एक्स्प्लोर

UP Election 2022: काँग्रेसकडून मैदानात असलेली 'बिकिनी गर्ल' अर्चना गौतम चर्चेत; बॉलिवूडमध्ये केलंय काम

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) अभिनेत्री अर्चना गौतम (Archana Gautam) हिला उमेदवारी दिली आहे. कोण आहे अर्चना गौतम..

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून आपल्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर (Congress Announces First List of Candidate UP Assembly Election) करण्यात आलीय. या निवडणुकीत 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्यात आलीय. यात उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईलाही तिकीट देण्यात आलं आहे. शिवाय या यादीत  'बिकिनी गर्ल' अर्चना गौतम हिचं देखील नाव आहे. 

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) अभिनेत्री अर्चना गौतम (Archana Gautam) हिला उमेदवारी दिली आहे. अर्चना गौतम मेरठमधील हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघामधून नशीब आजमावणार आहे. 

अर्चना गौतमनं अभिनेता विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्यासोबत ग्रेट ग्रँड मस्ती चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती श्रद्धा कपूरच्या हसिना पारकर आणि बारात कंपनी या चित्रपटात देखील दिसली होती. जंक्शन वाराणसी चित्रपटामध्ये अर्चनाने एक आयटम नंबर केला होता. तिने टी-सीरिजच्या म्युझिक व्हिडीओंमध्येही काम केले आहे.  

अर्चना गौतम ही 2014 मध्ये मिस उत्तर प्रदेश बनली होती. त्यानंतर ती मिस बिकिनी इंडिया आणि मिस बिकिनी युनिव्हर्स इंडिया बनली होती. तिने मिस कॉसमॉस वर्ल्ड 2018 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.  अर्चना गौतम अभिनेत्री, मॉडेल आणि ब्युटी पेजेंट विजेता आहे. 

अचर्ना गौतम हिने मेरठमधील आयआयएमटीमधून बीजेएमसी विषयात पदवी घेतली होती. अर्चना गौतम हिने 2015 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत तिला बिकिनी गर्ल म्हणून ओळखले जाते. आता ती IPL...it’s Pure Love या तेलुगू आणि गुंडाज आणि 47A या तामिळ चित्रपटांमध्ये काम करत आहे. अनेक जाहिरातींमधून देखील ती दिसून आली आहे. 

आता अर्चना राजकीय आखाड्यात उतरली असून प्रियांका गांधी यांनी नुकत्याच घोषित केलेल्या काँग्रेसच्या पहिल्या यादीत तिचं नाव आहे. बॉलिवूडमध्ये नाव कमावल्यानंतर राजकीय मैदानात अर्चना कशी बाजी मारते याकडे लक्ष लागून आहे. 

सोशल मीडियावर देखील अर्चनाचे मिलियन्समध्ये फॉलोवर्स आहेत. तिथं ती सातत्यानं आपले फोटो शेअर करत असते.

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
Embed widget