एक्स्प्लोर

Loksabha Election 2019 : मूड महाराष्ट्राचा : कोणता मित्रपक्ष किती फायद्याचा ठरणार?

या सर्व्हेत कोणत्या मित्रपक्षाचे मतदार त्यांच्या मित्रपक्षाला किती मतं देणार याची आकडेवारी समोर आली आहे. शिवसेनेशी भाजपनं जुळवून घेतल्याचा भाजपला फायदा होईल असं 86 टक्के मतदारांना वाटतंय.

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होण्याआधी युती आणि आघाडीमधील मैत्री आणि हेवेदावे, मतभेद सर्वांसमोर आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मात्र हे हेवेदावे आणि मतभेद बहुतांश दूर झाले आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'एबीपी' आणि 'ए.सी. नेल्सन' यांनी केलेलं सर्वेक्षण समोर आले आहे. 48 मतदारसंघात 12 हजार मतदारांपर्यंत पोहोचून नेल्सनच्या प्रतिनिधींनी हा सर्व्हे केला आहे.
निवडणुका घोषित होण्याचा आणि उमेदवार ठरण्याच्या काळात हा सर्व्हे केला गेला. या सर्व्हेत मतदारांना आपल्या नेत्यांकडून अपेक्षा काय आहेत? विकासाचे मुद्दे, कोण जिंकेल? असे प्रश्न विचारण्यात आले होते.
VIDEO | युती-आघाडीचे मतदार एकमेकांच्या पक्षांना मदत करणार? | कौल मराठी मनाचा | मूड देशाचा | एबीपी माझा
या सर्व्हेत कोणत्या मित्रपक्षाचे मतदार त्यांच्या मित्रपक्षाला किती मतं देणार याची आकडेवारी समोर आली आहे.  शिवसेनेशी भाजपनं जुळवून घेतल्याचा भाजपला फायदा होईल असं 86 टक्के मतदारांना वाटतंय. भाजपच्या मतदारांपैकी 93 टक्के मतदार शिवसेनेला मत देण्यासाठी तयार आहेत, तर शिवसेनेचे 85 टक्के मतदार भाजपला मत देण्यास तयार आहेत. काँग्रेसचे 86 टक्के मतदार तर राष्ट्रवादीचे 85 टक्के मतदार मित्रपक्षाला मत देण्यास तयार आहेत.
भाजपचे मतदार शिवसेनेला मत देणार का?
होय - 93 टक्के
नाही- 06 टक्के
सांगता येत नाही - 01
शिवसेनेचे मतदार भाजपला मत देणार का?
होय - 85
नाही- 13
सांगता येत नाही - 02
काँग्रेसचे मतदार राष्ट्रवादीला मत देणार का?
होय -  86
नाही- 13
सांगता येत नाही - 01
राष्ट्रवादीचे मतदार काँग्रेसला मत देणार का?
होय - 85
नाही- 10
सांगता येत नाही - 05
VIDEO | युती आणि आघाडी कोणाच्या पथ्यावर? | कौल मराठी मनाचा | मूड देशाचा | एबीपी माझा 
महाराष्ट्रात 2014 निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज
महाराष्ट्रात 2014 निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज एबीपी माझा आणि नेल्सनच्या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. 2014 च्या निकालापेक्षा केवळ 3 जागा युपीएला जास्त मिळणार असल्याचा अंदाज यात व्यक्त केला आहे. या सर्व्हेमध्ये एनडीएला 37 तर युपीएला 11 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'एबीपी' आणि 'ए.सी. नेल्सन' यांनी केलेलं सर्वेक्षण समोर आले आहे. 48 मतदारसंघात 12 हजार मतदारांपर्यंत पोहोचून नेल्सनच्या प्रतिनिधींनी हा सर्व्हे केला आहे. निवडणुका घोषित होण्याचा आणि उमेदवार ठरण्याच्या काळात हा सर्व्हे केला गेला. या सर्व्हेत मतदारांना आपल्या नेत्यांकडून अपेक्षा काय आहेत? विकासाचे मुद्दे, कोण जिंकेल? असे प्रश्न विचारण्यात आले होते.
VIDEO | महाराष्ट्रात युतीला 37, आघाडीला11 जागा - सर्व्हे | कौल मराठी मनाचा | मूड महाराष्ट्राचा | एबीपी माझा
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज  
एकूण जागा - 48
एनडीए- 37
युपीए- 11
2014 च्या लोकसभेतील आकडेवारी 
काँग्रेस- 02
राष्ट्रवादी - 05
शिवसेना-  18
भाजप- 22
स्वाभिमानी- 01
मुंबईसह कोकणात भाजप आणि शिवसेना बाजी मारणार? मुंबईसह कोकणात भाजप आणि शिवसेनेने बाजी मारली असल्याचा अंदाज आहे. मुंबईसह कोकणात शिवसेनेने आपले वर्चस्व राखले असल्याचा अंदाज या सर्व्हेमध्ये  व्यक्त केला आहे.
मुंबईसह कोकणात काय अंदाज
मुंबई उत्तर पश्चिम - शिवसेना
मुंबई उत्तर पूर्व - भाजप
मुंबई उत्तर मध्य - भाजप
मुंबई दक्षिण मध्य - शिवसेना
मुंबई दक्षिण- शिवसेना
रायगड- राष्ट्रवादी
पालघर - शिवसेना
भिवंडी - काँग्रेस
कल्याण- शिवसेना
ठाणे - शिवसेना
मुंबई उत्तर - भाजप
रत्नागिरी-सिंधुदुर्ग- शिवसेना
मुंबईसह कोकण- एकूण जागा - 12
भाजप - 03
शिवसेना- 07
काँग्रेस- 01
राष्ट्रवादी - 01
पश्चिम महाराष्ट्रात मोठे धक्के मिळण्याचा अंदाज या सर्व्हेत पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 12 लोकसभेच्या जागांपैकी 4 जागांवर भाजपला, 4 जागांवर शिवसेनेला, 3 जागांवर राष्ट्रवादीला तर एका जागेवर स्वाभिमानाला विजय मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. या सर्व्हेमध्ये बहुचर्चित माढ्यात राष्ट्रवादीला विजय मिळणार असल्याचा तर मावळमधून पार्थ पवारांना पराभव स्वीकारावा लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे यांना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर डॉ. अमोल कोल्हेंनाही शिरूरमधून पराभव  स्वीकारावा लागेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कोण जिंकणार
मावळ – शिवसेना पुणे – भाजप बारामती - राष्ट्रवादी शिरुर – शिवसेना माढा – राष्ट्रवादी सांगली – भाजप सातारा - राष्ट्रवादी कोल्हापूर – शिवसेना हातकलंगले – स्वाभिमानी शिर्डी – शिवसेना सोलापूर – भाजप अहमदनगर - भाजप
उत्तर महाराष्ट्रात भाजपचा वरचश्मा
या सर्व्हेमध्ये उत्तर महाराष्ट्रात देखील भाजपचा वरचश्मा पाहायला मिळत आहे. यामध्ये भाजपची नंदुरबारची जागा हातून निसटण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र बाकी 6 पैकी 4 जागांवर भाजपची सरशी असल्याचे पाहायला मिळत आहे. धुळे, जळगाव, रावेर या जागांवर भाजप पुन्हा निवडून येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
उत्तर महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कोण जिंकणार
नंदुरबार :- काँग्रेस
धुळे :- भाजप
रावेर :- भाजप
दिंडोरी :- भाजप
नाशिक :- शिवसेना
जळगाव :- भाजप
उत्तर महाराष्ट्रात कुणाला किती जागा
भाजप :-  4
शिवसेना :-  1
काँग्रेस :- 1
मराठवाड्यात कोणत्या मतदारसंघात कोण जिंकणार
या सर्व्हेमध्ये मराठवाड्यातील 8 जागांपैकी भाजप 3,  शिवसेना 2,  काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी एका जागेवर बाजी मारेल असा अंदाज व्यक्त केला आहे.  यामध्ये शिवसेनेचा गड असलेला परभणी शिवसेनेच्या हातून सुटण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
कोणत्या मतदारसंघात कोण जिंकणार
हिंगोली- काँग्रेस
जालना -भाजपा
औरंगाबाद - शिवसेना
नांदेड- काँग्रेस
परभणी- राष्ट्रवादी
बीड - भाजप
उस्मानाबाद - शिवसेना
लातूर - भाजप
विदर्भातील मतदारसंघात कोण बाजी मारणार
या सर्व्हेमध्ये विदर्भात असलेल्या 10 लोकसभा मतदारसंघात भाजपचा वरचष्मा झालेला पाहायला मिळत आहे. यामध्ये भाजपला 6, शिवसेनेला 3 आणि काँग्रेसला एका जागेवर विजय मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. या सर्वेनुसार अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनाही धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर नागपुरातून नितीन गडकरी यांचा विजय होणार असून भंडारा गोंदियाची जागा राष्ट्रवादीच्या हातून सुटण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भात कोणत्या मतदारसंघात कोण जिंकणार
बुलढाणा - शिवसेना
अकोला - भाजप
अमरावती - शिवसेना
वर्धा- भाजप
रामटेक- काँग्रेस
नागपूर - भाजप
यवतमाळ/वाशीम - शिवसेना
चंद्रपूर - भाजप
भंडारा / गोंदिया  - भाजप
गडचिरोली / चिमूर - भाजप
2014 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या मतदानाची टक्केवारी
एनडीए - 49.6  टक्के
युपीए - 36.9  टक्के
अन्य - 13. 5 टक्के
2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात होणाऱ्या मतदानाची टक्केवारी (अंदाज)
एनडीए :-  48 टक्के
युपीए :- 37 टक्के
वंचित आणि अन्य :- 2 टक्के
इतर :- 13टक्के
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
Embed widget