एक्स्प्लोर
कमळाचे चित्र असलेली साडी नेसल्याने सांगलीच्या महापौरांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
महापौर संगीता खोत यांनी मतदानादिवशी माणिकनगर येथील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी संगीता खोत यांनी कमळाचे चित्र असलेली साडी नेसली होती.
सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रकियेवेळी मतदान करण्यासाठी कमळाचे चित्र असलेली साडी नेसून जाणे सांगली महापालिकेच्या महापौर संगीता खोत यांना अडचणीचे ठरले आहे.
कमळाचे चित्र असलेली साडी नेसून मतदान केंद्रावर आल्यामुळे संगीता खोत यांच्याविरोधात महात्मा गांधी पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते अय्याज नायकवडी यांनी या प्रकरणावर आक्षेप घेत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. तसे पुरावे देखील निवडणूक अधिक्काकडे सादर केले होते.
त्यानुसार महापौरांवर आचारसाहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. महापौर संगीता खोत यांनी मतदानादिवशी माणिकनगर येथील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी संगीता खोत यांनी कमळाचे चित्र असलेली साडी नेसली होती.
यावरुन भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हाचा त्यांनी प्रचार केला, अशी तक्रार काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी प्रशासनाकडे केली. त्यानंतर निवडणूक विभागाने या तक्रारीची दखल घेत गांधीनगर पोलीस ठाण्यात महापौर संगीता खोत यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला. खोत या भाजपच्या सांगलीतील नेत्या आहेत. त्या सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement