एक्स्प्लोर

Income Tax : प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा 7 लाखांवरुन 12 लाख का केली? निर्मला सीतारामन यांनी उलगडून सांगितलं

NIrmala SItharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसकंल्पात त्यांनी प्राप्तिकरासाठी नव्या कररचनेतील करमुक्त उत्पन्न 12 लाख करत असल्याची घोषणा केली.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प काल लोकसभेत सादर केला. निर्मला सीतारामन यांनी आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प (Budget 2025) मांडला. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गाला दिलासा देणारी मोठी घोषणा केली. प्राप्तिकराच्या (Income Tax) आकारणीमध्ये नव्या कररचनेत (New Tax Regime) त्यांनी फेरबदल जाहीर केले. नव्या कररचनेत स्लॅबमध्ये बदल याशिवाय करमुक्त उत्पन्नाची मर्यादा देखील वाढवत असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. रिबेटसह करमुक्त उत्पन्न 12 लाख का केलं या संदर्भातील सविस्तर माहिती निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दिली त्या दूरदर्शनशी बोलत होत्या. 

निर्मला सीतारामन नेमकं काय म्हणाल्या? 

एका विशिष्ट पातळीपर्यंत उत्पन्न वाढलं पाहिजे, त्यानंतर करासंदर्भात चर्चा करणं आवश्यक आहे. 7 लाखांवरुन 12 लाखांपर्यंत करमुक्त उत्पन्न का करण्यात आलं? यापूर्वी ते 2.2 लाख रुपये होतं ते 2014 मध्ये 2.5 लाख रुपये केलं गेलं  होतं. 2019 मध्ये 5 लाख रुपये उत्पन्न करमुक्त करण्यात आलं, त्यानंतर ते पुढे 7 लाखांपर्यंत वाढवण्यात आलं. आता करमुक्त उत्पन्न 12 लाख करण्यात आलं. सरकारची भावना ही आहे की एखादा व्यक्ती दरमहा 1 लाख रुपये कमवत असेल तर त्याला कर द्यावा लागू नये, असं निर्मला सीतारामन म्हणाल्या. 

आम्ही यामध्ये दोन मार्ग वापरले आहेत. पहिला म्हणजे स्लॅबचे दर घटवले आहेत. नवे स्लॅब अधिक योग्य आहेत. दुसरा मार्ग आहे त्यात स्लॅबचा विस्तार केलेला आहे. याचा फायदा सर्व उत्पन्न गटातील सर्व करदात्यांना होणार आहे, असं निर्मला सीतारामन म्हणाल्या.स्लॅब रेटमध्ये कपात केल्याचा फायदा काही लोकांना मिळे, मात्र, अधिक रिबेट देण्यात आली आहे. स्लॅब रेटमध्ये कपात करण्यात आली ती सर्वांना लागू होईल. तर, अधिक रिबेट देण्यात आली आहे ती काही अधिक लोकांना लागू होईल. करदात्यांकडील जो पैसा वाचणार आहे तो परत अर्थव्यवस्थेत यावा, लोकांकडून खरेदी व्हावी, बचत व्हावी आणि गुंतवणूक या मार्गानं पैसा अर्थव्यवस्थेत परत यावा, असं निर्मला सीतारामन म्हणाल्या. 

निर्मला सीतारामन पुढं म्हणाल्या, काँग्रेसच्या सरकारच्या काळात 2014 मध्ये जो व्यक्ती 8 लाख रुपये कमवत असेल त्याच्या हातात आता 1 लाख रुपये अधिकचे असतील. त्याला 2014 मध्ये  1 लाख रुपये कर द्यावा लागत असेल आता शून्य कर द्यावा लागेल. जो 2014 मध्ये 12 लाख रुपये कमवत असेल त्याला त्यावेळी  2 लाख रुपये कर द्यावा लागायचा आता त्याला कर द्यावा लागणार नाही. याशिवाय जो 24 लाख रुपये कमावतो त्याला 2014 च्या कररचनेनुसार 5.6 लाख रुपये कर द्यावा लागायचा आता त्याला 3 लाख रुपये कर द्यावा लागेल.  

निर्मला सीतारामन यांनी रिबेटसह करमुक्त  उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत केल्यानं आता 1 कोटी लोकांना कर द्यावा लागणार नाही, असं म्हटलं. 

कोणत्या उत्पन्न गटाला किती टॅक्स 
0 ते 4 - Nil 
4 ते 8 - 5 टक्के
8 ते 12 लाख - 10 टक्के
12 ते 16 लाख - 15 टक्के
16  ते 20 लाख - 20 टक्के
20 ते 24 लाख - 25 टक्के
24 लाखापुढे - 30 टक्के

इतर बातम्या :

केंद्र सरकारने आणलेली पीएम धन धान्य कृषी योजना नेमकी आहे तरी काय? शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Goregaon : गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
Nashik MHADA : नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Satish Bhosale Profile : नोटांचे बंडल, दहशत पसरवणारा सतिश भोसले आहे तरी कोण?Vaibhavi Deshmukh : Santosh Deshmukh यांच्या मन हेलावून टाकणाऱ्या फोटोंवर लेकीची पहिली प्रतिक्रियाBhaiyyaji Joshi Marathi Language : भय्याजी इथे फक्त मराठीच! भाषेच्या मुद्दयानं दिवसभर गदारोळSpecial Report Walmik Karad Property : खंडणीच्या जोरावर उभं केलेलं आकाचं सम्राज्य, कराडचं घबाड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Goregaon : गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
Nashik MHADA : नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
Video : तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भय्याजी जोशींचं समर्थन करत सदावर्तेंचा ठाकरेंना बोचरा सवाल
Video : तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भय्याजी जोशींचं समर्थन करत सदावर्तेंचा ठाकरेंना बोचरा सवाल
Embed widget