एक्स्प्लोर
Advertisement
राष्ट्रवादीच्या नेत्यांसह त्यांच्या पक्षाचाच समारोप केल्याशिवाय राहणार नाही, पंकजा मुंडेंचं वक्तव्य
येत्या 23 तारखेला परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेचा समारोप शरद पवारांच्या उपस्थितीत होणार आहे.
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह त्यांच्या पक्षाचाच समारोप केल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. येत्या 23 तारखेला परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेचा समारोप शरद पवारांच्या उपस्थितीत होणार आहे. यावर टीका करताना पंकजा मुंडेंनी हे असं विधान केलं. दिंद्रुड इथे आयोजित पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, "गोपीनाथ मुंडेंनी ज्यांना राजकारणातून हद्दपार केलं होतं, त्याच लोकांनी उद्या परळीत परिवर्तन सभेचा समारोप ठेवला आहे. खरंतर त्यांच्या परळीतील नेत्याने यात्रेचा शुभारंभ परळीतून करायला हवा होता, परंतु समारोप ठेवला आहे. त्याच दिवशी आम्ही इथे येणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसह त्यांच्या पक्षाचाच समारोप केल्याशिवाय राहणार नाही."
तसंच राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे 70 वर्षाचं खरकटं आम्ही काढलं, खंडणीखोर आणि गुन्हेगारी मुंडें साहेबांनी संपवली. आता राष्ट्रवादीने फक्त कार्यकर्ते पोसले आणि आता यात्रा काढत आहेत. गळे काढणारे काय हल्ला करणार असं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीका केली. तसंच परळीत राष्ट्रवादीचे लोक पार्टी देऊन निवडून येतात, असंही त्या म्हणाल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
टेक-गॅजेट
राजकारण
Advertisement