Yogi Adityanath : 10 पैकी स्वत: ला किती गुण द्याल? पाहा या प्रश्नावर मुख्यमंत्री योगी काय म्हणाले...
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही स्वत: ला 10 पैकी किती गुण द्याल? असाही सवाल करण्यात आला.
Yogi Adityanath : आज उत्तर प्रदेशमध्ये पाचव्या टप्प्यतील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. आज 61 जागांसाठी मतदान होत आहे. अद्याप यूपीमध्ये मतदानाचे दोन टप्पे बाकी आहेत. अशातच भाजप आणि समाजवादी पार्टीकडून विजयाचे दावे केले जात आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही स्वत: ला 10 पैकी किती गुण द्याल? असा सवाल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विचारण्यात आला. यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले की, मी स्वत:च नंबर दिला तर तो अन्याय होईल. 10 मार्चनंतर जनताच नंबर देईल असे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले.
याचबरोबर योगी आदित्यनाथ यांना दोन असा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा तुम्हाला अभिमान आहे? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, की 'यूपीबद्दल लोकांची मते आता बदलली आहेत. लोकांच्या मनातील अराजकता, दंगली आणि गुंडगिरीची धारणा बदलली आहे. यूपीसारखे राज्यही प्रगती करेल हे स्वप्न वाटत होते. पण योजनांमध्ये पारदर्शकता आणली ही दुसरी गोष्ट असल्याचे योगी म्हणाले.
योगी आदित्यनाथ 5 वर्षात बदलले आहेत का?
5 वर्षांत योगी आदित्यनाथ बदलले आहेत का? असा प्रश्न देखील त्यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की, पूर्वी मी खासदार होतो, त्यामुळे मी मंचावर बोलायचो, मी निर्णय घेण्याच्या स्थितीत नव्हतो. पण 2017 नंतर निर्णय घेण्याची ताकद आली. त्यानंतर माझ्यावर जबाबदारी आली. आम्ही समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले.
बुरख्याबद्दल तुमचे मत काय आहे?
बुरख्याबाबत तुमचे काय मत आहे? असा सवाल योगींना करण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की, जर कोणी घरात बुरखा ठेवत असेल, बाजारात जाताना घालत असेल तर त्यात काही अडचण नाही. मात्र, जर कोणी संस्थेत, शाळेत जात असेल तर अशा परिस्थितीत ड्रेस कोड लागू करावा लागेल. तुम्ही घरात काय परिधान करता हा तुमचा विषय आहे, सार्वजनिक ठिकाणी तुम्ही काय परिधान करणार हा देखील तुमचा विषय आहे, त्यावर भाष्य करणार नाही. पण संस्थेची शिस्त पाळणे गरजेचे आहे. कोणतीही हिंदू मुलगी बुरखा घालून शाळेत जात नाही, ती शाळेचा ड्रेस कोड पाळते. तो पेहराव स्वीकारावा लागेल असेही योगी यावेळी म्हणाले.
हिंदुत्वामुळेच सबका साथ और सबका विकास है. भेदभाव न करता जनतेला विकास आणि न्याय मिळवून देण्याचे आमचे काम आहे. प्रत्येकाची श्रद्धा प्रत्येकाच्या मनाप्रमाणे असू शकते. आम्हाला त्यावर बोलण्याची गरज नाही. तुम्ही मुस्लिमांवर का चिडता ? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, मी कोणावरही चिडत नाही. मी सबका साथ सबका विकास यावर बोलतो. लोक म्हणतात धर्माच्या नानावर तुम्हा राजकारण करता, पण लोक काय म्हणतील ते मी सांगू शकत नसल्याचे योगी म्हणाले. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
- UP Election 2022: यूपीमध्ये आज पाचव्या टप्प्यासाठी होणार मतदान, 61 जागांसाठी 693 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
- Narayan Rane : नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ; मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता