Devendra Fadnavis : आचारसंहितेचे गणित चुकल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा आम्हाला पूर्ण करता आल्या नाही; देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती
आचारसंहितेचे गणित चुकल्यामुळे काही प्रमाणात आम्ही शेतकऱ्यांना पैसे देऊ शकलो नाही. परिणामी, त्याचा रोष आम्हाला निकालात सहन करावा लागल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली आहे.
![Devendra Fadnavis : आचारसंहितेचे गणित चुकल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा आम्हाला पूर्ण करता आल्या नाही; देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती devendra fadnavis big announcement after lok sabha election 2024 result along with comment on farmers anticipation maharashtra marathi news Devendra Fadnavis : आचारसंहितेचे गणित चुकल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा आम्हाला पूर्ण करता आल्या नाही; देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/05/c2646ee060049a95ea751aa3d1da0fc01717582553868892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Politics मुंबई: निवडणुक संदर्भात काही प्रमुख मुद्दे आमच्या पराभवाला कारणीभूत ठरले आहेत. यात काही मुद्दे महाराष्ट्रातील मतदारसंघातून पुढे आले आहेत. तर काही ठिकाणी आमच्या उमेदवारांची दोन-तीन वेळा निवडून आल्यामुळे अँटी इनकंबंसीची बाबी आमच्या लक्षात आल्या. विशेषतः काही ठिकाणी शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत त्यात अगदी कांद्याचा मुद्दा असेल, कापूस सोयाबीनचा प्रश्न असेल, त्याचा परिणाम या निकालावर दिसून आलाय.
मधल्या काळात काही जागतिक व्यापार पेठेमध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे सोयाबीन आणि कापसाचे भाव गडगडले होते. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. मात्र अल्प प्रमाणात ते भाव वधारले देखील होते. मात्र, आचारसंहितेचे गणित चुकल्यामुळे काही प्रमाणात आम्ही शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे मोबदला देऊ शकलो नाही. परिणामी, त्याचा रोष आम्हाला निकालात सहन करावा लागल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी बोलून दाखवला आहे.
शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाही- देवेंद्र फडणवीस
भाजपला किंवा महायुतीला जनतेने नाकारलं असं होणार नाही. समसमान मतं आम्हालाही मिळाली आहेत. मात्र अपेक्षेप्रमाणे आम्हाला कमी मते मिळाली आहे, हे आम्ही मान्य केले असून 2019 च्या तुलनेत अगदी मोजक्याच फ्रॅक्शनंने कमी मते आम्हाला मिळाली आहे. काही नरेटीव विरोधी पक्षांकडून सेट करण्यात आले त्याचा देखील आम्हाला फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे मुद्दे, मराठा आरक्षण, संविधान बदलाबाबत जे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने पासरविण्यात आली. कदाचित त्याला आम्ही योग्य पद्धतीने रोखू शकलो नाही.
परिणामी, काही प्रमाणात आम्हाला अपयशाला समोर जावे लागले. राज्यात भाजपला जे अपयश आले त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. त्यामुळे आता मला विधानसभेसाठी (Vidhansabha Election ) पूर्ण ताकदीने उतरायचं आहे. परिणामी, मला सरकारमधून मोकळ करावं, अशी मी विंनतीही त्यांनी केली आहे. मी बाहेर राहिलो तरी मी काम करीन. पण मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते मुंबईमध्ये बोलत होते.
मराठा आरक्षण संदर्भात इफेक्टिव्हपणे उत्तर देऊ शकलो नाही
पंडित जवहारलाल नेहरूनंतर पुन्हा एकदा पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद मोदींना जनतेने दिला आहे. मात्र, राज्यात अपेक्षित असे यश महायुतीला मिळालेले नाही. आम्हाला आमच्या अपेक्षेप्रमाणे खूप कमी जागा मिळालेल्या आहेत. अलिकडे संविधान बदलनार हा नरेटीव्ह विरोधकांनी सेट केला होता, कदाचीत तो आम्ही थांबवू शकलो नाही. संविधान बदलाबाबत जे काही वक्तव्य विरोधी पक्षांकडून करण्यात आले. त्याचा अगदी मुंबईसह राज्यभरात अपप्रचार करण्यात आले. एक वेगळ्या पद्धतीचा नरेटीवचा देखील काही प्रमाणात आम्हाला फटका पडला.
तिकडे काही भागांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन ज्याप्रमाणे सरकारने आरक्षण दिल्यानंतरही या ठिकाणी नरेटीव सेट करण्यात आला, त्याला आम्ही इफेक्टिव्हपणे उत्तर देऊ शकलो नसल्यामुळे कदाचित त्याचा देखील एक फटका आम्हाला बसला. असे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)