एक्स्प्लोर
अशोक चव्हाणांच्या प्रचारासाठी मुलगी मैदानात, वॉर्डात जाऊन कॉर्नर बैठका
आपले शिक्षण मुंबईत झालं असलं तरी नांदेड हेच आपले सर्वस्व असल्याचं सुजया यांनी सांगितलं. आपल्याला समाजकारणाची प्रचंड आवड असून भविष्यात आपल्याला राजकारणात यायला जरुर आवडेल, असंही सुजया यांनी सांगितलं.
नांदेड : देशाचे माजी गृहमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांची तिसरी पिढी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरली आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी सुजया चव्हाण नांदेडमध्ये आपल्या वडिलांचा प्रचार करत आहेत.
शंकरराव चव्हाण हे नांदेड जिल्ह्यातून खासदार, आमदार म्हणून निवडले गेले. ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. पुढे त्यांनी देशाचे गृहमंत्री आणि अर्थमंत्री म्हणूनही काम पाहिलं. पुढे चव्हाण कुटुंबाची दुसरी पिढी अर्थात अशोक चव्हाण आणि अमित अशोक चव्हाण या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या विजयी झाल्या. आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी नांदेड लोकसभेतून काँग्रेसतर्फे अशोक चव्हाण हे पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत.
त्यांच्या प्रचारसासाठी जशी संपूर्ण काँग्रेस मैदानात उतरली आहे, तशीच त्यांची पत्नी आणि मुलगी सुजया ही प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. आपले वडील पुन्हा एकदा खासदार म्हणून विजयी व्हावेत यासाठी पहिल्यांदाच सुजया अशोक चव्हाण या प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. सुजया नांदेड शहरातील विविध वॉर्डात जाऊन त्यांच्या कुटुंबियांनी नांदेडसाठी काय काय केलं याची माहिती देतात. सुजया कुठेही सभा घेत नसली तरी वॉर्डात जाऊन लोकांना एकत्र करुन कॉर्नर बैठका घेत आहेत.
आपले शिक्षण मुंबईत झालं असलं तरी नांदेड हेच आपले सर्वस्व असल्याचं सुजया यांनी सांगितलं. आपल्याला समाजकारणाची प्रचंड आवड असून भविष्यात आपल्याला राजकारणात यायला जरुर आवडेल, असंही सुजया यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement