Lok Sabha Election : हिंदी बेल्टमध्ये भाजपचं वर्चस्व सिद्ध, लोकसभेच्या 82 जागा भाजपच्या खिशात जाणार?
BJP Won Assembly Election In Hindi Belt : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमध्ये लोकसभेच्या 82 जागा असून त्यापैकी 66 जागांवर भाजपचे खासदार निवडून आले आहेत.
![Lok Sabha Election : हिंदी बेल्टमध्ये भाजपचं वर्चस्व सिद्ध, लोकसभेच्या 82 जागा भाजपच्या खिशात जाणार? BJP Won Assembly Election In Hindi Belt supremacy in north india 82 Lok Sabha seats marathi news abpp Lok Sabha Election : हिंदी बेल्टमध्ये भाजपचं वर्चस्व सिद्ध, लोकसभेच्या 82 जागा भाजपच्या खिशात जाणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/01/af1b2a304060e83ebb066b500cc358a11701428467503490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: उत्तर भारतात भाजपने (BJP) पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करत काँग्रेसच्या (Congress0 हातातील राजस्थान आणि छत्तीसगड राज्य (Assembly Election Result 20230 हिसकावून घेतलं आहे. त्यामुळे हिंदी बेल्टमध्ये (Hindi Belt States) काँग्रेसकडे एकही राज्य राहिलं नसून सर्व राज्ये ही भाजपने काबिज केली आहेत. नुकत्याच झालेल्या चार राज्याच्या निवडणुकीत तीन राज्यांमध्ये बहुमत मिळवलं असून एका राज्यामध्ये काँग्रेस सत्तेत आलं आहे. त्यामुळे या चारही राज्यातील लोकसभेच्या 82 जागांपैकी बहुतांश जागा भाजप आपल्या खिशात सहजपणे टाकेलं असं चित्र आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांची निवडणूक म्हणजे मिनी लोकसभा निडवणूक (Lok Sabha Election0 समजली गेली. या चार राज्यांमध्ये लोकसभेच्या 82 जागा आहे. चारपैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेसने बहुमत मिळवलं आहे. तर दक्षिण भारतातील तेलंगणा या राज्यात काँग्रेसने बाजी मारली आहे.
चार राज्यातील लोकसभेच्या जागा (82)
राजस्थान- 25 25
मध्य प्रदेश- 29 28
तेलंगणा- 17 4
छत्तीसगड- 11 9
गेल्या लोकसभेचं चित्र काय?
गेल्या वेळच्या म्हणजे 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वरील चार राज्यांतील 82 जागांपैकी भाजपने 66 जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये राजस्थानमध्ये सर्व म्हणजे 25 जागा, मध्य प्रदेशमध्ये 28 जागा, तेलंगणामध्ये 4 जागा आणि छत्तीसगडमध्ये 9 जागांवर भाजपने विजय मिळवला होता. उत्तर भारतातील बहुतांश जागा या भाजपने जिंकल्या होत्या. त्यामुळे केंद्रातील त्यांची सत्ता अधिक मजबूत झाली.
हिंदी बेल्ट काँग्रेस मुक्त
हिंदी बेल्ट समजल्या जाणाऱ्या उत्तर भारतातील राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागल्याने हा भाग काँग्रेस मुक्त झाल्याचं चित्र आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकीतही त्याचा परिणाम पहायला मिळण्याची शक्यता असून भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
भाजपकडून नरेंद्र मोदींचा चेहरा
भाजपकडून ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) चेहऱ्यावर लढवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तर भारतामध्ये, हिंदी बेल्टमध्ये करिश्मा आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांच्यामागे जनता उभी राहिल्याचं स्पष्ट आहे. या चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल म्हणजे लोकसभेसाठी या पट्ट्यात भाजपला मिळालेला एक प्रकारचा कौलच असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचं दिसून येतंय.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)