Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Mamata Banerjee: ममता बॅनर्जी म्हणाल्या, "माझ्या गाडीवरील हल्ला हा एक कट आहे. मी इथे येणार असल्याची माहिती पोलिसांना दिली होती, तरीही पोलिसांनी कोणतीही सुरक्षा व्यवस्था केली नाही

Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर कारवर दगडफेक करण्यात आली. जमावाने पोलिसांसमोर कार थांबवून त्यावर चिखल आणि गाळ फासला. काहींनी तर चपला आणि दगडही फेकले. जर गाडीची खिडकी उघडी असती, तर त्यांचे डोके फुटले असते आणि त्यात मृत्यूही झाला असता, असा गंभीर आरोप ममता यांनी केला. टीएमसी कार्यकर्त्याच्या निधनानंतर ममता बॅनर्जी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील त्याच्या कुटुंबीयांना भेटायला जात होत्या. वाटेत, बिजापूरजवळ स्थानिक जमावाने चोर, चोर अशा घोषणा देत त्यांचा ताफा थांबवला.
संपूर्ण पश्चिम बंगाल गुंडांच्या ताब्यात
ममता बॅनर्जी म्हणाल्या, "माझ्या गाडीवरील हल्ला हा एक कट आहे. मी इथे येणार असल्याची माहिती पोलिसांना दिली होती, तरीही पोलिसांनी कोणतीही सुरक्षा व्यवस्था केली नाही. संपूर्ण पश्चिम बंगाल गुंडांच्या ताब्यात आहे." तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) कार्यकर्ते बिरजू केओट यांच्या निधनानंतर ममता बॅनर्जी त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला आल्या होत्या. हलीशहर पोलीस कोठडीत असताना प्रकृती खालावल्याने बिरजू यांचे निधन झाले.
#WATCH | Barrackpore: Former West Bengal Chief Minister Mamata Banerjee's vehicle was attacked while she was on her way to meet a TMC worker in North 24 Parganas.
— ANI (@ANI) August 9, 2026
As per former CM Mamata Banerjee, "Large stones were hurled at my car by anti-social elements,right in front of the… pic.twitter.com/JrTd2uFNlK
हा जनतेचा संताप, शुभेंदू अधिकारींचा आरोप
मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी म्हणाले, "तुम्ही (टीएमसीने) इतकी चोरी केली आहे की, जनतेने तुम्हाला चोर म्हटले पाहिजे." आर. जी. कार मेडिकल कॉलेजमधील पीडितेच्या मृत्यूच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त ममता बॅनर्जी यांनी तिच्या कुटुंबीयांना भेट का दिली नाही, असा प्रश्न सुवेंदू यांनी विचारला. अधिकारी म्हणाले, "तुम्ही आज पीडितेच्या घरी जाऊ शकला असता. तुम्ही गळ्यात टॉवेल गुंडाळून रत्ना देबनाथ यांच्याकडे जाऊन, तुमच्याकडून चूक झाली आणि तुम्हाला वाईट वाटत आहे, असे म्हणत माफी मागू शकला असता. मला खात्री आहे की त्यांनी तुम्हाला माफ केले असते."
महिनाभरात चौथ्यांदा हल्ला
8 जुलै रोजी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे टीएमसीच्या रॅलीत गोंधळ झाला. ममता बॅनर्जी संतापल्या आणि त्यांनी आपल्याच पक्षाच्या तीन कार्यकर्त्यांना कानशिलात मारल्याचे दिसले. बारुईपूरमध्ये एका 11 वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ ही रॅली काढण्यात आली होती. यादरम्यान, 'चोर, चोर' अशा घोषणा देण्यात आल्या आणि काही लोकांनी रॅलीतील सहभागींवर अंडी फेकायला सुरुवात केली. भाजप कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातला आणि शारीरिक हिंसाचारही झाला, असा आरोप टीएमसीने केला. बंगालमध्ये अराजकता पसरली असून पोलीस भाजप कार्यकर्त्यांसारखे वागत आहेत, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
4 मे रोजी, बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना ममता बॅनर्जी यांनी गंभीर आरोप केले. मतमोजणी केंद्राच्या आत आपल्यावर हल्ला करण्यात आला, मारहाण करण्यात आली आणि ढकलण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले होते, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
ममता बॅनर्जी यांची Z+ सुरक्षा कायम
दुसरीकडे, मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतरही ममता बॅनर्जी यांची Z+ सुरक्षा कायम आहे. मे 2026 मध्ये पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाल्यानंतर, त्यांच्या निवासस्थानाबाहेरील अतिरिक्त पोलीस बंदोबस्त कमी करण्यात आला, परंतु Z+ सुरक्षा हटवण्यात आली नाही. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, ममता बॅनर्जी यांच्या Z+ सुरक्षेत अंदाजे 55 जवानांचा समावेश असतो.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा





















