भाजपच्या तिसऱ्या यादीत तीन विद्यमान आमदारांना डच्चू, नुकतेच प्रवेश केलेल्या नेत्याला संधी; विदर्भात कुणा-कुणाची वर्णी?
BJP : भाजपची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली असून यात तीन विद्यमान आमदारांना डच्चू देण्यात आली आहे. तर नुकतेच प्रवेश केलेल्या नेत्याला संधी देत निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून भाजपची (BJP) 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या या तिसऱ्या यादीत तीन विद्यमान आमदारांना डच्चू देण्यात आली आहे. तर नुकतेच प्रवेश केलेल्या नेत्याला संधी देत निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. लातूर शहरमधून अर्चना पाटील चाकूरकर तर चंद्रपूर किशोर जोरगेवार यांना भाजपने संधी दिली आहे. विशेष म्हणजे किशोर जोगरेवार यांनी एकच दिवसापूर्वी भाजपात प्रवेश केला होता. भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, त्यानंतर 22 उमेदवांची दुसरी यादी जाहीर केली. आता, भाजपने 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. त्यामुळे, भाजपने 146 उमेदवारांना आत्तापर्यंत मैदानात उतरवल्याचं दिसून आलं. तिसऱ्या यादीत विदर्भातील (Vidarbha) 25 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलीय.
भाजप तिसरी यादी विदर्भात कुणा-कुणाची वर्णी?
१) मुर्तीजापुर मधून विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे...
२) कारंजा मधून दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांच्या जागी सई डहाके यांना उमेदवारी दिली आहे...
३) तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर यांच्या विरोधात राजेश वानखडे उमेदवार राहतील...
४) मोर्शी मतदारसंघातून उमेश यावलकर यांना पक्षाने संधी दिली आहे.. विशेष म्हणजे याच मतदारसंघातून विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांनीही त्यांना अजित दादा कडून एबी फॉर्म मिळाल्याचा दावा केला आहे... त्यामुळे या मतदारसंघातून महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता बळावली आहे...
५) आर्वी मतदारसंघातून सुमित वानखेडे यांना संधी देण्यात आली असून सुमित वानखेडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए राहिले आहे...
६) काटोल मतदारसंघातून सलील देशमुख यांच्या विरोधात चरण सिंग ठाकूर यांना संधी दिली आहे... मागील निवडणुकीत अनिल देशमुख आणि चरणसिंह ठाकूर चा 17000 मतांनी पराभव केला होता...
७) सावनेर मतदारसंघातून सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांच्या विरोधात आशिष देशमुख यांना संधी देण्यात आली आहे...
८) नागपूर मध्य या मतदारसंघातून पक्षाचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार प्रवीण दटके यांना पक्षाने उमेदवार बनवले आहे... ( या मतदारसंघातून भाजपने गेले अनेक निवडणुकांमध्ये हलबा जातीचा उमेदवार दिला होता... यंदा ती मालिका तोडत भाजपनं कुणबी उमेदवार दिला आहे..)
९) नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुधाकर कोहळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे....
१०) नागपूर उत्तर मतदार संघातून काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत यांच्या विरोधात भाजपने माजी आमदार डॉ. मिलिंद माने यांना उमेदवारी दिली आहे... विशेष म्हणजे नितीन राऊत आणि मिलिंद माने सलग तिसऱ्यांदा समोरासमोर उभे ठाकले आहे...
११) साकोली मतदारसंघातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात पक्षाने कालच राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या अविनाश ब्राह्मणकर यांना संधी दिली आहे...
१२) चंद्रपूर मतदारसंघातून किशोर जोरगेवार यांना उमेदवारी मिळाली आहे.. आर्णीमध्ये भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम उमेदवार राहतील..
१३) तर उमरखेड मध्ये भाजपने विद्यमान आमदाराला डच्चू देत किशन वानखेडे यांना संधी दिली आहे...
14)अखेर अमरावतीच्या वरुड-मोर्शी मतदारसंघातुन आमदार देवेंद्र भुयार यांना महायुतीची उमेदवारी....
हे ही वाचा