एक है तो ‘सेफ’ है ! मोदी है तो मुमकिन हैं ! महायुतीच्या एकहाती वर्चस्वानंतर देवेंद्र फडणवीसांची पोस्ट
Devendra Fadnavis on Vidhansabha Election Result : महायुतीच्या बाजूने निकाल हाती येत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Devendra Fadnavis on Vidhansabha Election Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharshtra Vidhansabha Election) निकाल हाती येऊ लागली आहेत. विधानसभा निवडणुकीत (Maharshtra Vidhansabha Election) महायुतीने दणदणीत विजय मिळवल्याचे चित्र आहे. महायुतीने 225 जागांवर आघाडी मिळवली आहे, तर महाविकास आघाडीला केवळ 56 जागांवर आघाडी मिळवली आहे. दरम्यान, राज्यात महायुतीने विजयी आघाडी मिळवल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'एक है तो ‘सेफ’ है ! मोदी है तो मुमकिन हैं !',अशी पोस्ट देत देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
आत्तापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, महायुतीने 225 जागांवर आघाडी मिळवली आहे, तर महाविकास आघाडीला केवळ 56 जागांवर आघाडी मिळवता आली आहे. भाजपने 130, शिंदेंच्या शिवसेनेने 56 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 39 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाने 21, ठाकरेंच्या शिवसेनेने 18 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 17 जागांवर आघाडी मिळवली आहे.
दरम्यान, महायुतीने मोठे यश मिळवल्यानंतर भाजप नेत्यांनी सेलीब्रेशन करण्यास सुरुवात केली आहे. माजी खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीमध्ये तर माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात सेलिब्रेशनला सुरुवात केली आहे.
महायुतीत ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील, त्याचा मुख्यमंत्री, असं आमचं काही ठरलं नव्हतं. प्रथम निवडणुकीच्या निकालाचे अंतिम आकडे येऊ दे. मग आम्ही तिन्ही पक्ष ज्याप्रमाणे जागावाटपाच्या चर्चेसाठी बसलो होतो, त्याप्रमाणे एकत्र बसू. पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे.पी.नड्डा आणि तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून चर्चा करतील. आम्ही जशी निवडणूक लढलो तसा मुख्यमंत्रीपदाबाबतही एकत्र चर्चा करुन निर्णय घेऊ, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं, प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया
विधानसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असलेल्या प्रवीण दरेकर यांनी एक वक्तव्य केले आहे. जी पार्टी मोठी आहे, त्यांचा मुख्यमंत्री होतो. भाजप 125 जागांजवळ गेली आहे, त्यामुळं भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या