Devendra Fadnavis : ना जागांवर, नाही स्ट्राईक रेटवर, मुख्यमंत्री बनेल तो...; मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती, म्हणाले...
Devendra Fadnavis : शंख नादाकडून विजयाकडे आमची वाटचाल चालली आहे. आम्ही केलेलं विकास काम जनतेच्या पुढे आहे. ते आम्हाला साथ देतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभेच्या मतदानाला आता अवघे 3 दिवस उरले आहेत. दरम्यान, या निवडणुकीच्या अनुषंगाने आपापल्या पक्षाचा झेंडा फडकवत राजकीय प्रचाराला रंग चढला असून आता प्रचाराला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मतदारसंघात शेवटचा प्रचार करतांना दिसत आहे.
दरम्यान यावेळी बोलताना शंख नादाकडून विजयाकडे आमची वाटचाल चालली आहे असल्याची प्रतिक्रिया फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. मला विश्वास आहे की, महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला निवडून देण्याची मानसिकता तयार केली आहे. त्यामुळे निश्चित आम्हाला आशीर्वाद मिळेल आणि बहुमताचे सरकार राज्यात येईल. पूर्ण बहुमताचे सरकार राज्यात येईल त्याचा आकडा मी आज सांगत नाही. मात्र आम्ही केलेलं विकास काम जनतेच्या पुढे आहे. ते आम्हाला साथ देतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
ना जागांवर, नाही स्ट्राईक रेटवर, मुख्यमंत्री बनेल तो...
असे असताना महायुतीला पूर्ण बहुमत असेल मग तिन्ही पक्षातील प्रमुख नेते मी मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये नाही म्हणतात, ही रणनीती आहे, एकोपा आहे की काही वेगळंच आहे? असा प्रश्न केला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही किती एकादीलाने लढतो आहे हे यातून लक्ष्यात येतंय. मुख्यमंत्री पदासाठी आमच्यात कुठलीही स्पर्धा नाही. निश्चित राज्यात आमची सत्ता आली की आम्ही चांगले मुखमंत्री राज्याला देऊ. आत्ताचे मुखमंत्री ही चांगले आहेत. मात्र जागांवर ही नाही आणि स्ट्राईक रेटवरही नाही तर महायुतीच्या तिन्ही नेत्यांना जे वाटेल ते होईल, असे मोठं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना केले आहे. तर अजित पवारांना कटेंगें तो बटेंगें याचा अर्थ कळलेला नाही. त्यांनी ज्यावेळी एक हैं तो सेफ आहे चा अर्थ समाजाला आणि त्याच नाऱ्याचा हा एक भाग असल्याचेही फडणवीस म्हणाले.
..तर देवेंद्र फडणवीस कधीही तडजोड करत नाही
डेव्हलपमेंट मॅन म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस अचानक आक्रमक का झाले? ओवेसी आणि नोमानींना त्यांच्या शब्दात उत्तर का देऊ लागले? असे वाटते का की सज्जाद नोमानी यांना बोलायला लावण्यात आले हे ठरवून करण्यात आलं आहे का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता ते म्हणाले की, जिथं अस्मितेचा विषय येतो तिथे देवेंद्र फडणवीस कधीही तडजोड करत नाही. अस्मितेसाठी कधीही तडजोड होऊ शकत. असे परखड मत त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.
हे ही वाचा