एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मी मागास जातीचा असल्यामुळे काँग्रेसने मला शिव्या दिल्या : नरेंद्र मोदी
लोकसभा निवडणुकीचं वारं आता जातीच्या वळणावर जाताना पाहायला मिळत आहे. मागास असल्यामुळे टीका केली जातेय असं म्हणत जातीचा दाखला देत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. अकलूजमध्ये रणजितसिंह निंबाळकरांच्या प्रचारात मोदी बोलत होते. देशातील आदिवासी, शोषित आणि मागास वर्गाला चोर म्हटल्यास सहन करणार नाही, असा इशाराच मोदींनी विरोधी पक्षांना दिला.
सोलापूर : "मी मागास जातीचा असल्यामुळे काँग्रेसने मला शिव्या दिल्या," असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत पुन्हा एकदा ओबीसी कार्डचा वापर केला आहे. सोलापुरातील माढा लोकसभा मतदारसंघातील अकलूजमध्ये आज नरेंद्र मोदींची जाहीर सभा झाली. यावेळी मोदींनी ओबीसी समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न केला.
मोदी म्हणाले की, "मागास जातीचा असल्याने अनेक वेळा अशा गोष्टींचा सामना करावा लागला आहे. अनेक वेळा काँग्रेसच्या नेत्यांनी माझी लायकी दाखवणाऱ्या, माझी जात सांगणाऱ्या शिव्या देण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. पण यावेळी ते आणखीच पुढे गेले आहेत, आता संपूर्ण मागास समाजाला चोर म्हणायला लागले आहेत. अरे मला शिव्या द्या, मी अनेक वर्षांपासून सहन करत आलो आहे आणि करेन. पण चौकीदार, मागास वर्ग असो, दलित, पीडित, शोषित, आदिवासी असो, जर कोणालाही अपमानित करण्यासाठी तुम्ही चोर म्हणण्याची हिंमत केली, तर मोदी सहन करणार नाही, हा देश सहन करणार नाही."
VIDEO | लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदींचं ओबीसी कार्ड
पंतप्रधानांनी 'चौकीदार चोर है' या घोषणेवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, "काँग्रेस आणि त्यांचे साथीदार म्हणतात की, समाजात जे कोणी मोदी आहेत, ते सगळे चोर आहे. मागास असल्याने काँग्रेस माझी जात सांगणाऱ्या शिव्या देत आहेत. काँग्रेसचे नामदार संपूर्ण समाजाला शिव्या देण्यात व्यस्त आहेत. नामदारांनी पहिल्यांदा चौकीदारांना चोर म्हटलं. जेव्हा सगळे चौकीदार मैदानात आले, प्रत्येक भारतीय चौकीदार बोलू लागला तेव्हा यांच्या तोंडाला कुलूप लागलं आहे. ते आता तोंड लपवत फिरत आहेत."
ओबीसी आणि आकडेवारी
1980 मधल्या मंडल कमिशननुसार देशातील ओबीसी वर्गाचं प्रमाण 52 टक्के
2006 मधल्या राष्ट्रीय सर्वेक्षण संस्थेच्या अहवालानुसार ओबीसी वर्गाचं प्रमाण 42 टक्के
कोणत्या धर्मात किती ओबीसी?
धर्म ओबीसी जनता
हिंदू 42.8 टक्के
मुस्लीम 39.2 टक्के
ख्रिश्चन 41.3 टक्के
शीख 2.4 टक्के
जैन 3 टक्के
बौद्ध 0.4 टक्के
संबंधित बातम्या
अकलूजमध्ये पंतप्रधान मोदींनी घातलेलं जॅकेट कोणी भेट दिलं?
यशवंतराव चव्हाणांच्या परिवाराकडून प्रेरणा घ्यायची होती, पवारांच्या कुटुंब नसल्याच्या टीकेला मोदींकडून उत्तर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement