देवेंद्र फडणवीसांना लाल रंगापासून अडचण आहे काय? लाल संविधानाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा सवाल; म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 : देवेंद्र फडणवीसांच्या राहुल गांधीच्या (Rahul Gandhi) हातातल्या लाल पुस्तकावरील आरोपानंतर आता काँग्रेसने लाल रंग हिंदू धर्माशी जोडत फडणवीसांना सवाल विचारले आहेत.
Maharashtra Assembly Election 2024 : देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) राहुल गांधीच्या (Rahul Gandhi) हातातल्या लाल पुस्तकावरील आरोपानंतर आता काँग्रेसने लाल रंग हिंदू धर्माशी जोडत फडणवीसांना सवाल विचारले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना लाल रंगापासून काय अडचण आहे? असा सवाल काँग्रेस पक्षाने विचारला आहे. हिंदू धर्मात देवी मातेचा रंग लाल आहे, हनुमानाच्या प्रार्थनेत लाल रंगाचा उल्लेख आहे, रोज सूर्य उगवतो तोही लाल रंगाचा असतो, त्यामुळे फडणवीस यांना लाल रंगापासून काय अडचण आहे? असा सवाल काँग्रेस नेते व छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी विचारला आहे. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीवरून उपमुख्यमंत्री झाले त्यामुळे ते नैराश्यात आहे. आणि त्याच नैराश्याच्या भावनेतून ते राहुल गांधी यांच्यावर लाल पुस्तकाचा कारण देत नक्षलवाद्यांशी संबंध ठेवल्याचा आरोप करत असल्याचे बघेल म्हणाले. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सलग दोन दिवस राहुल गांधी यांच्या हातातल्या लाल पुस्तकाचा उल्लेख करत राहुल गांधी यांच्या अवती भवती शहरी नक्षलवाद्यांनी नियंत्रण मिळवलं आहे, असा गंभीर आरोप केला होता. हातातल्या लाल पुस्तकाच्या माध्यमातून राहुल गांधी डाव्या विचारसरणीच्या संघटनांना खुणावत आहेत, संकेत देत आहेत असेही फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर आता काँग्रेसनं लाल रंग हिंदू धर्माशी जोडत फडणवीसाना सवाल विचारले आहे.
भाजपच्या एक्स अकाऊंटवरून राहुल गांधीवर टीका
संविधान सिर्फ बहाना है,
लाल पुस्तक को बढ़ाना है..
मोहब्बत के नाम पर
सिर्फ नफरत फैलाना है...
आरक्षण विरोधी (@INCIndia) काँग्रेसची ही संविधान संपवण्याची पहिली पायरी तर नाही ना? काँग्रेसला भारताचे संविधान असेच कोरे करायचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले सर्व कायदे अनुच्छेद वगळून टाकायचे आहेत. म्हणूनच तर राहुल गांधींनी मध्यंतरी आरक्षण रद्द करणार ही भविष्यवाणी केली होती. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लक्षात ठेवा, श्रध्देय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान हा निवडणुकीचा मुद्दा नाही तर भारताचा आणि भारतीयांच्या जगण्याचा पाया आहे. त्यामुळे संविधान विरोधी काँग्रेसला जनताच धडा शिकवेल. संविधानाच्या मारतात बाता.. काँग्रेसचा एकूण विषयच खोटा.. संविधान विरोधी काँग्रेस असे या ट्विटमध्ये भाजपने म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या