एक्स्प्लोर

Goa CM : गोव्याची धुरा अखेर प्रमोद सावंत यांच्या हाती, सलग दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

Goa CM: गोव्यात भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सावंत यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली.

Goa Election : नुकतीच देशात गोवा, उत्तरप्रदेश, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यांतील निवडणूक पार पडली. 10 मार्च रोजी निकालही समोर आल्यानंतर आता एक-एक करुन राज्यांचे मुख्यमंत्री निश्चित होत आहे. गोव्यातील मुख्यमंत्री पदाची धुरा पुन्हा एक प्रमोद सावंत यांच्या हातीच भाजपने सोपवली आहे. नुकतीच त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून त्यामुळे सलग दुसऱ्यांदा सावंत मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

गोव्यात भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सावंत यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली. गोवा विधानसभा निवडणुकीत विजय झालेल्या भाजपच्या आमदारांची बैठकही काही दिवसांपूर्वी पार पडली होती. यावेळी जवळपास प्रमोद सावंत यांच्या नावाचीच चर्चा होती. त्यानंतर आता अधिकृतपणे ही घोषणा करण्यात आली आहे.

प्रमोद सावंत यांचा राजकीय प्रवास

डॉ. प्रमोद सावंत यांची राजकीय कारकीर्द कोल्हापुरातूनच सुरू झाली. जेव्हा ते येथे वैद्यकीय शिक्षण घेत होते. त्याचवेळी त्यांनी महाविद्यालयाच्या सरचिटणीस (GS) पदाची निवडणूक जिंकून आपले नेतृत्वगुण दाखवून दिले होते. बारावीपर्यंत गोव्यात शिक्षण घेतल्यानंतर सावंत यांनी पुढील शिक्षणासाठी 1991 मध्ये कोल्हापूरच्या रंकाळवेश दुधाळी परिसरात असलेल्या गंगा आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळी ते रंकाळा परिसरात भाड्याने राहत होते.

प्रमोद सावंत यांचे नेतृत्वगुण ओळखून त्यांच्या महाविद्यालयातील मित्र परिवाराने त्यांना 1992 मध्ये सरचिटणीसपदाच्या निवडणुकीत उभे केले. या निवडणुकीत ते प्रचंड बहुमतांनी जिंकले. यातून खर्‍या अर्थाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. 1997 मध्ये त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठातून ‘बीएएमएस’ ही पदवी मिळवली. त्यादरम्यान त्यांनी अनेक लोकांशी संपर्क साधला. प्रमोद सावंत हे 2012 मध्ये पहिल्यांदा गोव्यातील साखळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यावेळी त्यांच्या कोल्हापूरच्या 1997 च्या बॅचने सत्कार केला होता. त्यानंतर ते दुसऱ्यांदा विजयी झाले आणि विधानसभेचे अध्यक्ष झाले. पुढे दिवंगत भाजप नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांची पहिल्यांदा 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. 

महत्त्वाच्या बातम्या :  

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी

व्हिडीओ

NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे
Seher Shaikh MIM : मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू, विरोधकांच्या अहंकाराला मातीमोल केलंय- सहर शेख
Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालयातच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालयातच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
Embed widget