(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur South : कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिकांनी आमदारकी खेचली, ऋतुराज पाटलांचा दारुण पराभव; कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटलांना तगडा झटका
Kolhapur District Assembly Constituency : भाजपचे अमल महाडिक यांनी पुन्हा एकदा आमदारकी खेचून आणली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला निकाल कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये लागला आहे.
Kolhapur South Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडाला असून महायुतीने जोरदार बाजी मारली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा पैकी नऊ जागांवर महाविकास आघाडीला झटका बसला असून सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. फक्त चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील आघाडीवर आहेत. मात्र, ते सुद्धा भाजप बंडखोर उमेदवार असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडी हद्दपार झाली आहे. दरम्यान, कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटील यांना सर्वात मोठा तगडा झटका बसला असून पुतणे ऋतुराज पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे. भाजपचे अमल महाडिक यांनी पुन्हा एकदा आमदारकी खेचून आणली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला निकाल कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये लागला आहे.
अमल महाडिक यांनी पुन्हा एकदा विजय खेचून आणला
सतेज पाटील यांनी जागावाटपामध्ये बाजी मारत पाच जागा खेचून आणल्या होत्या. मात्र, त्या सर्वच्या सर्व जागा अडचणीत आल्याने मोठा झटका बसला आहे. दरम्यान, खासदार धनंजय महाडिक यांना महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणामध्ये टार्गेट करण्यात आलं होतं. त्यामुळे त्याचा फटका अमल महाडिक यांना विधानसभा निवडणुकीमध्ये बसणार का? याची चर्चा रंगली होती. मात्र, कोल्हापूर दक्षिणमध्ये त्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे निकालातून स्पष्ट झालं आहे. अमल महाडिक यांनी पुन्हा एकदा विजय खेचून आणला आहे. प्रियांका गांधी यांची सभा होऊनही फारसा परिणाम झालेला नाही.
कोल्हापूर दक्षिणची लढाई राज्य पातळीवर गेली
कोल्हापूर दक्षिणची लढाई खासदार धनंजय महाडिक यांनी लाडक्या बहिणींवरून केलेल्या वक्तव्यावरून राज्य पातळीवरती गेली होती. त्यामुळे कोल्हापूर दक्षिणच्या हाय व्होल्टेज लढाईमध्ये कोण बाजी मारणार? याकडे फक्त जिल्ह्याचे नव्हे, तर राज्याचे लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे सतेज पाटील यांची सुद्धा प्रतिष्ठा या मतदारसंघांमध्ये पणाला लागली होती. मात्र सीएम योगी यांची झालेली सभा, लाडकी बहीण योजना कोल्हापूर दक्षिणच्या निकालामध्ये महत्त्वपूर्ण ठरल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस हा मोठा पक्ष असताना सुद्धा मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. 2019 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर हातकणंगले विधानसभा मतदारसंघांमध्ये विजय खेचून आणला होता. त्यामुळे त्या कामगिरीची पुनरावृत्ती सुद्धा काँग्रेसला करता आलेली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या