दल विरोधी पक्षाच्या नेत्यांचे आभार मानतो..
- तुम्ही पुन्हा येईन म्हणलं नव्हतं तरी तुम्ही आलात याचा आनंद
- मी पुन्हा येईल असं म्हटले नव्हते तरी ही तुम्ही परत आलात
⁠- एक निष्णात वकील या पदावर बसलात
⁠- पहिलेच अध्यक्ष आहेत की पहिल्याच टर्ममध्ये असताना अध्यक्ष बनले आणि दुस-यांदा ही बनले
- नाना पटोले तुमचे आभार मानतो की की तुम्ही ती संधी निर्माण करुन दिली होती
- ⁠पाच वर्ष महाराष्ट्रातील राजकारणातील संक्रमण काळ होता 
- ⁠त्यामुळे मिडीया आणि सर्वाच लक्ष होते.. ⁠त्यामुळे सर्वात लोकप्रिय अध्यक्ष तेच होते
- आमची राजकिय विरोधक आहोत.. बाकी आमची मैत्रीच आहे.. नाना पटोलेंना उद्देशून 
- गेल्या अडीच वर्षात न्यायाधिशाचे काम जास्त केलं...
- कोण खरा पक्ष, कोण खरा प्रतोद.. खुप  कन्फुजन होतं.. 
- देशातील मोठे विधिज्ञ त्यांना प्रश्न विचारायचे.. 
- त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला.. त्यांनी त्याकडे लक्ष शांतपणे काम करत राहिले. त्यांना आता परत विधानसभेतील सर्व सदस्यांना परत न्याय देण्याची भुमिका घ्यायची आहे 
- अनेक शैक्षणिक संस्थांशी वकील म्हणून तुमचा संबंध राहिला आहे..
- अध्यक्ष झाल्यावर मी स्वत प्रॉक्टीस करणार नाही हा निर्णय घेतला..
- आपलं सगळं कौशल्य इथे वापरतात
- कुलाबा येथे श्रीमंत आणि गरिब लोकही तिथे राहतात.. सर्वच लोकांमध्ये चांगले वावरतात.
- एकूण मतांच्या 72 टक्के मतं अध्यक्षांना मिळाली आहे..
- ⁠सभागृहाच्या दालनांचा चेहरा अध्यक्षांनी बदलला
- कितीही गरम चर्चा झाली तरी त्यांच्या दालनातील कॉफीने वाद संपतात
- ते डावीकडील आणि उजवीकडील आवाज ते ऐकतात 
- त्यांना डावीकडील आवाज सूक्ष्मपणे ऐकावा लागेल (विरोधी पक्षाच्या संख्येवर फडणवीसांचा टोला) 
- आम्ही विरोधी पक्षाचा आवाज ऐकू
- ज्या कुलाबा मतदारसंघात विधानसभा आहेत, त्याचे आमदारही आपण आहात, आम्ही सर्व आपल्या मतदारसंघात असल्याने आमची विशेष काळजी घेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे
-राहूल नार्वेकर हे मोठ्या माणसांत जेवढे वावरतात तेवढेच झोपडपट्टीतील लोकांमध्ये ते वावरतात
- राजकीय संवाद कमी झालाय
- ⁠मी कोणाला दोष देत नाही 
- ⁠मात्र ही संवाद वाढला पाहिजे
- ⁠आम्ही ही प्रयत्न करु

संबंधित बातमी:

Uddhav Thackeray: विधानसभा निवडणूक संपताच राज ठाकरेंना पहिला धक्का; उद्धव ठाकरे म्हणाले, एक काहीतरी...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet: महायुती सरकाच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, वर्षा बंगल्यावरील बैठकीत शिंदे-फडणवीसांमध्ये नेमकं काय ठरलं?
महायुती सरकाच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, वर्षा बंगल्यावरील बैठकीत शिंदे-फडणवीसांमध्ये नेमकं काय ठरलं?
Solapur Accident: पाय गिअरवर पडला, ट्रॅक्टरनं दोन्ही बहिणींना चिरडलं,ऊसतोडीच्या फडात अंगावर काटा आणणारा अपघात
पाय गिअरवर पडला, ट्रॅक्टरनं दोन्ही बहिणींना चिरडलं,ऊसतोडीच्या फडात अंगावर काटा आणणारा अपघात
Syria war | Bashar al-Assad : पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Ekikaran Samiti : महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्यावर ठामTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 9 डिसेंबर 2024 : ABP MajhaSanjay Raut FULL  PC : शिंदेंनी बेळगावात जाऊन कधीही सीमावासियांची गाऱ्हाणी ऐकली नाहीतBhaskar Jadhav  MVA : पुरेसं संख्याबळ नसलेल्या विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet: महायुती सरकाच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, वर्षा बंगल्यावरील बैठकीत शिंदे-फडणवीसांमध्ये नेमकं काय ठरलं?
महायुती सरकाच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, वर्षा बंगल्यावरील बैठकीत शिंदे-फडणवीसांमध्ये नेमकं काय ठरलं?
Solapur Accident: पाय गिअरवर पडला, ट्रॅक्टरनं दोन्ही बहिणींना चिरडलं,ऊसतोडीच्या फडात अंगावर काटा आणणारा अपघात
पाय गिअरवर पडला, ट्रॅक्टरनं दोन्ही बहिणींना चिरडलं,ऊसतोडीच्या फडात अंगावर काटा आणणारा अपघात
Syria war | Bashar al-Assad : पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
Nandurbar Crime : कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
BMC Election 2025: शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना सक्रिय करणार
शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, BMC निवडणुकीत जुन्या मोहऱ्यांना सक्रिय करणार
मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागले, 9 वर्षातील सर्वात कमी तापमान; निफाडमध्ये हाडं गोठवणारी थंडी
मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागले, 9 वर्षातील सर्वात कमी तापमान; निफाडमध्ये हाडं गोठवणारी थंडी
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
Embed widget