Eknath Shinde : आता मी DCM आहे, डेडीकेटेड टू कॉमन मॅन, 24 बाय 7 काम करणार, देवेंद्रजींना पूर्ण सहकार्य देणार : एकनाथ शिंदे
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचं म्हटलं.
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले एक ऐतिहासिक शपथविधी महाराष्ट्राने पाहिला. सर्वांना न्याय देणारं सरकार, आनंद देणारं सरकार असा अडीच वर्षाचा कार्यकाळ झाला.
प्रगत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याचे सौभाग्य मला, शेतकऱ्याच्या मुलाला मिळाले हे माझे भाग्य आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
गेल्या अडीच वर्षात राज्यात आणि देशात एकच सरकार असल्याने भरभरून पाठबळ दिले, त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे मी धन्यवाद देतो, अभिनंदन करतो,कारण हे दोघे आमच्या पाठीशी उभे राहिले, म्हणून हा कार्यकाळ यशस्वी झाला, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
एकीकडे विकास प्रकल्प, लाडके भाऊ, लाडक्या बहिणी समाजाचा प्रत्येक घटक या सरकारच्या मागे राहिल्या. देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो. फडणवीस आणि अजित पवार यांनी खूप सहकार्य केले. अडीच वर्षांपूर्वी त्यांनी माझे नाव सुचवले आज मी त्यांचे नाव सुचवले याचा मला आनंद आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
अडीच वर्षातील महायुती सरकार यशस्वी झालं आणि गतिमान, त्याची कारकीर्द यशस्वी ठरली. त्यामुळं न भूतो न भविष्यात असे बहुमत मिळाले कारण या सरकारचे काम हे आहे. यावेळी आम्ही चाळीस चे साठ झालो याचे देखील मला अभिमान आहे. आमच्यासाठी सत्ता हे साध्य नसून जनसेवेचे साधन आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
जनतेचे सरकार असून जनतेसाठी काम केल्यानं अडीच वर्षांची कारकीर्द यशस्वी झाली, असं एकनाथ शिंदे म्हणाले. गेली अडीच वर्ष
सीएम म्हणजे कॉमन मन म्हणून काम केलं, पदापेक्षा कामाला जास्त महत्त्व दिले. आता मी डीसीएम आहे, आता मी डेडीकेटेड टू कॉमन मॅन म्हणून काम करणार, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
माझा देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा असेल. मोदी, शहा, नड्डा यांचे खूप सहकार्य लाभले होते. मी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो, वेगवान सरकार म्हणून हे सरकार काम करेल अशी इच्छा व्यक्त करतो, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
इतर बातम्या :