एक्स्प्लोर

BJP : भाजपची मंत्रिपदाची संभाव्य यादी समोर, रविंद्र चव्हाण, नितेश राणे, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकरांच्या नावाचा समावेश

BJP Ministers List : भाजपकडून एकूण 16 मंत्री शपथ घेणार असून त्यामध्ये पंकजा मुंडेसह नितेश राणे आणि गोपीचंद पडळकरांचेही नाव असल्याची माहिती आहे. 

मुंबई : महायुती सरकारच्या शपथविधीला अवघे काहीच तास शिल्लक असताना आता भाजपच्या संभाव्य मंत्रिपदाची यादी समोर आली आहे. त्यामध्ये आशिष शेलार, रविंद्र चव्हाण, गिरीश महाजन, पंकजा मुंडे यांच्यासह निलेश राणे आणि गोपीचंद पडळकरांचाही समावेश असल्याची माहिती आहे. भाजपकडून एकूण 16 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. 

BJP Ministers List : भाजपचे संभाव्य मंत्री

कोकण 

  • रविंद्र चव्हाण 
  • नितेश राणे 
  • गणेश नाईक 

मुंबई 

  • मंगलप्रभात लोढा 
  • आशिष शेलार 
  • राहुल नार्वेकर 
  • अतुल भातखळकर 
  • (मंगलप्रभात लोढा यांना दिलं तर राहुल नार्वेकर नसतील.) 

पश्चिम महाराष्ट्र 

  • शिवेंद्रसिंहराजे भोसले 
  • गोपीचंद पडळकर 
  • माधुरी मिसाळ 
  • राधाकृष्ण विखे पाटील 

विदर्भ 

  • चंद्रशेखर बावनकुळे 
  • संजय कुटे 

उत्तर महाराष्ट्र 

  • गिरीश महाजन 
  • जयकुमार रावल 

मराठवाडा 

  • पंकजा मुंडे
  • अतुल सावे

वर्षा आणि सागर बंगल्यावर घडामोडींना वेग

गेल्या काही तासांपासून एकनाथ शिंदे यांनी महायुतीसाठी चर्चेचे दरवाजे पुन्हा उघड केले आहेत. त्यामुळे वर्षा बंगल्यावरील घडामोडींना वेग आला आहे. काहीवेळापूर्वीच संजय शिरसाट हे उदय सामंत यांच्या मुक्तागिरी बंगल्यावर पोहोचले आहेत. तिथून हे दोन्ही नेते वर्षा बंगल्यावर जातील. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी प्रदेश मुख्यालयात  शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला होता. प्रदेश मुख्यालयातील बैठकीनंतर फडणवीस यांच्या भेटीसाठी बावनकुळे दाखल झाले आहेत.

महायुतीच्या शपथविधीतही ‘एक है तो सेफ है’चा नारा

महायुतीच्या शपथविधीतही ‘एक है तो सेफ है’चा नारा दिसणार आहे. महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात दहा हजार भाजप कार्यकर्ते 'एक हैं तो सेफ हैं" आशयाचा मजकूर असलेले टी शर्ट परिधान करणार आहेत. महायुतीला विजय मिळवून दिलेल्या नाऱ्याची भाजपकडून पुनरावृत्ती करण्यात येणार आहे. तसेच शपथविधी काळात मराठी संगीतासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 

दरम्यान, शिवसेनेच्या मंत्रिपदाची संभाव्य यादीही समोर आली असून त्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासह उदय सामंत यांचे नाव आहे. 

Shiv Sena Ministers List : शिवसेना संभाव्य मंत्र्यांची नावे

१) एकनाथ शिंदे
२) दादा भुसे
३) शंभूराज देसाई
४) गुलाबराव पाटील
५) अर्जुन खोतकर
६) संजय राठोड
७) उदय सामंत

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kurla BEST Accident : कुर्ला अपघात प्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Kurla BEST Accident : कुर्ला अपघात प्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
आधी अपहरण, मग हत्या, लाकडी दांड्यानं काटा काढला? सतीश वाघ यांचा खून कसा केला? हादरवून सोडणाऱ्या कटात मोठी अपडेट!
आधी अपहरण, मग हत्या, लाकडी दांड्यानं काटा काढला? सतीश वाघ यांचा खून कसा केला? हादरवून सोडणाऱ्या कटात मोठी अपडेट!
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla BEST Accident : कुर्ला अपघात प्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखलABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 10 December 2024Special Report Ladki Bahin Yojana :पडताळणी होणार? लाडकी बहीण छाननीच्या बंधनात?Special Report Vidhansabha : थँक्यू नाना, विधानसभेत नेत्यांचा डायलॉबाजीचा सुपर डुपर हिट शो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kurla BEST Accident : कुर्ला अपघात प्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Kurla BEST Accident : कुर्ला अपघात प्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
आधी अपहरण, मग हत्या, लाकडी दांड्यानं काटा काढला? सतीश वाघ यांचा खून कसा केला? हादरवून सोडणाऱ्या कटात मोठी अपडेट!
आधी अपहरण, मग हत्या, लाकडी दांड्यानं काटा काढला? सतीश वाघ यांचा खून कसा केला? हादरवून सोडणाऱ्या कटात मोठी अपडेट!
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Embed widget