एक्स्प्लोर
Advertisement
छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान मोदींना आरसा भेट, ऑनलाईन ऑर्डरची रिसीट ट्विटरवर पोस्ट
कदाचित तुम्ही या आरशाचा वापरच करणार नाही. पंतप्रधान निवासस्थानाच्या एखाद्या कचराकुंडीचही टाकून द्याल. पण आरसा पाहिल्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही. या देशाची 125 कोटी जनता या निवडणुकीत तुम्हा आरसा दाखवणार आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीला वेग आला असून राजकारण वेगळ्याच स्तरावर पोहोचल्याचं दिसत आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून आरसा पाठवला आहे. ऑनलाईन मागवलेला हा आरसा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानी कुरिअर केला आहे.
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आरशाच्या ऑर्डरची रिसिट ट्विटरवर पोस्ट करुन लिहिलं आहे की, "मी तुम्हाला हा आरसा भेट म्हणून पाठवत आहे. हा आरसा तुमच्या लोककल्याण मार्गावरील आपल्या निवासस्थानातील अशा ठिकाणी लावा, जिथून तुम्ही सर्वाधिक वेळा ये-जा करता. जेणेकरुन आरशात स्वत:चा चेहरा वारंवार पाहून तुमचा खरा चेहरा ओळखण्याचा प्रयत्न करु शकाल.
यासोबतच भूपेश बघेल यांनी मोदींना एक पत्रही लिहिलं आहे..@narendramodi जी! मैं आपको यह आईना तोहफा स्वरूप भेज रहा हूं। इस आईने को आप लोक कल्याण मार्ग के अपने आवास में किसी ऐसी जगह लगाएं, जहां से आप सबसे अधिक बार गुजरते हों। ताकि इस आईने में अपनी शक्ल बार बार देख आप अपनी असली चेहरे को पहचानने की कोशिश कर सकें।#ModiVsModi pic.twitter.com/3TJHUxwknG
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) April 1, 2019
माननीय मोदीजी! तुम्हाला मोदीजी तर बोलू शकतो ना? खरंतर तुम्ही स्वत:ला एवढी नावं ठेवली आहेत की, लोक संभ्रमात आहे, तुम्हाला नेमकं कोणत्या नावाने हाक मारयची. चहावाला, गरीब, प्रधानसेवक, चौकीदार, साहेब, आणि आणखी बरीच नावं.... स्वतंत्र भारताचे तुम्ही असे पहिले पंतप्रधान आहात, ज्यांचे एवढे चेहरे आहेत. जे आपल्या सोयीनुसार, या चेहऱ्यांचा मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापर करता. पण यापैकी तुमचा खरा चेहरा कोणता आहे? तुम्ही 2014 मध्ये चहावाला बनलात. तुम्ही पीआर टीमने तुमची ही प्रतिमा योग्यपद्धतीने विकली आणि मतं मिळवली. पण चहाच्या किटलीला तुम्ही हात तरी लावल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. जर तुम्ही चहा विकलाच नाही तर तुम्ही चहावाला कसे बनलात मोदीजी? नंतर भारताला दहा लाखांचा सूट घालणारा गरीबही मिळाला. एक असा गरीब ज्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की, त्याच्या मेकअपवरच हजारों रुपये खर्च केले जातात. तुमचं कलम, दिवसभरात अनेकदा बदलले जाणारे तुमचे कपडे, तुमचा नाश्ता आणि तुमचं जेवण सगळ्याचीच मोठी चर्चा झाली होती. 2 हजार कोटी तर तुम्ही परदेशी दौऱ्यातच घालवले आणि 4 हजार 600 कोटी रुपये जाहिरातीत. तुमची ही गरिबी पाहून चांगल्या चांगल्या गरिबांना धक्का बसेल. केवळ या विशेषणांपर्यंत मर्यादित नाही मोदीजी. 2014 च्या आधी तुम्ही काळापैसाविरोधी होता, भ्रष्टाचारविरोधी होता. जीएसटीविरोधी होता, पाकिस्तानला लव लेटर लिहिण्याच्याविरोधात होता, तुम्ही चीनला लाला डोळे दाखवणार होता, गंगेचे पुत्र होता, स्मार्ट सिटी आणि आदर्श गावांचं स्वप्न विकणारे राजकारणी होता. स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाचे सच्चे समर्थक होता. पण 2014 नंतर या सगळ्याच्या विरोधात गेलात. काळा पैसा असणाऱ्यांना परदेशात पळवून लावलं, राफेलमध्ये अनिल अंबानींसोबत भ्रष्टाचारातील भागीदार बनलात. मध्यरात्री संसद सुरु करुन जीएसटी बिल मंजूर केलं, ज्यामुळे या देशाच्या अर्थव्यवस्थेची कंबर मोडली, गंगा नदीची अवस्था दयनीय आहे, बेरोजगारीने सर्व रेकॉर्ड मोडित काढले आहेत. तुम्ही निमंत्रण नसताना पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाऊन आलात, चीनच्या अध्यक्षांसोबत झोपाळ्यावर बसलात, वाराणसीला क्योटो बनवायचं असेल तर 'प्रत्येक खात्यात 15-15 लाख' सारखी आश्वासनही जुमला सिद्ध झालं. तुमचा खरा चेहला कोणता आहे, हे लोकांना ओळखताच येत नाही. तुम्हाला तरी लक्षात आहे का, तुमचा खरा चेहला कोणता आहे? याआधी तुम्ही खोटेपणाचा आणखी एक मुखवटा घालून जनतेसमोर येण्याआधी मी तुम्हा एक आरसा भेट म्हणून पाठवत आहे. हा आरसा तुमच्या लोककल्याण मार्गावरील आपल्या निवासस्थानातील अशा ठिकाणी लावा, जिथून तुम्ही सर्वाधिक वेळा ये-जा करता. जेणेकरुन आरशात स्वत:चा चेहरा वारंवार पाहून तुमचा खरा चेहरा ओळखण्याचा प्रयत्न करु शकाल. कदाचित तुम्ही या आरशाचा वापरच करणार नाही. पंतप्रधान निवासस्थानाच्या एखाद्या कचराकुंडीचही टाकून द्याल. पण आरसा पाहिल्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही. या देशाची 125 कोटी जनता या निवडणुकीत तुम्हा आरसा दाखवणार आहे. तयार आहात ना मोदीजी? #ModiVsModiहो सकता है कि आप इस आईने का इस्तेमाल ही ना करें। पीएम निवास के किसी कूड़ेदान में फेंक दें। लेकिन आईना देखने से आप फिर भी नहीं बच पाएंगे। इस देश की 125 करोड़ की आबादी इस चुनाव में आपको आईना दिखाने वाली है। तैयार हैं ना मोदी जी? #ModiVsModi पूरा खत - https://t.co/n6J8EcD365
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) April 1, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement