Chandrashekhar Bawankule: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांचं नावच विसरले अन्...;गटनेता निवडताना नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ
Chandrashekhar Bawankule: बावनकुळे यांनी मंचावर बोलताना सर्वांचा उल्लेख केला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचं नाव घ्यायला चंद्रशेखर बावनकुळे विसरले. मात्र, नंतर पुढे बोलत असताना बावनकुळे यांच्या लक्षात आलं.
मुंबई: राज्याच्या राजकारणात सत्ता स्थापनेच्या दृष्टीकोनातून मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच आज विधिमंडळात भाजपच्या गट नेतेपदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. गटनेता निवडीसाठी भाजपचे राज्यातील सर्व बडे नेते, आमदार, उपस्थित होते. त्याचबरोबर या निवड प्रक्रियेसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आज या नेत्यांच्या उपस्थितीत गटनेता निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी बावनकुळे यांनी मंचावर बोलताना सर्वांचा उल्लेख केला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचं नाव घ्यायला चंद्रशेखर बावनकुळे विसरले. मात्र, नंतर पुढे बोलत असताना बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या ही चूक लक्षात आली आणि त्यांनी ही चूक सुधारली.
चंद्रशेखर बावनकुळेंनी चूक सुधारली
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बोलण्यास सुरूवात केली तेव्हा राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशाचं, महायुतीचं आणि भाजपातील सर्व नेते, पदाधिकारी कार्यकर्ते आणि राज्याची जनता यांचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी गटनेता पदाच्या निवडीसाठी आलेल्या केंद्रीय निरीक्षकांचे स्वागत केलं आभार मानले, त्यानंतर बोलताना त्यांनी काही नेत्यांची नावं घेतली आणि पुढे बोलायला सुरूवात केली. मात्र, दरवेळी मंचावर उपस्थित असलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज मंचाच्या खाली असल्याने त्यांच्याकडे बावनकुळेंचं लक्ष गेलं नाही.
पुढे बोलत असाताना ते म्हणाले, सर्वांच्या नावाचा मी उल्लेख करू शकणार नाही. मला क्षमा करावी, आमच्या कोर कमिटीचे सदस्य, उपस्थित सर्व बंधु-भगिनी, मी आधीच सांगितलं हा ऐतिहासिक दिवस आहे. माफ करा मी, आपले नेते देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करायचं राहून गेलं. देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. बानवकुळे यांनी फडणवीसांचं नाव घेताच उपस्थितांनी एक उत्साह दाखवत टाळ्या वाजवल्या, त्यानंतर पुढे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, ते (फडणवीस) खाली असल्यामुळे राहून गेलं. खरंतर आपल्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. ऐतिहासिक विजय आपल्याला मिळाला. आपल्या लाखो कार्यकर्त्यांनी, भाजपच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, भाजपचे आपण सर्व उमेदवार होतो. आता आपण आमदार आहोत, असं बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
तुम्ही सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपण ऐतिहासिक महाविजय व्हावा यासाठी प्रचंड ताकद लावली. प्रचंड मेहनत देखील केली. मोदींच्या नेतृत्वात आपण डबल इंजिन सरकार पुढे नेऊ शकतो, महाराष्ट्र हे देशातील सर्वोत्तम राज्य होऊ शकतं. हे जनता आणि मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. जनतेने आपल्याला भरभरून यश दिलं. प्रचंड यश दिले, असंही पुढे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.