एक्स्प्लोर

25 तारखेला मातोश्रीसमोर येऊन कायमचं तोंड बंद करेन : नारायण राणे

‘मी’ असा तसा होतो, तर मला मुख्यमंत्री का बनवले? शाखाप्रमुख, बेस्ट चेअरमन, मंत्री, आमदार, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता ही पदे का दिली?, असा सवालही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

सावंतवाडी : निवडणूक होऊ दे त्यानंतर मातोश्री समोर येऊन तोंडं कायमची बंद करेन असा इशारा भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. राणे गप्प बसतील असे कोणाला वाटत असेल तर तसे होणार नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात जिल्ह्यातील तीनही जागा भाजपच्या असतील असा विश्वास व्यक्त केला. सावंतवाडीतल्या प्रचारसभेत राणे बोलत होते. ‘मी’ असा तसा होतो, तर मला मुख्यमंत्री का बनवले? शाखाप्रमुख, बेस्ट चेअरमन, मंत्री, आमदार, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता ही पदे का दिली?, असा सवालही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना केला. Narayan Rane | राणे टीका पचवत नाही, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर नारायण राणेंचा सूचक इशारा | ABP MAJHA दीपक केसरकर यांना विकासाची दिशा माहिती आहे का? असा सवाल करत नारायण राणे यांनी आपल्या  भाषणाला सुरुवात केली. या जिल्ह्याचा पालकमंत्री मंत्रिमंडळात चेष्टा आणि मस्करीचा विषय बनला आहे. मंत्रिमंडळातील जोकर म्हणजे दीपक केसरकर अशा परखड शब्दात नारायण राणे यांनी केसरकरांवर टीका केली आहे. पर्यटनात गोवा सिंधुदुर्ग पेक्षा जास्त पुढे असल्याने गोव्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करणार आहे. कोकणाच्या विकासासाठी उध्दव ठाकरे यांनी काय केलं? त्यांचं योगदान काय? शिवसेनेच्या नेत्यांनी काय केलं कोकणासाठी? यांसारखे सवाल राणे यांनी यावेळी उपस्थित केले. Uddhav Thackeray Slams Rane | मान वाकवणारा स्वाभिमान काय कामाचा, उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर टीका | ABP MAJHA कणकवलीमधील उद्धव ठाकरे यांच्या सभेत 18 मिनिटांच्या भाषणात नारायण राणेंवर 18 मिनिटे उध्दव ठाकरे बोलले. अन्य ठिकाणी जाऊन त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यावर टीका का केली नाही असा सवालही राणे यांनी उपस्थीत केला. राणे 24 तारीखेपर्यंत बोलणार नाही. निवडणुकीनंतर मातोश्री समोर येऊन 25 तारीखेला बोलेन आणि सेनेचे तोंड बंद करेन. वाघाचं नाव घेणं उद्धवला शोभत नाही. शेळ्या-मेंढ्यांचीच नाव उध्दव ठाकरेंच्या तोंडात शोभतील. शिवसेनेच्या जन्मापासून वाढताना पाहिलेला नारायण राणे आहे. कोकणाला आत्तापर्यंत सेनेने काही दिल नाही, मीच सरकारशी भांडून योजना आणल्या. सी-वर्ल्ड प्रकल्प सिंधुदुर्गमध्ये, मालवणमध्ये मी आणला. येत्या दोन वर्षात आम्ही सी-वर्ल्ड प्रकल्प करु असं मुख्यमंत्री बोलले आहेत. दीपक केसरकरांनी खोट बोलून मंत्रीपद घेतलं. तसेचं मला न घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना फोन करून छळलं असा आरोपही राणेंनी दीपक केसरकर यांच्यावर केला. जिल्ह्यातील सर्वात मोठी तिलारी नळपाणी योजना जी दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण पर्यंत जाणार होती ती दीपक केसरकर यांनी बंद केली. त्या योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदारकडून पैसे घेऊन अर्ध्ये पैसे मातोश्रीवर पोहोचले असतील. म्हणून प्रकल्प बंद केला असल्यांचही राणे यांनी सांगितले. EXCLUSIVE | आदित्य ठाकरेंना आधी आमदार तर होऊ द्या, निलेश राणेंची मुलाखत | सिंधुुदुर्ग | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभेत लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
Chhagan Bhujbal : होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange on Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचं मला देणं घेणं नाही, भुजबळांवर भाष्य टाळलंPrakash Ambedkar Full PC : सोमनाथ सूर्यवंशींच्या अंत्यसंस्काराला मी थांबणार : प्रकाश आंबेडकरAshok Chavan :मी मुख्यमंत्री असतो, तर नांदेडला मंत्रिपद देण्याचा विचार केला असताRajendra Gavit on Cabinet|महायुतीच्या मंत्रिमंडळात आदिवासी आमदारांना स्थान नाही,राजेंद्र गावित नाराज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभेत लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
Chhagan Bhujbal : होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
IND vs AUS : ऑस्ट्रेलियात टीम इंडिया संकटात, रोहित शर्मा अन् गौतम गंभीरमधील समन्वयावर सवाल,  दोन मालिकेतील पराभवाचा दाखला 
रोहित अन् गंभीरमधील केमिस्ट्रीवर प्रश्नचिन्ह, टीम इंडिया ऑस्ट्रेलियात संकटात,नेमकं काय घडतंय?
Chhagan Bhujbal : भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
Nagpur News : महायुतीच्या सर्व आमदारांना संघ कार्यालयातून निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात महायुतीच्या सर्व आमदारांना निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
Embed widget