एक्स्प्लोर

आम्ही आता पूर्ण सावध असून गनिमी काव्याचे उत्तर गनिमी काव्यानेच देऊ, चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोधकांसह महायुतीतील बंडखोरांना इशारा

Chandrashekhar Bawankule : सध्या विरोधक आमच्याशी गनिमी काव्याने लढत असून आम्ही त्या गनिमी काव्याचे उत्तर गनिमी काव्यानेच देणार आहोत. अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इशारा दिलाय.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सध्या विरोधक आमच्याशी गनिमी काव्याने लढत असून आम्ही त्या गनिमी काव्याचे उत्तर गनिमी काव्यानेच देणार आहोत. यावेळी मात्र आम्ही बेसावध नसून पूर्णपणे  सावध आहोत. परिणामी शेवटपर्यंत उमेदवारी बाबत कोण काय भूमिका घेतंय, याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. आज महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सर्व जागांची घोषणा होईल. मात्र महायुतीत जो कोणी वेगळी भूमिका घेतंय, त्याबाबतही आम्ही आता गंभीर आहोत. अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विरोधकांबरोबर बंडखोरीच्या तयारीत असणाऱ्या महायुतीतील (Mahayuti) नेत्यांना इशारा दिलाय.

गनिमी काव्याचे उत्तर गनिमी काव्यानेच देऊ- चंद्रशेखर बावनकुळे 

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील भाजपमध्ये असणारा तिढा सोडवण्यासाठी आलेल्या बावनकुळेंनी परिचारक आणि अवताडे यांच्यात मनोमिलन घडवल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. महायुतीकडे उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्यामध्ये काही नाराज मंडळी असून काही अति नाराज आहेत. जे अति नाराज आहेत ते दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी दाखल करीत आहेत आणि जे कमी नाराज आहेत त्यांची समजूत आम्ही चार नोव्हेंबरपर्यंत काढू, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. 

विरोधक फक्त नाईंटी-नाईंटीत अडकलेत

विरोधकांना केवळ मुख्यमंत्र्याच्या खुर्चीचे पडले असून शरद पवार गॅंगमधील प्रत्येक पक्षाला मुख्यमंत्री पदाची खुर्ची हवी आहे . त्यांना सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता एवढेच साधायचा आहे. असा टोला लगावताना सध्या त्यांचे नाईंटी-नाईंटी सुरू असल्याची खिल्ली ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उडवली. ज्या जागांवर महायुतीचे अद्याप उमेदवार जाहीर करायचे आहेत त्या ठिकाणी आज दिवसभरात उमेदवार जाहीर होतील, असा दावाही त्यांनी केला. कोण किती जागा लढवणार या आकडेवारीत आम्ही जात नसून जो उमेदवार निवडून येतो त्यालाच उमेदवारी महायुतीकडून दिली जात आहे. यंदा सत्ताही महायुतीची येणार असल्याचा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केलाय.

परिचारक आणि अवताडे यांच्यात मनोमिलन

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या तिकिटासाठी रस्सीखेच होती. परिचारक हे तुतारी हातात घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार अशी जोरदार चर्चा सुरू असताना बंडखोरी शांत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिचारक समर्थक आणि अवताडे यांची एकत्रित बैठक घडवून आणली. बंद खोलीत झालेल्या या बैठकीचा शेवट गोड झाला असला तरी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या चेहऱ्यावरची नाराजी मात्र दूर झालेली दिसत नव्हती. ती स्थिती परिचारक समर्थकात होती. गेले दोन महिने प्रशांत परिचारक हे पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघात गावोगावी फिरून मतदारांचा कानोसा घेत होते.

परिचारक रिंगणात उतरणार म्हणून भाजपनेही अवताडे यांचे तिकीट थांबवून ठेवले होते तर अजूनही महाविकास आघाडीतील उमेदवाराची घोषणा झाली नव्हती. परिचारकांची नाराजी दूर करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे हे खास विमानाने सोलापुरात येऊन त्यांनी पंढरपूर मध्ये परिचारकांच्या निवासस्थानी बंद खोलीत जवळपास दोन तास बैठक घेतली. या बैठकीत परिचारक समर्थकांनी अवताडींवर असलेली आपली नाराजी बोलून दाखवली . यानंतर आमदार आवताडे यांना परिचारक यांच्या निवासस्थानी बोलवण्यात आले व पुन्हा बंद खोलीत अवताडे आणि परिचारक समर्थकांची बराच वेळ चर्चा झाली. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Congress Candidate List: काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
Tuljapur VidhanSabha Election : राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSujay Vikhe Patil Full Speech : अश्रू अनावर,थोरांतावर तुटून पडले!सुजय विखेंचं खणखणीत भाषण...Manoj Jarange Jalna : देवेंद्र फडणवीस ते विधानसभा निवडणूक; मनोज जरांगेंची प्रतिक्रियाRaigad  District Vidhan Sabha Constituency 2024 : भरतशेठ गोगावलेंची मंत्रिपदाची इच्छापुर्ती होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Congress Candidate List: काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
Tuljapur VidhanSabha Election : राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
नितेश राणेंविरुद्ध मुस्लीम नेत्यानं ठोकला शड्डू; सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन विधानसभा लढणार
नितेश राणेंविरुद्ध मुस्लीम नेत्यानं ठोकला शड्डू; सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन विधानसभा लढणार
Embed widget